Saturday, January 24, 2026

वृत्त क्र. 116 

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनीडला पवन कल्याण यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 24 जानेवारी :- आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनीडला पवन कल्याण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

रविवार 25 जानेवारी, 2026 रोजी बेगमपेट विमानतळ येथून श्री गुरूगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 9.40 वा. आगमन. सकाळी 9.45 वा. श्री गुरूगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथून हॉटेल सिटी सिंफनी नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10 वा. हॉटेल सिटी सिंफनी नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1.10 वा. हॉटेल सिटी सिंफनी येथून तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वारा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.20 ते 1.30 वाजेपर्यंत तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वारा येथे राखीव. दुपारी 1.30 ते 1.35 वाजेपर्यंत तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वारा येथे दर्शन. दुपारी 1.35 ते 1.50 वाजेपर्यंत चौर साहिबची सेवा सादर करणे आणि प्रसादास उपस्थित राहणे उपस्थिती. दुपारी 1.50 ते 1.55 वाजेपर्यंत तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वारा समितीच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.55 तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वारा येथून वाहनाने मोदी मैदान नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.10 वा. 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळा कार्यक्रमास आगमन व उपस्थिती. स्थळ- मोदी मैदान नांदेड. दुपारी 4 वा. मोदी मैदान नांदेड येथून श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व दुपारी 4.30 वा. श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथून बेगमपेट विमानतळाकडे प्रयाण करतील.

0000000

 


No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...