मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेंतर्गत फिरत्या पशुचिकित्सा वाहनाचे
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण
नांदेड, (जिमाका) दि. 25 :- राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुधनाचे विविध साथीच्या आजारातून संरक्षण मिळावे आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरते पशु चिकित्सा वाहन मिळाले असून यांचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येत आहे.
कोविडची परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या विविध
निकषाचे पालन करुन जिल्हा परिषदेच्या प्रागंणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर,
आमदार राजेश पवार, आमदार
राम पाटील रातोळीकर ,आमदार भिमराव केराम, आमदार शामसुंदर शिंदे,
आमदार तुषार राठोड, जिल्हाधिकारी विपीन ईटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती
पदमा सतपलवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती बालासाहेब कदम रावणगावकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाबाई पाटील
बेटमोगरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शदर कुलकर्णी इतर
पदाधिकारी व पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
सदर फिरते पशु चिकित्सा वाहन सद्यस्थितीत भोकर, हदगाव व देगलूर या तीन तालुक्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या वाहनात आजारी पशुवर उपचाराची सुविधा देण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक उपकरणे, रोग प्रतिबंधक लसीकरण, उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या वळूच्या रेतमात्रा वापरुन कृत्रिम रेतम, पशु आहार व आरोग्याबाबत पशु वैद्यकीय तज्ञामार्फत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. याचबरोबर आवश्यक त्या लहान व मोठया शस्त्रक्रिया पशुच्या आजारानुरुप त्या त्या गावातच करता याव्यात यासाठी या वाहनात सुविधा असेल असे जिल्हा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
आनंद डेअरीच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातही मोठया
प्रमाणात दुग्धोव्यवसायाची संधी
- मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर
नांदेड जिल्ह्यात असलेली भौगोलिक परिस्थिती गोदावरी, आसना, लेंडी, पैनगंगा सारख्या नद्याचे विस्तीर्ण जाळे, या नदयाचे पानलोट क्षेत्र लक्षात घेता जिल्ह्यात मोठया प्रमाणात दुग्ध व्यवसायाची संधी दडली आहे. आनंद डेअरीच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातही मोठया प्रमाणात दुग्धव्यवसाची संधी उपलब्ध आहे. येथील शेतीच्या विविध पिकातून निर्माण होणारे पशुखाद्य आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेत भविष्यात याला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत आम्ही व्यापक मोहिम हाती घेत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी स्पष्ट केले.
आजच्या घडीला जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 8 लाख 79 हजार 529 गायी, गुरे, 29 हजार 279 शेळी व मेंढया एवढीच पशु जनगणनेत नोंद आहे.
जिल्हा कृषी क्षेत्रात आणि पुरेशा पाण्याच्या दृष्टीने समर्थ असूनही आपण
जिल्ह्यातील एकूण दुधाच्या मागणीपैकी दहा टक्केही दुधाचे उत्पादन जिल्ह्यात होत
नाही. याचाच अर्थ शेतीपूरक उद्योगामध्ये दुग्धव्यवसायाला 90 टक्क्याची संधी उपलब्ध असल्याचे ठाकूर यांनी निर्दशनास आणून दिले.
ग्रामीण भागातील बेरोजगार युवा शक्तीना दुग्धव्यवसायाकडे वळविण्यासाठी कृषी व
पशुसंवर्धन विभागातर्फे व्यापक जनजागृती करुन विविध सेवाभावी संस्थाचा यात सहभाग
घेवू असे त्यांनी स्पष्ट केले.
0000
No comments:
Post a Comment