Tuesday, July 15, 2025

 वृत्त क्र. 727

योजनांचा जागर व नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत मुख्याध्यापकांची बैठक संपन्न 

नांदेड, दि. 15 जुलै : योजनांचा जागर व नव भारत साक्षरता कार्यक्रम अंर्तगत आज 15 जुलै रोजी पंचायत समितीच्या बैठक सभागृहात सकाळ सत्रात नांदेड उत्तर, अर्धापूर व दुपार सत्रात नांदेड दक्षिण अंतर्गत येणाऱ्या इयत्ता 6 वी ते 12 वीच्या शाळांतील खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनातील मुख्याध्यापक तसेच तालुक्यातील  शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची शिक्षणाधिकारी योजना दिलीपकुमार बनसोडे यांनी बैठक घेतली. 

विद्यार्थी लाभांच्या योजनाबाबत शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे  यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. नव भारत साक्षरता कार्यक्रमाबाबत उपशिक्षणाधिकारी (योजना) माधव शिंगडे यांनी माहिती सांगितली. शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणे याबाबत शेख रुस्तुम यांनी माहिती दिली. या बैठकीस पंचायत समिती नांदेडचे गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजीराव शिंदे उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी बालाजी ढगे, मुरली पावडे व  शेख रुस्तुम यांनी परिश्रम घेतले.

00000



No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...