Saturday, August 11, 2018


सार्वजनिक ग्रंथालयासाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आज आयोजन
         जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेडच्या वतीने भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती निमीत्त 12 ऑगस्ट रोजी  एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत सार्वजनिक ग्रंथालयासाठी बदल अर्ज, संस्था नोंदणी रदद, अपील  व अडीअडचणी विषयी मार्गदर्शन करण्यासाठी नांदेडच्या धर्मदाय उप आयुक्त सौ.प्रणिता श्रीनीवार या उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.आ.गंगाधर पटने साहेब उपस्थीत रहाणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून स्व.रा.ति. विदयापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.जगदिश कुलकर्णी व नांदेड ग्रंथालय संघाचे  सचिव श्री.राजेंद्र हंबीरे हे उपस्थीत राहाणार आहेत.
         या कार्यशाळेस नांदेड जिल्हयातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या पदाधीकारी व कर्मचा-यांनी उपस्थीत राहावे असे अहवान जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...