जिल्हा जात पडताळणी कार्यालयात
शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी केलेला सर्वोच्च त्याग आणि बलिदान देशवासियांच्या चिरकाल स्मरणात राहिल. महान क्रांतिकारक भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त 23 मार्च रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात शहीद भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वैजनाथ मुंडे, सिद्राम रणभीरकर, विठ्ठल आडे, संजय पाटील, शिवाजी देशमुख, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होण वडजकर, अनिकेत वाघमारे, मोशीन शेख, सुनील पतंगे यांची उपस्थिती होती.
0000

No comments:
Post a Comment