Friday, March 31, 2017

कृपया सोबतच्या वृत्तास आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धी दयावी ही विनंती.

वृ.वि.5142                                                                              9 चैत्र, 1938 (रात्रौ.8.20)                                                                                                          दि. 30 मार्च 2017

मी मुख्यमंत्री बोलतोय...कार्यक्रमाच्या माध्यमातून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार जनतेशी संवाद

मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मी मुख्यमंत्री बोलतोय...या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. मुख्यमंत्र्याशी थेट संवाद साधणारा संकल्प शाश्वत शेतीचाया विषयावरील हा पहिला कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम दूरचित्रवाणी वाहिनीवर नंतर प्रसारित करण्यात येईल.
            या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारता येणार आहेत. जनतेने विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तर देतील. यासाठी विचारण्यात येणारे प्रश्न विषयाशी निगडीत धोरणात्मक बाबींवर असावेत, वैयक्तिक नसावेत, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यासाठी दि. 3 एप्रिल, 2017 पर्यंत av.dgipr@maharashtra.gov.in या ई-मेलवर किंवा 8291528952 या मोबाईल क्रमांक तसेच व्हॉट्स अॅपवर पाठविता येतील.
०००००


आदिवासी शेतकऱ्यांनी पिकांचे
बिजोत्पादन घेऊन उत्पन्न वाढवावे
- कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू
जावरलातील आदिवासी शेतकऱ्यांना पीक संरक्षण उपकरणाचे वाटप

           नांदेड दि. 31 :- आदिवासी शेतक-यांनी आर्थिक फायदा व उत्पन्नातील सातत्य टिकविण्यासाठी विविध पीकांचे बिजोत्पादन करावे , असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी व्यक्त केले. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये आदिवासी शेतकरी प्रशिक्षण व उपकर वाटप कार्यक्रम आज आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू बोलत होते.
       
नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामार्फत आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातून मौजे जावरला ता. किनवट जि. नांदेड येथील आदिवासी शेतक-यांना पीक संरक्षण उपकरणांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य केदार साळुंके उपस्थित होते.
            कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू म्हणाले की, आदिवासी गावातील परिस्थिती जाणुन घेऊन त्यानुसार पीक रचनेबाबत विद्यापीठातील सर्व प्रमुख पीकांचे शास्त्रज्ञ आदिवासी गावांमध्ये येऊन मार्गदर्शन करतील. सध्या कांदा सारख्या पीकाच्या बिजोत्पादनातुन शेतक-यांना चांगला फायदा मिळत आहे. आदिवासी शेतक-यांनी नैसर्गीक संसाधन अधारीत कृषि व्यवसाय सुरू करावे. यामध्ये रेशीमपालन, शेळीपालन, कुक्कुट्पालन ईत्यादी कृषिपूरक जोडधंदे करण्यास आदिवासी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा.  
जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले की, कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक-यांनी स्वत:चा विकास साधावा व आपले गाव कृषि विकासाच्या दृष्टीकोनातून आदर्श गाव बनवावे. शासनाच्या विविध योजना एकात्मिकपणे राबवून गावाचा विकास साधावा, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. गावातील संसाधनांचा वापर करून उत्पादीत मधासारख्या पदार्थांचे विपणन अधिक नियोजन पूर्वक करावे असेही ते म्हणाले. कृषि विद्यापीठाद्वारे आदिवासी गावामध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत श्री. काकाणी यांनी समाधान व्यक्त केल.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेले नांदेड जिल्ह्यातील जावरला (ता. किनवट) या गावातील कृषि उत्पादन वाढविण्यासाठी विद्यापीठाने विवीध योजनांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिके, निवीष्ठा वाटप, प्रशिक्षण आदी कार्यक्रमाची माहिती संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिली. गावातील विंधन विहीरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी विद्यापीठाने विकसीत केल्याप्रमाणे विहीर पून:र्भरण करावे. त्यासाठी विद्यापीठाच्या वतीने विहीर पून:र्भरणाचे प्रात्यक्षिक जावरला गावामध्ये विद्यापीठाद्वारे घेण्यात येतील. त्याचप्रमाणे येत्या हंगामामध्ये ज्वारी, सोयाबीन, कोरडवाहू शेती ईत्यादी बाबतचे तंत्रज्ञान शेतक-यांच्या शेतावर प्रात्यक्षिकाद्वारे प्रदर्शीत करण्यात येईल. त्याप्रमाणे लागवड तंत्र शेतक-यांनी अवगत करावे असेही डॉ. वासकर म्हणाले.
कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आदिवासी गावामध्ये जावून प्रात्यक्षिके देण्याच्या आणि पीक संरक्षण उपकरणांच्या वाटपाबाबत विद्यापीठ कार्यकारी समिती सदस्य श्री. साळुंके यांनी कौतूक केले.
            कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी प्रास्ताविक केले. चालू हंगामामध्ये जावरला गावामध्ये कपूस पिकाच्यप्रात्यक्षिकाबाबतची माहिती त्यांनी दिली. यावेळी कापूस लागवडीबाबत विविध विषयांवर संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. खिजर बेग, प्रा. अरविंद पांडागळे, डॉ. शिवाजी तेलंग, डॉ. पवन ढोके, प्रा. अरुण गायकवाड यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. 
तालुका कृषि अधिकारी श्री कायंदे, श्रीमती ऐलवाड व आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री पटवे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रा. पांडागळे यांनी सूत्रसंचलन केले तसेच शेवटी आभार मानले.

0000000
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांच्या
फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी उपक्रमाचे उद्घाटन
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते वाहने मार्गस्थ

नांदेड दि. 31 :- विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देणासाठी फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या उपक्रमाचे आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तसेच या वाहनांना मार्गस्थ करण्यात आले. ही दोन वाहने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून वाहने उद्घाटनानंतर जिल्हा दौऱ्यासाठी मार्गस्थ करण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, समतादूत प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्पाधिकारी मुंजाजी कांबळे, समतादूत अविनाश जोंधळे, विनोद पाचंगे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, माहिती अधिकारी निशिकांत तोडकर आदींची उपस्थिती होती.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती या फिरत्या वाहनाद्वारे जिल्ह्यातील गावात पोहचविण्याचा प्रयत्न आहेत. वाहनांवरील श्राव्य ( ऑडियो ) ध्वनीफितीद्वारे योजनांची माहिती असणाऱ्या जींगल्स ऐकविण्यात येणार आहेत. गावा-गावात पोहचून  विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचीत जातींसाठीच्या विद्यार्थी, तरूण तसेच महिला, शेतकरी आदी घटकांसाठीच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विविध प्रकारची प्रशिक्षणे, महिला सक्षमीकरण, लाभार्थी व समूह योजनांची माहिती पोहचविण्याचा उद्देश आहे. या वाहनांना जिल्ह्यातील आठ-आठ तालुक्यांची विभागणी करून देण्यात आली असून, त्यासाठीचा मार्गही निश्चित करण्यात आला आहे. या उपक्रमात समतादूतही सहभागी होणार आहेत.
          
  जिल्हा माहिती अधिकारी गवळी यांनी फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीबाबतची संकल्पना विशद केली. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते फित कापून वाहनांचे उद्घाटन करण्यात आले व वाहनांना मार्गस्थ करण्यात आले. याप्रसंगी किसान बिरादरीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव पाटील- इजळीकर, गुंडेगावचे दासराव हंबर्डे आदींचीही उपस्थिती होती.

0000000

Thursday, March 30, 2017

परीक्षेत यशप्राप्तीसाठी सराव महत्वाचा - हतनुरे
नांदेड दि. 30 :- स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासासोबत परीक्षेच्या अनुषंगाने सराव परीक्षा देणे महत्वाचे असून यामाध्यमातून यश मिळण्याचा आत्मविश्वास वाढीस लागतो, असे प्रतिपादन पुणे येथील प्रा. हणमंत हतनुरे यांनी केले. "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने राज्य सेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सराव परीक्षेचे त्तरासह  विश्लेषण करताना ते बोलत होते.
डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह सेतू समिती अभ्यासिका याठिकाणी सामान्य ज्ञान सीसॅट या विषयावर सराव परीक्षा घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, ग्रंथपाल आरती कोकुलवार बाळू पावडे उपस्थित होते.
या दोन्ही विषयाची सराव परीक्षा झाल्यानंतर प्रा. हतनूरे यांनी पाच तास सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्नपत्रिकेचे उत्तरासहितविश्लेषण विद्यार्थ्यांसमोर सादर केले. सोबतच प्रश्नपत्रिका सोडविताना आवश्यक त्या भागावर लक्ष केन्द्रीत करणे, अचूकता वेळेचे व्यवस्थापन या महत्वाच्या बाबी कशा आत्मसात करायच्या याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने महत्वाच्या अशा सराव परीक्षेचे नि:शुल्क आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
परीक्षा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोंडीबा गाडेवाड, रघुवीर श्रीरामवार, मधुकर, सोपान यनगुलवाड आदीने सहकार्य केले.

000000
उष्माघातापासून बचावासाठी
काळजी घ्या - आरोग्य विभाग
नांदेड दि. 30 - देशात उष्णतेची लाट आलेली आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी नागरिकांनी विशेषत: जेष्ठ व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीनी स्वत:ची काळजी घ्यावी. उष्माघात पासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभाग नांदेड यांचेकडून करण्यात आले आहे.
उष्माघातपासून बचावासाठीच्या उपाय योजना पुढील प्रमाणे -  
उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी असे करा. 
·         भरपूर पाणी पिणे.
·         भरपूर थंड पेय पिणे. उदा. ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी.
·         आवश्यक असल्याशिवाय उन्हात जाण्याचे टाळा.
·         फिकट रंगाचे कपडे घालणे.
·         थंड जागेत / वातावरणात राहणे.
·         भर उन्हात म्हणजे साधारणता: दुपारी १२ ते संध्याकाळी ५ पर्यंत काम करायचे टाळणे.
उष्माघाताची लक्षणे –
§  अस्वस्थपणा
§  थकवा
§  शरीर तापणे
§  अशक्तपणा
§  अंगदुखी, डोकेदुखी
§  मळमळ

उष्माघाताची लक्षणे आढळल्यास असे करा :
§  थंडगार पाण्याने आंघोळ करणे
§  ( डोक्यावरून गार पाण्याने आंघोळ करून, तापलेले शरीर थंड होण्यास मदत होईल )
§  थंड जागेत / वातावरणात आराम करणे
§  परिश्रमाचे काम न करणे
§  भरपूर थंड पाणी  / पेय पिणे
§  मनपा आरोग्य केंद्रात किवा जिल्हा रुग्णालयास त्वरित ओषधपचार करवून घेणे.
§  108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधवा.
हे करू नका
·         दुपारी 12 ते 3 उन्हात फिरु नका.
·         मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटयुक्त सॅाफ्ट ड्रिंक्स घेऊ नका. त्यामुळे डीहाइडेट् होते.
·         उच्च प्रथीनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.

हे करा
  • तहान नसल्यास हि पुरेसे पाणी प्या.
  • बाहेर जाताना गॅागल, छत्री, टोपी, बूट किवा चप्पल वापरा.
  • प्रवास करताना सोबत पाणी घ्या.
  • आपले घर थंड ठेवा, पडदे सनशेड बसावा.
  • रात्री खिडक्या उघडया ठेवा.
  • अशक्त, कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उष्माघाताच्या उपचारासाठी गुरुगोबिंदसिंघजी स्मारक शासकय जिल्हा रुग्णालय नांदेड , डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , महापालिकेची रुग्णालये या ठिकाणी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000
जागतिक ग्राहक दिनाचे आज आयोजन
            नांदेड दि. 30 -  ग्राहकांच्या हक्कांची व ग्राहक संरक्षण कायदाची जनतेत जनजागृती होण्याच्या उद्देशाने शुक्रवार 31 मार्च 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सकाळी 10 वा. जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते होणार आहे.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा सौ. स्मिता कुलकर्णी राहतील. तसेच प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य डॉ. बा. दा. जोशी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जि. ग्रा. सं. प. सदस्य आर. एस. कमटलवार हे राहतील.
            नागरिक व ग्राहकांनी शुक्रवार 31 मार्च 2017 रोजी जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सकाळी 10 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...