Thursday, September 24, 2020

 वृत्त क्र. 309

उद्योजकतेला चालना देणाऱ्या शासनाच्या

विविध योजनांबाबत ऑनलाईन मार्गदर्शन 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- उद्योजकता धोरण आणि शासनाच्या उद्योजकतेबाबत चालना देणाऱ्या विविध योजनेविषयी शुक्रवार 25 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राचे आयोजन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले असून या सत्रात महाव्यवस्थापक अमोल इंगळे हे मार्गदर्शन करणार आहेत. 

या मार्गदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी Meeting URL: https://meet.google.com/thz-yweg-ovb   या लिंक वर क्लिक करावे. आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर install करून घ्यावे. आपण Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंक मधून कनेक्टर झाल्यावर लगेच आपला व्हिडीओ व माइक म्युट बंद करावे. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक  सुरु करून विचारावे व लगेच  माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. 

अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड  02462-251674 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र नांदेड यांनी केले आहे.

00000

 

वृत्त क्र. 308

सोयाबीन शेंगामधील बियाण्यांची

उगवण समस्या व उपायाबाबत कृषि सल्ला  

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि बदलेले हवामान याचा विपरीत परिणाम काही ठिकाणी सोयाबीन पिकावर दिसून आला आहे. सोयाबिनची पेरणी साधारणता 15 ते 30 जून दरम्यान झालेली असून आता हे पिक सध्या पकवतेच्या अर्थात सोयाबीनच्या शेंगा भरलेल्या अवस्थेत आहेत. या शेंगा वाळण्यासाठी व बियाणांमधील ओलावा कमी होण्यासाठी तापमान हे 30 ते 35 डिग्री सेल्सिअस प्रर्यंत असावे लागते. अर्दता ही 50 टक्यांपेक्षा कमी असावी लागते. याचबरोबर प्रखर सुर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असावे लागते. सद्यस्थितीत तापमान 20 ते 25 डिग्री असून अद्रता ही 90 टक्यापेक्षा जास्त आहे. वातावरणही सतत ढगाळ आहे. 

सदर स्थिती व वातावरण लक्षात घेता सोयाबिनच्या उभ्या पिकात शेंगामधील बियाणांची उगवण झालेली आहे. हे त्या बियाणाचे शारीरीक व्यंग असून सतत पडणाऱ्या पावसामुळे असा परिणाम झाला आहे. यावर कृषि आयुक्तालयाने उपाय सुचविले असून ते पुढील प्रमाणे आहेत. शेतामध्ये चर काढून पाण्याचा निचरा करावा व शेतामध्ये हवा खेळती ठेवावी. पाऊस थांबताच सोयाबिन पिकाची काढणी करुन काडाचे छोटे-छोटे ढिग करुन प्रखर सुर्यप्रकाशामध्ये शेतामध्येच वाळवावे. त्यानंतर प्रादुर्भाव/उगवण झालेल्या शेंगा बाजुला काढून मळणी करावी असे कृषि आयुक्तालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.

000000

 

267 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

236 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 24 :- गुरुवार 24 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 267 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 236 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 76 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 160 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 141 अहवालापैकी  875 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 14  हजार 436 एवढी झाली असून यातील 10  हजार 450 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 537 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 53 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात एकुण 7 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवार 23 सप्टेंबर रोजी कौडगांव ता. लोहा 75 वय वर्षाचा एक पुरुष , एकता नगर नांदेड 70 वय वर्षाचा एक पुरुष, मुक्रमाबाद ता. मुखेड येथील 24 वय वर्षाचा एक पुरुष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे तर धर्माबाद तालुक्यातील 61 वय वर्षाचा एक पुरुष, बसवेश्वर नगर नांदेड येथील 52 वय वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड, मानस नगर नांदेड येथील 70 वय वर्षाची एक महिला खाजगी रुग्णालयात तर गुरुवार 24 सप्टेंबर 2020 रोजी किनवट तालुक्यातील धानोरा येथील 60 वय वर्षाच्या एका महिलेचा किनवट कोविड केअर सेंटर येथे  उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 378 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 17, बिलोली कोविड केअर सेंटर 2,धर्माबाद कोविड केअर सेंटर 6, मुखेड कोविड केअर सेंटर 19, माहूर कोविड केअर सेंटर 13, खाजगी रुग्णालय 5, उमरी कोविड केअर सेंटर 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 12, किनवट कोविड केअर सेंटर 7, लोहा कोविड केअर सेंटर 7, नायगाव कोविड केअर सेंटर 15, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 159, हदगाव कोविड केअर सेंटर 11 असे 267 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 51, कंधार तालुक्यात 2, अर्धापूर तालुक्यात 4, भोकर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 2 , परभणी 1, नांदेड ग्रामीण 4, मुखेड तालुक्यात 4, नायगाव तालुक्यात 3, लोहा तालुक्यात 2, हिंगोली 1, बीड 1 असे एकुण 76 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 81,  हदगाव तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 11, किनवट तालुक्यात 4, बिलोली तालुक्यात  2, हिमायतनगर तालुक्यात  3, भोकर तालुक्यात 4,  देगलूर तालुक्यात  3, अर्धापूर तालुक्यात 2, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड तालुक्यात 10, लोहा तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 18, नायगाव तालुक्यात 5 , कंधार तालुक्यात 2 , उमरी तालुक्यात 2, माहूर तालुक्यात  1, परभणी 1 एकुण 160 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 537 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 271, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 763, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 81, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 47, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 114, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 52, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 142,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 75, लोहा कोविड केअर सेंटर येथे 30, हदगाव कोविड केअर सेंटर 40, भोकर कोविड केअर सेंटर 49, कंधार कोविड केअर सेंटर येथे 33, बारड कोविड केअर सेंटर 17, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 36, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 110, मुदखेड कोविड केअर सेटर 54,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 23, किनवट कोविड केअर सेंटर येथे 130, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 55, उमरी कोविड केअर सेंटर 55, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 25,  खाजगी रुग्णालयात 329 बाधित, हैद्राबाद येथे संदर्भित 2, औरंगाबाद येथे संदर्भित 2, निजामाबाद येथे संदर्भित 1, अकोला येथे संदर्भित 1 झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 75 हजार 878,

निगेटिव्ह स्वॅब- 57 हजार 816,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 236,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 14 हजार 436,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

एकूण मृत्यू संख्या- 378,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 10 हजार 450,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 537,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 494, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 53,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 74.17 टक्के  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...