Tuesday, July 15, 2025

  वृत्त क्र. 725

महाराष्ट्र-२०४७ व्हिजन डॉक्युमेंटसाठी नागरिक सर्व्हेक्षण

आपले मत, संकल्पना नोंदवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

नांदेड, दि.१५ जुलै- महाराष्ट्र-२०४७ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले जाणार असून त्यासाठी नागरिकांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. अर्थात नागरिकांची मते, विचार, संकल्पना नोंदविल्या जाणार आहेत. त्यात नागरिकांनी आपली मते नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मे ते २ ऑक्टोबर या कालावधीत १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत 'महाराष्ट्र २०४७' व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी राज्यभरात नागरिक सर्वेक्षण राबवले जाणार आहे. हे सर्वेक्षण दि.१८ जून ते १७ जुलै यादरम्यान होणार असून, त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यालयांनाही ही माहिती देण्यात आली असून सर्वेक्षणाच्या माहितीचा प्रसार विविध माध्यमांतून करण्यात येत आहे. 

या सर्व्हेक्षणात नागरिकांना ऑनलाईनही सहभागी होता येणार आहे. त्याद्वारे एक लहानशी प्रश्नावली भरुन द्यावयाची आहे. त्यात टाईप करुन अथवा मोबाईल मध्ये आवाज रेकॉर्ड करुन आपले मत नोंदविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात सहभागासाठी  https://wa.link/093s9m  या लिंकचा वापर करून नागरिकांनी आपली मते व सूचना द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे. तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असेही आवाहन केले आहे.

००००० 



No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...