Tuesday, September 28, 2021

 अन्न व्यावसायिकांना नोंदणी  प्रमाणपत्र घेण्यासाठी विशेष मोहिम 

नांदेड (जिमाका) दि. 28 : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न व्यवसायिकांना परवाना नोंदणी प्रमाणपत्र घेण्याकरिता दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत असून  ऑनलाईन पध्दतीने www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

कलम 31 नुसार अन्न व्यवसायिकांनी अन्नपदार्थ उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल रेस्टॉरंट, हातगाडी  विक्रेते, भाजी व फळे विक्रेते, ज्यूस  सेंटर, चिकन, मटन, अंडे विक्रेते, मिठाई विक्रेते, बेकरी व्यावसायिकांना व्यवसाय सुरु करण्यापूर्वी परवाना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.सदर कायद्यानुसार विनापरवाना व्यवसाय करणे हा फौजदारी गुन्हा असून यामध्ये सहा महिने शिक्षा व 5 लाखापर्यंत दंड आहे. 2011 मध्ये नमूद असलेल्या परवाना अट क्रमांक 14 नुसार प्रत्येक अन्नपदार्थ उत्पादक, वितरक व आयातदार यांनी केवळ परवानाधारक/नोंदणी धारक अन्न व्यवसायाकडून अन्नपदार्थाची खरेदी करणे व परवाना व नोंदणी असलेल्या व्यावसायिकाकडून अन्नपदार्थाची विक्री करणे बंधनकारक आहे. सदर अटीचे उल्लंघन केल्यास कलम 58 नुसार दोन लाखापर्यंत दंड होवू शकतो. ज्या व्यावसायिकांचे वार्षिक उलाढाल 12 लाख रुपये पर्यंत आहे त्यांना परवाना घेणे बधनकारक आहे.जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांना तात्काळ परवाना/ नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. विनापरवाना व्यवसाय करताना आढळून आल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन परवाना प्राधिकारी सहायक आयुक्त नारायण सरकटे यांनी केले  आहे.

*****

 गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नांदेड (जिमाका) दि. 28 :- विष्णुपूरी प्रकल्पातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या पैनगंगा, पूर्णा, मांजरा या नदीकाठच्या गावातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विष्णपुरी प्रकल्पाच्या 10 दरव्याजातून 1,37,018 क्युसेक  विसर्ग सुरु आहे.  निम्न दुधना प्रकल्पातून  30,324 क्युसेक विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव प्रकल्पातून 80,534 क्युसेक विसर्ग सुरु आहे. पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर  पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीत 23,300 क्युसेक  विसर्ग सुरु आहे. सिद्धेश्वर धरण परिसरात  मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पूर्णा ब्रीज जवळ 71,600 क्युसेक विसर्ग सुरु आहे. जुन्या पुलाजवळ पाणी पातळी 351.00 मी. एवढी आहे. इशारा पाणी पातळी 351.00 मी. तर धोका पातळी 354.00 मी. इतकी वाढली आहे. गोदावरी नदीतून विष्णुपूरी बंधाऱ्यात मागील प्रकल्पातून 3,00,000 क्युसेक विसर्ग टप्या टप्याने प्रवाहीत होणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरील धोक्याची पाणी पातळी 354.00 मी. ने वाढण्याची शक्यता आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2,13,000 क्युसेक व धोका पातळीचा विसर्ग 3,09,774 क्युसेक आहे. 

उर्ध्व पैनगंगा धरण 100 टक्के भरल्याने धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तेथील 11 दरवाजे उघडून 18,791 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी.के.शेटे यांनी दिली आहे.

*****

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 548 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 318 एवढी झाली असून यातील 87 हजार 652 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 15 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1, उमरी 1 असे एकुण 2  बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात माहूर तालुक्यांतर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 15 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, व्यक्ती उपचार घेत आहेत.

  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 31 हजार 642

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 28 हजार 293

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 318

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 652

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

00000

Monday, September 27, 2021

 जिल्ह्यातील 103 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 85 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 28 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, खडकपुरा, रेल्वे हॉस्पिटल, अरबगल्ली या 19 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचे उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 26 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 14 लाख 30 हजार 813 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 12 लाख 06 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 14 हजार 240 डोस याप्रमाणे एकुण 15 लाख 20 हजार 270 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 636 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 90 हजार 316 एवढी झाली असून यातील 87 हजार 650 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 15 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नायगाव 1, हिंगोली 1 असे एकूण 3  बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 15 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 31 हजार 94

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 27 हजार 749

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 316

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 650

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-03

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

00000

 दिवाळीसाठी फटाका दुकानाच्या परवानासाठी 11 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- दिपावली उत्सव 4 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतील फटाका दुकानांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत परवाने 24 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.तसेच जिल्ह्यातील सर्व  उपविभागीय दंडाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका परवाना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

तात्पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या मार्फत जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रातील फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनियमय 2008 नुसार फटाके विक्री परवाहनासाठी विहित नमून्यात अर्ज कारायचा आहे.परवाना घेताना दुकानाचा नकाशा व ज्यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता, परिसरातील सुविधा इक्यादी तपशील दाखवण्यात यावा.The Explosive Rule 2008 मधील नियम 84 अन्वये सदर दुकानातील किमान अंतर 03 मीटर असावे तसेच संरक्षीत  क्षेत्रापासून अंतर 50 मीटर असणे आवश्यक आहे.सदर नकाशात दुकान क्रमांक नमूद असावा नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा.अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो.लायसन फी रुपये 500 चलनाची प्रत जोडलेली असावी.एकाच परिसरात सामूहिक रित्या दुकाने टाकण्यात येत असल्यास संबंधित अर्जदारास देण्यात आलेल्या दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणत्र असणे आवश्यक आहे.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड/मुख्याधिकारी नगरपरिषद,नगरपंचायत, ग्रामपंचायत,कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र.संबंधित पोलिस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र, जागेच्या मालकी हक्काचे पुरावे,नोंदणीकृत मान्यताप्राप्त असोसिएशन मार्फत तात्पुरता परवानासाठी अर्ज केल्यास या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यातील नमूना अटी व शर्तीनुसार संबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल कोणत्याही विस्फोटक नियमांचे उल्लंघन झाल्यास व अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित असोसिएशनची राहील. दुकानाच्या ठिकाणी करण्यात आलेली व्यवस्था तपशील अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार राहील. 

कोव्हिड-19  विषाणूच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन तसेच विस्फोटक नियंत्रक व इतर संबंधित विभागाकडून वेळोवळी फटाका परवाना निर्गमनाबाबत प्राप्त होणाऱ्या अटी व शर्तीचे अधीन राहून देण्यात येते. अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनद्वारे फिस शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने दिनांक 18 ऑक्टोबर, 2021    20 ऑक्टोबर,2021 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍या मार्फत तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या मार्फत निर्गमित केले जातील.

दिपावली सण-उत्‍सवाच्या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

000000

 प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मुख्य सचिव जे.पी.डांगे यांचा दौरा

नांदेड (जिमाका) दि. 27  :- प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी सचिव जे.पी.डांगे यांच्या नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 

 बुधवार दिनांक 6 ऑक्टोबर 2021  रोजी सकाळी 6 वाजता पुणे येथून खाजगी वाहनाने नांदेड कडे प्रयाण,दुपारी 3 नांदेड येथे आगमन. सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयास भेट . सायंकाळी 5.15 वाजता समपीएसके होमिओपॅथी मेडिकल कॉलेजला भेट. गुरुवार दिनांक 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास भेट.दुपारी 3 वाजता नांदेड येथील सीईटी परीक्षा केंद्राला भेट. सायंकाळी  5 वाजता मराठवाडा अध्यापक महाविद्यालय बी.एड कॉलेजला भेट.सायंकाळी 6 वाजता नांदेड येथून लातूर कडे प्रयाण करतील.

000000

 धार्मिक स्थळासह राज्याच्या पर्यटन क्षेत्रातही माहूर गड आता ठरेल वैभवाचे केंद्र

- अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. २७ :- विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटनाची जोड देवून भक्तांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेतच त्या-त्या भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर गडही त्या दृष्टीने विकसित करुन या परिसरातील वनसंपदेच्या, पर्यटनाच्या विकासकामांना प्राधान्य देत एकात्मिक विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

माहूर गडाच्या पायथ्याशी असलेल्या मातृतिर्थाजवळील कॉमन फॅसिलिटी सेंटरपासून तीनही गडांना जाण्या-येण्यासाठी रोप वे चे काम आता जलद गतीने पूर्णत्वास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  'रोप वे' उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'वॅपकॉस लिमिटेड' मध्ये नुकताच करार झाला आहे. या निमित्ताने त्यांनी माहिती दिली. 
माहूर गड आता धार्मिक स्थळांसह राज्याच्या पर्यटन क्षेत्रातही वैभवाचे केंद्र ठरेल यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या प्रमूख शक्तीपिठापैकी एक असलेल्या माहूर गडाचा आता कायापालट होत असून लवकरच सर्व वयोगटातील भाविकांना त्यांच्या आवडीनुसार भक्तीसोबत पर्यटनाचीही जोड देता येईल. नांदेडच्या पूर्व-ईशान्य दिशेला असलेल्या डोंगर रांगाच्या माथ्यावर रेणूका देवी, अनुसया माता आणि दत्त शिखर हे देशातील सर्व भाविकांचे श्रध्दा स्थान आहे. याचबरोबर या डोंगर रागांच्या पायथ्यातून पैनगंगा नदी आपला अवखळ प्रवाह घेत पुढे विदर्भात जाते. अनेक वर्षापासून या भागात असलेली जैवविविधता, वनसंपदा, वन्यजीव हे पर्यटनाच्या दृष्टीनेही शक्ती स्थळ राहीले आहे.  

या शक्ती स्थळांचा येथील जैवविविधता सांभाळून सर्व सेवा सुविधायुक्त‍ विकास आता केला जात असून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत असलेल्या विकास कामांच्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

माहूर विकासाच्या दृष्टीने आजवर नोंदविल्या गेलेली पर्यटकांची संख्या, वाहनांची वर्दळ, भक्त व पर्यटकांना अत्यावश्यक असलेल्या सेवा सुविधा, पर्यावरणाच्या दृष्टीने लागणाऱ्या वन विभागाच्या मान्यता, येथील भुगर्भ रचनेनुसार कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक असलेली काळजी व तसा आराखडा ही सर्व कामे प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून  वॅपकॉस लिमिटेड ही कंपनी करेल.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शन व अधिपत्याखाली ही विकासकामे होतील. 
00000





  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...