Sunday, October 18, 2020

 

121 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

92 बाधितांची भर तर तिघांजणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 18 :- रविवार 18 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 121 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 92 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 47 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 45 बाधित आले. 

आजच्या एकुण 766 अहवालापैकी  657 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 18 हजार 79 एवढी झाली असून यातील  15  हजार 918 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 565 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 44 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  शनिवार 17 ऑक्टोंबर रोजी खाजगी रुग्णालयात सिडको येथील 55 वर्षाची एक महिला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नरसी नायगाव येथील 67 वर्षाचा एक पुरुष, आणि हदगाव घोगरी येथील 37 वर्षाचा एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 483 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 2, बिलोली कोविड केंअर सेंटर 4, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 1, किनवट कोविड केंअर सेंटर 1, मुदखेड कोविड केंअर सेंटर 1,

जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 2, लोहा कोविड केंअर सेंटर 1, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 87, खाजगी रुग्णालय 17 असे एकूण 121 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 91.4 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 31, अर्धापुर तालुक्यात 1, मुदखेड 3, कंधार 4, धर्माबाद 1, नांदेड ग्रामीण 2, भोकर 1, किनवट 1, नायगाव 1, हिंगोली 2  असे एकुण 47 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 22, भोकर तालुक्यात 1, हदगाव 1,  मुखेड 3, नायगाव 5, बिलोली 2, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड 1, किनवट 2, कंधार 2, धर्माबाद 1, हिंगोली 1 असे एकूण 45 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 565 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 170, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित  878, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 38, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 44, हदगाव कोविड केअर सेंटर 9, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 30, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 27, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 20,  मांडवी कोविड केअर सेंटर 7, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 7, लोहा कोविड केअर सेंटर येथे 12, बारड कोविड केअर सेंटर 2, मुदखेड कोविड केअर सेटर 9, माहूर कोविड केअर सेंटर 20, किनवट कोविड केअर सेंटर येथे 30, धर्माबाद कोविड केअर सेंटर 16, उमरी कोविड केअर सेंटर 35, कंधार कोविड केअर सेंटर येथे 9, अर्धापूर कोविड केअर सेंटर 15, भोकर कोविड केअर सेंटर 15, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 168, लातूर येथे संदर्भित 1, हैदराबाद येथे संदर्भित 2 झाले आहेत. 

रविवार 18 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 48, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 85 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 99 हजार 211

निगेटिव्ह स्वॅब- 77 हजार 887

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 79

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 15 हजार 918

एकूण मृत्यू संख्या- 483

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 91.4

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 409 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 565

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 44 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

 

 

वेळप्रसंगी कर्ज काढू  पण शेतकऱ्यांना मदत करू
- महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

 

आढावा बैठकीसह शेताच्या बांधावर जाऊन

विजय वडेट्टीवार यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

 

नांदेड (जिमाका) दि 18:-  अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली त्याचेही पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून यासाठी वेळप्रसंगी ड्रोनचाही वापर  करण्यास सांगितले आहे. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करू असे आश्वासक उद्गार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले.
अतिवृष्टीमुळे कृषी क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने त्यांनी आज नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला.

 

या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी लितफ पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

हे वर्षे नैसर्गिक आपत्तीचे वर्षे असेल दुर्देवाने म्हणावे लागत आहे.  कोकणापासून ते विदर्भापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील काही भाग वगळला तर शेतकऱ्यांना खूप काही सहन करावे लागले आहे. कोकणातील चक्रीवादळामुळे सर्वप्रथम तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने सातशे कोटी रुपयांची मदत उभी केली. त्याखालोखाल आताचे हे नुकसान लक्षात घेता आम्ही केंद्र सरकारला मदत करण्याची विनंती केली आहे. त्याबाबत त्यांना लेखीही कळविले आहे. आम्ही आमच्या पातळीवर शेतकऱ्यांसाठी मदतीला तत्पर असून वेळप्रसंगी कर्ज काढायची वेळ जरी आली तरी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाचे सर्व मंत्री आज त्या-त्या जिल्ह्यातील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसमवेत मदतीसाठी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांच्यासमोर ठेवला. शेतीसमवेत नांदेड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागातील रस्ते व लहान पूल वाहून गेल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टिने त्याच्या दुरुस्तीचेही नियोजन आवश्यक असून त्याबाबत स्वतंत्र आर्थिक मदत केली जावी असे आमदार अमर राजूरकर यांनी सांगितले. राज्य शासनाने सर्व शक्तीनिशी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना सहकार्य करण्याची मागणी आमदार मोहन हंबर्डे यांनी केली. जिल्ह्यातील सर्वात जास्त फटका सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून ज्वारी व इतर पिकेही हातची गेले असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. बैठकीनंतर त्यांनी नांदेड तालुक्यातील तुप्पा, मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील शेतकऱ्यांशी त्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला.

 

दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी रात्री येथील विश्रामगृहात मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी विभाग प्रमुखांना भेटून जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला. दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी याबाबत पुन्हा बैठक घेऊन लोकप्रतिनिधींशी व प्रशासनाशी चर्चा करुन त्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत उर्वरीत पंचनामे व मदतीसाठी अत्यावश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

0000






  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...