Saturday, September 5, 2020

 स्टार्टअप्स उद्योजकता जागृती अभियानाविद्यार्थ्यांचा सहभाग

नांदेड (जिमाका) दि. 5 :- राज्यभरातील तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी आणि अन्य शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी अवेअरनेस क्विझ ऑन आंत्रप्रेनरशिप अँड स्टार्टअप्स या नाविन्यपूर्ण ऑनलाईन प्रश्नमंजूषेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाने प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यस्तरीय जागृती अभियान राबवले आहे.

देशाच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने उद्योजकता आणि स्टार्टअप्स यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थीदशेतच उद्योजकता आणि स्टार्टअपबाबतच्या विचाराचे बीजारोपण व्हावे आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजिलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्यातील विविध शासकीय खाजगी अभियांत्रिकी संस्था, तंत्रनिकेतने आणि व्यवस्थापन शाखेच्या एकूण 1 हजार 500 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना -प्रमाणपत्रे देण्यात आली.

उपक्रम संकल्पना संयोजक म्हणून विभाग प्रमुख राजीव सकळकळे आणि समन्वयक म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संतोष चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली. बदलत्या परिस्थितीत नवनवीन आव्हानांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था असे अभिनव उपक्रम सातत्याने राबवत आहे, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी दिली. तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया  सुरु असताना विद्यार्थी आणि पालक यांच्या दृष्टीने सदर उपक्रम उल्लेखनीय ठरतो.

00000

आदिवासी विद्यार्थ्यांच्या एकलव्य स्कूलची

ऑनलाईन प्रवेश परीक्षा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द   

मागील सत्राच्या गुणावर आधारित होईल निवड

-         प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

नांदेड (जिमाका) दि. 4 :- आदिवासी विद्यार्थ्यांची एकलव्य रेसिडेंसियल पब्लिक स्कूल मध्ये प्रवेशासाठी होणारी ऑनलाईन परीक्षा कोरोना प्रादुर्भावाने रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची आता मागील सत्रातील गुणांच्या आधारे निवड केली जाईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व शासनमान्य शाळेतील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज केलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याचे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 5 वी ते 9 वीतील गुण लिंकमध्ये 15 सप्टेंबर 2020 पर्यंत भरावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार (भाप्रसे) यांनी केले आहे.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यात असलेल्या सर्व शासकीय व अनुदानीत आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील पाचवी ते नववीमध्ये शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेंसियल पब्लिक स्कुलची प्रवेश परीक्षा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे रद्द करण्यात आली आहे. 

ही परीक्षा ऑनलाईन होणार होती परंतु परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रात नांदेड जिल्हातील सर्व शासकीय व आनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद, नगरपालीका व महानगरपालीकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता 5 वी ते 9 मध्ये शिकत असलेल्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेले होते. या विद्यार्थ्यांच्या मागील सत्राच्या गुणाच्या आधारे आता विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. 

सर्व संबंधित विद्यार्थ्यांचे / शाळेचे मुख्याध्यापकांनी गुण प्राप्त करुन घेऊन लिंकमध्ये मंगळवार 15 सप्टेबर 2020 पर्यत भरावयाचे आहेत, असे किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कळविले आहे.

 इयत्ता 6 व्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेचे अर्ज भरलेले आहेतत्यांनी आता 5 व्या वर्गातील प्रथम सत्रातील गुण भरण्याचे निर्देश शासनाकडुन दिले आहेत. हाच निकष इ. 7 वी ते 9 वी च्या रिक्त जागेवेरील प्रवेशाबाबत लागु करण्यात आलेला आहे. मागील सत्रातील एकंदर 900 गुणापैकी विद्यार्थ्यांनी किती गुण मिळवले त्याआधारे निवड यादी जाहिर केली जाणार आहे. मुख्याध्यापकानी विद्यार्थ्यांच्या गुणाच्या  ऐवजी श्रेणी भरलेली स्वीकृत केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्याच्या अर्ज भरतेवेळी आवेदन पत्रामधील दिलेला संपर्क / मोबाईल नंबर आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची जन्म तारीख आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मागील इयतेच्या प्रथम सत्राच्या गुणपत्रीकेची प्रत आवश्यक आहे. (स्कॅन केलेली गुणपत्रीकेची प्रत png.jpeg.jpg.pdf स्वरुपात असावी) शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरलेले असतील तर प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती स्वंतत्र भरावी तसेच गुणपत्र स्वतंत्र अपलोड करावी.

 आवेदन पत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी किंवा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकानी विद्यार्थ्यांचे गुण mtpss.org.in या लिंकवर भरायची आहे. त्याकरीता मुख्याध्यापक यांनी संबधित विद्यार्थ्यांचे प्रथमसत्राचे गुण 900 पैकी नोंदवायचे आहे. (मराठी, हिन्दी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, कला क्रिडा व कार्यानुभव असे एकुण 9 विषय) वर्ग 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रगती पुस्तकामध्ये श्रेणी देण्यात येते. त्यामुळे सर्व संबधित विद्यार्थ्यांचे, संबधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी गुण प्राप्त करुन घेऊन लिंकमध्ये मंगळवार 15 सप्टेबर 2020 पर्यत भरावयचे आहेत, असेही आवाहन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

00000 


 

242 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

370 बाधितांची भर तर एका जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- शनिवार 5 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 242 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 370 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 79 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 291 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 625 अहवालापैकी  1 हजार 223 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 8  हजार 582 एवढी झाली असून यातील  5  हजार 445 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.82 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 827 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 292 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात आज शनिवार 5 सप्टेंबर रोजी प्रकाशनगर नांदेड येथील 58 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे  उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 258 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 21, मुखेड कोविड केंअर सेंटर 16, नायगाव कोविड केंअर सेंटर 3, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 5, कंधार कोविड केंअर सेंटर 3, बिलोली कोविड केंअर सेंटर 9, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 10, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर नांदेड 146, खाजगी रुग्णालय 4, किनवट कोविड केंअर सेंटर 15, मुखेड कोविड केंअर सेंटर 1, उमरी कोविड केंअर सेंटर 9 असे  बाधित व्यक्तींना 242 औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 33, बिलोली तालुक्यात 1, भोकर 1, लोहा 2, नायगाव 4, माहूर 1, धर्माबाद 2, नांदेड ग्रामीण 3, अर्धापूर 1, देगलूर 19, मुखेड 6, कंधार 2, हिमायतनगर 1, यवतमाळ 3 असे एकुण 79 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 119, अर्धापूर तालुक्यात 8,  मुखेड 30, किनवट 4, नायगाव 21, देगलूर 4, धर्माबाद 8, भोकर 3,  हिंगोली 3, अहमदनगर 1, बासर 1, नांदेड ग्रामीण 16, मुदखेड 9, बिलोली 7, लोहा 3, कंधार 10, हदगाव 8, माहूर 3, उमरी 30, लातूर 1, यवतमाळ 2 असे  एकुण 291 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 827 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 249, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 1 हजार 172, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 85, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 68, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 84, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 146,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 67, लोहा कोविड केअर सेंटर येथे 113, हदगाव कोविड केअर सेंटर 64, भोकर कोविड केअर सेंटर 30,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 37,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 103, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 43, मुदखेड कोविड केअर सेटर 11,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 62, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 43, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 56, उमरी कोविड केअर सेंटर 38, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, बारड कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयात 318 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 17, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 5 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 54 हजार 642,

निगेटिव्ह स्वॅब- 43 हजार 812,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 370,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 8 हजार 582,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-09,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 15,

एकूण मृत्यू संख्या- 258,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 445,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 827,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 518, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 292.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...