Thursday, May 3, 2018

जलयुक्त शिवार योजनेतील
अपूर्ण कामे येत्या जून अखेर पूर्ण करावीत
 - पालक सचिव एकनाथ डवले

नांदेड, दि. 3:-  जलयुक्त शिवार योजनेतील अपूर्ण कामे येत्या जून अखेर पूर्ण करावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारेअप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटीलरोहयोचे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात तसेच संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होतेेेे 
श्री डवले म्हणालेजलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असल्याने या अभियानांतर्गतची कामे येत्या जुनपर्यंत पूर्ण करावीत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे झाली आहेत. मागेल त्याला शेततळेगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारमनरेगा ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. ज्या कामांच्या निविदा तीनवेळा काढूनही प्रतिसाद मिळत नसेल, तर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत लोकसहभागातून कामे घेण्यात यावीत. गाळ काढण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करावा. कंत्राटदारांनी विहीत मुदतीत कामे केली नाहीत तर त्यांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करण्याबाबत संबंधित विभागाने जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवावेत. तसेच नाला खोलीकरण, रुंदीकरणाची कामे घेण्यात आली आहेत. त्या नाल्यामध्ये गॅबियन बंधाऱ्याची कामे प्रायोगिक तत्वावर घेण्यात यावीत अशीही सुचना पालक सचिव श्री डवले यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसचित जाती  उपयोजनाआदिवासी उपयोजना अंतर्गत मंजूर तरतूदप्राप्त तरतूद तसेच झालेल्या खर्चाचा आढावाही पालक सचिव श्री डवले यांनी घेतला. जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.        
**** 

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...