वृत्त क्रमांक 405
गावागावांमध्ये पाणी वाटपसंस्थांशी जलसंपदा विभागाचा गावभेटीतून संवाद
नांदेड दि. १८ एप्रिल : जलसंपदा विभागामार्फत जल व्यवस्थापन पंधरवाडा अंतर्गत 18 एप्रिल ला गावागावांमध्ये ज्या ठिकाणी पाणी वाटप संस्था आहे त्या ठिकाणी अंतर्गत सभा घेऊन सदस्यांना पाणी वाटप संस्थेचे आणि पाण्याचे महत्व व त्या संदर्भातील नव्या धोरणांची माहिती देण्याचा उपक्रम आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला.
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड जलव्यवस्थापन कृती पंधरवडा - २०२५ निमित्त अधीक्षक अभियंता अ.आ. दाभाडे पालक अभियंता तथा पालक अभियंता नांदेड जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या विविध कार्यक्रमाच्या आयोजनाच्या पंधरवड्या अंतर्गत दि. १८ एप्रिल शुक्रवार रोजी "शेतकरी व पाणी वापर संस्था संवाद" या विषयी नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड अंतर्गत सर्व कार्यालयामध्ये कार्यक्रम संपन्न झाले.
पाटबंधारे विभाग नांदेड अंतर्गत असलेल्या नायगाव, भोकर व किनवट येथे कार्यालय व इतर ठिकाणी शेतकरी संवाद बैठक पार पडली.या निमित्ताने पाणी वापर संस्था व शेतकरी यांच्या विविध तक्रारीचें निराकरण करण्यात आले. तसेच आवर्तन काळातील अडचणींवर चर्चा करताना अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पाणी वाटप संस्थेची सक्रियता शेतकरी आणि प्रशासन या दोन्ही संस्थांना बळकटी देणारी आहे त्यामुळे या संस्थेच्या गुणात्मक विकासाकडे आणि उद्दिष्ट पूर्ण कार्याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन यावेळी सहभागी अधिकाऱ्यांनी केले.
0000

.jpeg)

.jpeg)

No comments:
Post a Comment