Monday, July 24, 2017

चुकीच्या सवयीला दूर करुन
आरोग्याबाबत जागरुक रहावे  
- जिल्हाधिकारी डोंगरे 
नांदेड, दि. 24 :- निरोगी जीवनासाठी युवकांनी चुकीच्या सवयीला दूर करुन आरोग्याबाबत अधीक जागरुक असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.  
एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. सुहास बेंद्रीकर, जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे पर्यवेक्षक प्रवीण गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, एचआयव्ही मुक्त समाजासाठी एचआयव्ही / एड्सवरील विविध प्रश्नांवर ग्रामीण भागातही जनजागृती करणे आवश्यक आहे. एचआयव्हीबद्दलचे गैरसमज दुर करुन एचआयव्हीबाधीत नागरिकांना व त्यांच्या पाल्यांना भेदभावाची वागणूक देऊ नका. एचआयव्हीग्रस्त लहान बाळांना सकस आहार देण्यासाठी सेवाभावी संस्था, आरोग्य विभागाकडून अधीक प्रयत्न व्हावेत. विविध शासकीय योजनेचा एचआयव्हीग्रस्त नागरिकांना लाभ मिळून देण्यासाठी प्रशासनाबरोबर सेवाभावी संस्थानी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी एचआयव्ही / एड्सबाबत विविध प्रश्न व उपायांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस एचआयव्हीबाधितांसाठी काम करणाऱ्या विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. 

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...