वृत्त क्र. 682
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी
पात्र विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत- सहाय्यक आयुक्त
सन 2024-25 यावर्षातील विद्यार्थ्यांनी 31 जुलैपर्यंत अर्जातील त्रुटीची पूर्तता करावी
नांदेड, दि. 1 जुलै :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता या योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 1 जुलै 2025 पासून ऑनलाईन महाडिबीटी पोर्टल सुरु झालेले आहे. तरी जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन www.mahadbtmahait.gov.inया संकेतस्थळावर जाऊन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत. त्या अर्जाची छायांकित प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह आपल्या महाविद्यालयात सादर करावीत. तसेच सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी अभावी विद्यार्थी व महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत अशा विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयांनी 31 जुलै 2025 पर्यंत त्रुटीपूर्तता करून तात्काळ फेर सादर करावेत असेही कळविले आहे.
पुढील वेळापत्रकानुसार कार्यवाही होणार
शैक्षणिक स्तर, अर्जाचा प्रकार, प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन अग्रेशित करण्याकरिता मुदत (संबंधित महा. प्राचार्य यांचेसाठी), व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयासाठी ऑनलाईन अर्ज मंजूर करण्यासाठी कालावधी पुढीलप्रमाणे दिली आहे.
शैक्षणिक स्तर कनिष्ठ महाविद्यालय अभ्यासक्रम उदा.11,12 वी सर्व एमसीव्हीसी, आयटीआयसाठी नवीन अर्ज 15 ऑगस्ट 2025 पर्यत तर नुतनीकरणासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यत तर समाज कल्याण कार्यालयासाठी अर्ज मंजूरीसाठी 30 ऑगस्ट 2025 व नुतनीकरणासाठी 10 सप्टेंबर 2025 पर्यत मुदत दिली आहे.
वरिष्ठ महाविद्यालय बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम (कला,वाणिज्य,विज्ञान शाखा सर्व अभ्यासक्रम) यासाठी नवीन अर्जासाठी व नुतनीकरणासाठी 10 सप्टेंबर 2025 हा कालावधी असून समाज कल्याण कार्यालयासाठी नवीन अर्ज व नुतनीकरण अर्ज मंजूरीसाठी 30 सप्टेंबर 2025 हा कालावधी दिला आहे.
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम (उदा.अभियांत्रिकी,वैदकीय, व्यवस्थापन, फार्मसी,नर्सिंग) या शैक्षणिक वर्षासाठी संबंधित महा. प्राचार्य यांचेसाठी नवीन अर्जासाठी 15 नोव्हेंबर 2025 व समाज कल्याण कार्यालयास मंजूररसाठी 30 नोव्हेंबर 2025 कालावधी तर नुतनीकरणासाठी प्राचार्य यांना 15 नोव्हेंबर 2025 व समाज कल्याण कार्यालयास मंजूर करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यत मुदत दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment