Saturday, June 29, 2019


संगणक प्रणालीत सुधारणेचे काम सुरु
सातव्या वेतन आयोगानुसार
निवृत्तीवेतनधारकांना लवकरच वेतन
नांदेड, दि.28 :- राज्य शासनाच्या आदेशानुसार निवृत्तीवेतन धारकांच्या जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीच्या सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतनाचा पहिला हप्ता प्रदान करण्याचे काम जिल्हा कोषागारामध्ये चालू आहे. संगणक प्रणालीमधील  त्रटीमूळे मासिक निवृत्तीवेतनाच्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्यासह, प्रदानास दोन-तीन दिवस विलंब होण्याची क्यता आहे. संगणक प्रणालीत सुधारणेचे काम सुरु असून लवकरात लवकर निवृत्तीवेतन धारकांचे वेतन आयोगाच्या  हप्त्यांसह प्रदान करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

बचतगटांना मिनी ट्रॅक्टर योजनेतील अर्जाच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन



           नांदेड, दि. 29 :- मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या स्वयंसाहय्यता बचत गटांनी केलेल्या अर्जात त्रुटींची पूर्तता संपूर्ण कागदपत्रांसह बुधवार 10 जुलै 2019 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड येथे सादर करावीत, असे आवाहन नांदेड समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसाहय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित आहे. या लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.  
सन 2018-19 या वर्षात ज्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी केलेल्या अर्जांची तपासणीत अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे. अर्जातील त्रुटींची पूर्तता 10 जुलै 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत करुन घ्यावी. अन्यथा आपला अर्ज अपात्र ठरवून ईश्वर चिट्ठीने निवड प्रक्रियेत आपल्या बचत गटाचा सहभाग राहणार नाही. तसेच याबाबत आपला कुठलाही दावा मान्य करण्यात येणार नाही, असेही आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
000000


जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या
शासकीय वसितगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु
नांदेड, दि. 29 :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शैक्षणिक वर्षे 2019-20 साठी जिल्ह्यातील विविध शासकीय वसतिगृहात रिक्त जागेसाठी इयत्ता आठवी, अकरावी, पदवी व पदविका प्रथम वर्षे या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वाटप सुरु आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांना नियमानुसार मोफत निवास, भोजन व्यवस्था व इतर भत्ते मिळतील. जिल्ह्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय वसतिगृहांचे गृहपाल यांनी केले आहे.
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह तहसिल कार्यालय जवळ नायगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रविंद्रनगर बिलोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सरकारी दवाखान्याजवळ अर्धापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गुजराती भवन धर्माबाद, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह किनवट रोड भोकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आनंदनगर नांदेड या वसतिगृहात रिक्त जागेसाठी प्रवेश प्रक्रिया पुढील वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
शासकीय वसतीगृहाचे सन 2019-20 साठी प्रवेशाचे वेळापत्रक
शालेय विद्यार्थ्यांसाठी :- ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालवधी 15 जून ते 4 जुलै 2019. पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करणे 8 जुलै 2019. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 21 जुलै 2019 पर्यंत.  रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 22 जुलै 2019, दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 31 जुलै 2019 पर्यंत. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 5 ऑगस्ट 2019 पर्यंत राहिल.
इयत्ता दहावी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)  - ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालवधी 15 जून ते 14 जुलै 2019. पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करणे 15 जुलै 2019 पर्यंत. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 31 जुलै 2019 पर्यंत.  रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 10 ऑगस्ट 2019. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 20 ऑगस्ट 2019 पर्यंत. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 21 ऑगस्ट 2019 पर्यंत राहिल.
बी.ए. / बी. कॉम / बी.एस.सी या 12 नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका / पदवी आणि एम.ए. / एम.कॉम/एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) - ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालवधी 15 जून ते 24 ऑगस्ट 2019. पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करणे 27 जुलै 2019 पर्यंत. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2019 पर्यंत.  रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 16 ऑगस्ट 2019. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 24 ऑगस्ट 2019 पर्यंत. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 30 ऑगस्ट 2019 पर्यंत राहिल.  
व्यावसायिक अभ्यासक्रम - ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालवधी 15 जुलै ते 28 ऑगस्ट 2019. पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करणे 31 ऑगस्ट 2019 पर्यंत. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 5 सप्टेंबर 2019 पर्यंत.  रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 9 सप्टेंबर 2019. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 12 सप्टेंबर 2019 पर्यंत. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 18 सप्टेंबर 2019 पर्यंत राहिल.
पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतीगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास वरील दिलेल्या दिनांकापर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस प्राधान्य देऊन त्यास तात्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांनी या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधीत शासकीय वसतिगृहांचे गृहपाल यांनी केले आहे.
000000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 13.47 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 29 :- जिल्ह्यात शनिवार 29 जून 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 13.47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 215.46 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 58.98 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6.24 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 29 जून 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 13.38 (74.18), मुदखेड- 21.33 (95.33), अर्धापूर- 5.00 (68.00), भोकर- 14.25 (74.75), उमरी- 13.33 (89.46), कंधार- 24.83 (40.66), लोहा- 17.67 (51.26), किनवट- 10.14 (53.67), माहूर- 2.75 (61.28), हदगाव- 5.71 (44.27), हिमायतनगर- 4.67 (49.35), देगलूर- 1.50 (10.66), बिलोली- 20.40 (49.00), धर्माबाद- 26.33 (63.33), नायगाव- 31.60 (72.00), मुखेड- 2.57 (46.43). आज अखेर पावसाची सरासरी 58.98 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 943.63) मिलीमीटर आहे.
00000

भारतीय डाक विभागाच्यावतीने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे आयोजन



नांदेड, दि. 29 :- भारतीय डाक विभागाच्यावतीने रविवार 1 जुलै 2019 रोजी डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा 4 था वर्धापन दिन नांदेड मुख्य डाकघर, खरबी तालुका लोहा, भोपळा- शंकरनगर उपडाक कार्यालय, होणवडज व वडगाव- मुखेड उपडाकघर, दत्त माजरी- माहूर उपडाकघर याठिकाणी साजरा करण्यात येणार आहे.  
डिजिटल इंडिया हा भारत सरकारचा उपक्रम आहे. याद्वादे इंटरनेटचे जाळे देशाच्या सुगम तसेच दुर्गम ठिकाणी पोहचून भारतातील सर्व नागरिकांपर्यंत सरकारी सुविधा इंटरनेटद्वारे पोहोचवण्याचा भारत सरकारचा हेतू आहे. या उपक्रमाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोजी यांच्या हस्ते 1 जुलै 2015 रोजी झाली आहे. या उपक्रमाद्वारे भारतात दुर्गम ठिकाणी चांगल्या प्रतीचे वेगवान इंटरनेटद्वारे पोहोचवण्याच्या योजनांचा समावेश आहे. या अभियानामार्फत सरकारचा देशाला एक माहिती तंत्रज्ञानावर आधारित सशक्त अर्थसत्ता बनवण्याचा प्रयास आहे.
या कार्यक्रमाद्वारे भारतीय डाक विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे कामकाज पूर्णपणे डिजिटल स्वरुपात करण्यात येत आहे. Direct Beneeit Transfer द्वारे शासकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, रोजगार हमी योजनेचे वाटप तसेच सर्व प्रकारचे बँकिंग सुविधा याद्वारे देण्यात येत आहेत. तसेच टपाल जीवन विमा, सुकन्या समृद्धी योजना, बचत खाते आदी सुविधा टपाल खात्यामार्फत पूर्णपणे डिजिटल स्वरुपात देण्यात येत आहेत, असे अधीक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...