Tuesday, October 20, 2020

 

केळी पिक संरक्षणासाठी कृषि संदेश

नांदेड (जिमाका) दि. 20 :- केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून केळी पिक संरक्षणसाठी पुढीलप्रमाणे कृषि संदेश दिला आहे. केळी पिकावरील ठिपके आढळून आल्यास रोगग्रस्त पाने किंवा पानाचा भाग काढून टाकावे व बागेबाहेर आणुन नष्ट  करावा. बागेत वाळलेली पाने झाडावर लटकणारी काढून टाकावेत. केळीची बाग स्वच्छ व तणविरहीत ठेवावी, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी  आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...