Tuesday, July 15, 2025

 वृत्त क्र. 730

 

युवकांनी कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या

संधीचा लाभ घ्यावा : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

 

·         जागतिक युवक कौशल्य दिन उत्साहात साजरा

·         युवा उद्योजकांनी दिले यशस्वीतेचे प्रेरणादायी मार्गदर्शन

 

नांदेड दि. 15 जुलै :- युवकांनी स्वतःवर विश्वास ठेवत नवकल्पना आणि कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावाअसे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.

 

जागतिक युवक कौशल्य दिन-2025 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात आज साजरा करण्यात आला. जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. चासकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते.

 

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे विचार मांडले. त्यांनी कौशल्य हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही तर नव्या संधी निर्माण करण्याचे माध्यम असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित युवकांना कौशल्याचे महत्त्व समजावून सांगून रोजगाराच्या नव्या संधी शोधण्यासाठी प्रेरित केले.

 

यावेळी विविध शासकीय योजनांचे सादरीकरण करण्यात आले. स्थानिक यशस्वी उद्योजकांनी मार्गदर्शनसत्रात त्यांच्या उद्योग प्रवासाची माहिती देत युवकांमध्ये प्रेरणा जागवली. यात निळंकठ कोंकणे- एलईडी लाइट्स मॅन्युफॅक्चरिंग नर्सीशिवहार कुरुंके-मिनरल वॉटर बॉटल्स उत्पादनश्रीमती सविता मोरे- सुगंधी तेल निर्मितीमोहम्‍मद जेद-कोल्डड्रिंक्स नांदेडएकवंत गवदवार-मसाला उद्योग नांदेडश्रीमती देवकीनंदा-खादी उत्पादनशुभम पवार-कोकम सॉफ्ट ड्रिंक या उद्योजकांचा समावेश होता.

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमात RSETI, NULM, महिला आर्थिक विकास महामंडळजिल्हा उद्योग केंद्रकृषी व समाज कल्याण आदी विभागांचे योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. युवक-युवतींसाठी हे व्यासपीठ मार्गदर्शकप्रेरणादायी आणि उद्योजकतेकडे घेऊन जाणारा मैलाचा दगड ठरला.

00000







No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...