Friday, December 25, 2020

 28 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू  

24 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 25 :-  शुक्रवार 25 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 28 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 24 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 5 अहवालापैकी 976 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 239 एवढी झाली असून यातील 20 हजार 172 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 299 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. गुरुवार 24 डिसेंबर रोजी देगलूर तालुक्यातील मरखेल येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर ऋषिक्रांती नगर नांदेड येथील 66 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 570 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 15, खाजगी रुग्णालय 5, कंधार तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 24 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.97 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 13, देगलूर तालुक्यात 1, हिंगोली 1, असे एकुण 15 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, किनवट तालुक्यात 1, मुखेड 1, अर्धापूर 1 असे एकुण 13 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 299 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 20, मुखेड कोविड रुग्णालय 13, देगलूर कोविड रुग्णालय 16, हदगाव कोविड रुग्णालय 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 128, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 48, औरंगाबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 19 आहेत.   

शुक्रवार 25 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 68 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 75 हजार 750

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 50 हजार 443

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 239

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 172

एकुण मृत्यू संख्या-570

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-470

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-299

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15.           

000000

 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त

जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन दिन संपन्न  

नांदेड, (जिमाका) दि. 25 :- भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म दिवस 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व सेवा हमी कायदा याविषयावर प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनारद्वारे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी प्रस्ताविक उपजिल्हाधिकारी शरद मंडलीक यांनी केले. तर उच्च शिक्षण विभागाचे लेखाधिकारी निळकंठ पांचगे, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प कार्यालयाचे उपअभियंता भिमराव हाटकर यांनी ऑनलाईन वेबीनारद्वारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिली गेली. शेवटी नायब तहसिलदार सुनिल माचेवाड यांनी आभार मानले. 

अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये क्षमतावृद्धी करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 26 (1) अन्वये माहितीचा अधिकार या विषयावर पदनिर्देशित केलेले सहाय्यक जन माहिती अधिकारी, राज्य जन माहिती अधिकारी, अपिलीय प्राधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे संनियंत्रण जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले होते.

000000

 

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

स्पर्धकांनी व्हॉटसॲप, ईमेलद्वारे अर्ज करावा

जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 25 :- कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तर युवा महोत्सव 2020-21 या वर्षाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने रविवार 27 डिसेंबर 2020 रोजी गुगलमिट (Google meet) या ॲपवर सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय, युवक मंडळातील इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज शनिवार 26 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा ‍अधिकारी राजेश्वर मारावार (9975661081) व  क्रीडा अधिकारी गुरुदिपसिंघ संधु (9423140617) या क्रमांकावर व्हॉटसॲप तसेच  dsonanded.dsys-mh@gov.in या ई-मेलद्वारे सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करतांना त्यावर आपला व्हॉटसॲप क्रमांक असणे आवश्यक आहे. इच्छुक कलावंत / स्पर्धकांनी जास्तीत-जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.  

आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग लातूर, जिल्हा क्रीडा परिषद नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतीक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शसनामार्फत सन 1994 या वर्षपासून दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशातील संस्कृती व परंपरा जतन करुन या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रतिनिधी युवा संघवरील राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होतो. राज्याचा संघ निवडण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. स्पर्धक विभागस्तरावर सहभागी होतात. त्यातून गुणवंत कलावंताची निवड होवून राज्यस्तरावरील युवा महोत्सवासाठी विभागाचा संघ पाठविला जातो.

जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धेच्या बाबी

सांघीक बाबीत लोकनृत्य स्पर्धेत 20 (साथीदारासह) कलाकार संख्या राहिल तर वेळेची मर्यादा 15 मिनिटे असेल. लोकगीत स्पर्धेत कलाकार 6 (साथसंग अतिरिक्त) तर 7 मिनिटे वेळ असेल. वैयक्तीक बाबीत  एकांकिका (One Act Play एक पात्री प्रयोग हिंदी/इंग्रजी ) स्पर्धेसाठी कलाकार संख्या 12 तर वेळेची मर्यादा 45 मिनिटे राहिल. याप्रमाणे शास्त्रीय गायन (हिंदुस्तानी/कर्नाटकी), शास्त्रीय वादन- सितार, शास्त्रीय वादन- बासरी स्पर्धेसाठी कलाकार संख्या 1 तर वेळेची मर्यादा 15 मिनिटे राहिले. शास्त्रीय वादन तबला, शास्त्रीय वादन -  वीणा, शास्त्रीय वादन- मृदंग, हार्मोनियम वादन (लाईट),गिटार वादन,शास्त्रीय नृत्य मनिपुरी, शास्त्रीय नृत्य ओडिसी, शास्त्रीय नृत्य भरतनाटयम, शास्त्रीय नृत्य कथ्थक, शास्त्रीय नृत्य कुचिपुडी या स्पर्धेसाठी कलाकार संख्या 1 तर वेळेची मर्यादा 10 मिनिटे असेल. तर वक्तृत्व स्पर्धा ( ऐनवेळी देण्यात येणारा विषय) स्पर्धेसाठी कलाकार संख्या 1 तर वेळेची मर्यादा ही 4 मिनिटे राहिल.

स्पर्धेबाबत सूचना

स्पर्धक / कलाकारांसाठी वयोगट 15 ते 29 वर्षे अशी राहील. वय हे 12 जानेवारी 2021 रोजी किमान 15 व जास्तीत-जास्त 29 वर्षे असावे. तर दिनाक 12 जानेवारी 1992 ते 12 जानेवारी  2006 या कालावधीत जन्म असावा. स्पर्धकाने नाव नोंदणी करताना प्रवेशीकेसोबत आपले आधारकार्ड व जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यासाठी शाळेचे ओळखपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही. स्पर्धकाचे वय 12 जानेवारी 2021 रोजी 15 ते 29 वर्षे असावे. स्पर्धकांनी आपले नाव नोंदणी करतांना स्वत:चे प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी  राजेश्वर मारावार (9975661081),  क्रीडा  अधिकारी  गुरुदिपसिंघ संधु (9423140617) या क्रमांकावर व्हॉटसॲपद्वारे सादर करावाक. तसेच  dsonanded.dsys-mh@gov.in  या मेलवर सुध्दा तो सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करतांना त्यावर आपला व्हॉटसॲप क्रमांक असणे आवश्यक आहे. कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येणार नाही.  ज्या स्पर्धकांचे अर्ज दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत  वरील व्हॉटसॲप क्रमांकावर तसेच dsonanded.dsys-mh@gov.in या मेलवर येतील त्याच स्पर्धकांना कला सादर करण्याकरीता स्पर्धकांच्या व्हॉटसॲप क्रमांकावर लिंक पाठविण्यात येईल. स्पर्धा 27 डिसेबर 2020 रोजी  सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत होईल. दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धकास ऑनलाईन सादरीकरणाची परवानगी देण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी व दिलेल्या वेळेतच आपले सादरीकरण करावे. सादर केलेल्या बाबीची  व्हीडीओ  क्लीप तयार करुन  dsonanded.dsys-mh@gov.in या मेलवर परफॉरमन्स झाल्यावर लगेच पाठवावी. आपली कला सादर करतांना विद्युत पुरवठा खंडित होवून आपले सादरीकरणात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी स्पर्धकांनी स्वत: घ्यायची आहे. असे झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. त्यामुळे शक्यतो लॅपटॉप,  मोबाईलचा वापर करावा. परिक्षणाबाबत कोणताही आक्षेप घेता येणार नाही. प्रतीस्पर्धी कलाकारांबाबत काहीही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिशी त्याच वेळी आक्षेप ऑनलाईन सिध्द करणे आवश्यक राहील. कलाकारांना कला सादर करतांना कोणत्याही प्रकारची इजा, दुखापत झाल्यास त्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. ऑनलाईन कला सादर करतांना सहभागी कलाकारांनी आपल्या वयाचा मूळ दाखला सोबत ठेवावा. एका कलाकारास एका बाबीत फक्त एकाच वेळेस सहभागी होता येईल. एकापेक्षा जास्त बाबीत सहभागी होता येईल. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक-युवती सहभागी होवू शकणार नाहीत. लातूर विभागाच्या विभागीयस्तर युवा महोत्सव संभाव्य तारीख 1 जानेवारी 2020  तर  राज्यस्तरीय युवा महोत्सवाची संभाव्य तारीख  30 ते 31 डिसेंबर 2020 मुंबई येथे राहिल. 

नांदेड जिल्हयातील  प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडाप्रेमी, युवांनी आपल्या शाळा, महाविद्यालयातील जास्तीतजास्त युवांना या स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता आपल्या शाळा महाविद्यालयाच्या प्रवेशिका वर नमूद केलेल्या मुदतीत कार्यालयात वेळेत सादर करावे व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार (9975661081),  क्रीडा  अधिकारी गुरुदिपसिंघ संधु (9423140617) यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

00000


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...