Tuesday, June 7, 2022

 नांदेड जिल्ह्यात एक व्यक्ती कोरोना बाधित 

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 139 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे  1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख हजार 804 एवढी झाली असून यातील लाख 109 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 3 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1 असे एकुण 1 कोरोना बाधित आढळला आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 2 असे एकुण 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 3 हजार 826

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 83 हजार 375

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख हजार 804

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- लाख 109

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / शाळा, मदरसामध्ये

शिक्षण योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- केंद्रपुरस्कृत अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / शाळा व मदरसामध्ये शिक्षण योजना एसपीक्यूईएमएम व  आयडीएमआय  या योजना येतात. या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / शाळांसाठी पायाभूत विकास योजना व मदरसातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आर्थिक तरतूद मागणीचे प्रस्ताव गुरुवार 30 जून 2022 पर्यंत शिक्षणाधिकारी माध्यमिकजिल्हा परिषद नांदेड  कार्यालयात सादर करावेतअसे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

00000

 कौशल्य साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा

-  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

· रोजगार मेळाव्यात निवड झालेल्या युवकांची पहिली तुकडी पुणे येथे रवाना

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- शैक्षणिक गुणवत्तेसमवेत कौशल्याची जोड असेल तर रोजगाराच्या संधी अधिक विस्तारतात. प्रत्येकाने आपल्या कुशल कौशल्यातून ओळख निर्माण करावी व नाविण्यपूर्ण कामावर भर द्यावाअसे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.

 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात निवड झालेल्या 90 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांना पुणे येथे आज प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवारजिल्हा समन्वयक इरफान खानपरम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक परमेश्वर राजबिंडेकर्मचारीविद्यार्थी आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात देण्यात येणाऱ्या सुविधेबाबत कंपनीच्या प्रतिनिधीशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी भविष्यात असे रोजगार मेळावे घेतले जातील. जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या संधीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या नावाची नोंदणी करावीअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी केले.  

 

स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जून 2022 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यात एकुण नामांकीत कंपन्यानी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत महिंद्रा अँड महिंद्रापुणे या कंपनीसाठी एकुण 367 एवढया विद्यार्थ्यांची मुलाखत घेवून 90 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. या कंपनीमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महिंद्रा अँड महिंद्रा (प्रा.लि.) चाकण पुणे येथे कंपनीच्या वाहनातून जाण्याची व्यवस्था करण्यात आलीअशी माहिती यावेळी देण्यात आली.  

0000








अवयवदान चळवळीत महाराष्ट्राचा पुढाकार... अवयवदान पंधरवडा : दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ मरणोत्तर सेवा ही जीवनोत्तर प्रतिष्ठा आहे! https://notto.abd...