Wednesday, November 17, 2021

येसगी येथील नवीन पुलावरील वाहतूक बंद जुन्या पुलावरुन 20 टन पेक्षा कमी क्षमतेच्या वाहतुकीस मुभा

 

येसगी येथील नवीन पुलावरील वाहतूक बंद

जुन्या पुलावरुन 20 टन पेक्षा कमी  क्षमतेच्या वाहतुकीस मुभा

- जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड, दि. (जिमाका) 16 :- येसगी येथील जुन्या पुलाची अत्यावश्यक दुरुस्ती करण्यात आली असून  20 टन वाहन भार क्षमतेपेक्षा कमी भार असलेल्या वाहतुकीस मुभा दिली आहे. याचबरोबर नवीन पुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केली आहे.

ही अधिसूचना 17 नोव्हेंबर 2021 च्या सकाळी 6 वाजेपासून पुढील आदेशापर्यत कायम राहील. रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केल्या जात आहे. 

0000

अमृत महोत्सवानिमित्त रस्ता सुरक्षा अभियानाबाबत जनजागृती

 

अमृत महोत्सवानिमित्त

रस्ता सुरक्षा अभियानाबाबत जनजागृती

नांदेड (जिमाका) दि. 17 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा  निमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियानाबाबत पथनाटयाटयाद्वारे जनजागृती करण्यात आली.  या कार्यक्रमास कार्यालयामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, वाहनासंबंधी कामकाजासाठी आलेले अर्जदार कार्यालयातील नागरित उपस्थित होते. या कार्यक्रमास सुमारे 300 नागरिकांनी लाभ घेतला असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले.

 

हा कार्यक्रम फकिरा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था बळीरामपूर,नांदेड यांनी केला. या कार्यक्रमात रस्ता सुरक्षा जनजागृतीबाबतचे पथनाटय माधव वाघमारे, श्रीमती सविता सोदाम त्यांचे सहकारी यांच्यामार्फत सादर करण्यात आले. या कार्यक्रमास अविनाश राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,संदीप निमसे, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी, मनोज चव्हाण, मोटार वाहन निरीक्षक पंकज यादव, मोटार वाहन निरीक्षक, फकिरा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था बळीरामपूर, नांदेड  चे अध्यक्ष संतोष तेलंग, अध्यक्ष उपाध्यक्ष साईप्रसाद जळपतराव, कार्यालयातील सर्व कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

0000

एकात्मिक फलोत्पादन अभियानातर्गत शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

 

एकात्मिक फलोत्पादन अभियानातर्गत

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- एकात्मिक फलोत्पादन अभियानातर्गत विविध बाबीसाठी महाडीबीटी या संगणक प्रणालीवर उपलब्‍ध करुन दिले आहेत. या अभियानातर्गंत विविध बाबीसाठी शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर mahadbtmahait.gov.in अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले आहे.

 

एकात्मिक फलोत्पादन अभियानातर्गत सिंचन सुविधा घटकाखाली सामुहिक शेततळे (अर्ज करताना शेतकरी गट निवडावे), शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन घटकाखाली शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टीक मल्चींग, पॅक आऊस, कांदाचाळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका, प्राथमिक प्रक्रीया केंद्र, कृषि यांत्रिकीकरण घटकाखाली ट्रॅक्टर (20 एच पी च्या आतील) पावर टीलर (8 एचपी च्या आतील व वरील) पावर आॉपरेटेड पॅपसॅक स्प्रेअर इत्यादी बाबींसाठी अर्ज करणे सुरु आहे. तसेच शेडनेट हाऊस मध्ये भाजीपाला बिजोत्पादन करण्यास इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांनी समुहात अर्ज करावेत.

सामुहिक शेततळेसाठी 100 टक्के , अस्तरीकरणासाठी खर्चाच्या 50 टक्के , शेडनेट हाऊस व हरितगृहासाठी 50 टक्के, प्लॉस्टिक मल्चींगसाठी 16 हजार प्रति हेक्टर, ट्रॅक्टरसाठी रुपये 1 लाख व 75 हजार, पावर टीलर साठी 75 हजार व 50 हजार रुपये. पॅक हाऊस साठी 50 टक्के 2 लाख रुपये, कांदा चाळसाठी 50 टक्के (87 हजार 500 रुपये), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीकेसाठी 50 टक्के (2 लाख 30 हजार रुपये) प्राथमिक प्रक्रीया केंद्रासाठी प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के अनुदान देय आहे. ेतरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करुन योजनाचा लाभ ध्यावा असेही कृषि विभागाकडूने कळविले आहे. 

00000

रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन

 

रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 17 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन 2021-22 मध्ये 15 नोव्हेंबर 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत अटीच्या अधीन राहून नमुना नंबर 7,7() वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांना रब्बी हंगामात नमुना नं. 7 वर भूसार पिके, चारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले नमुना नंबर 7,7,() चे पाणी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात 30 नोव्हेंबर पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह भरुन द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता एन.पी. गव्हाणे  यांनी केले आहे.

यासाठी पुढीलप्रमाणे अटी आहेत.

शासनाच्या प्रचलित धोरणानुसार प्राधान्याने शक्यतो चारा पिके व भुसार पिके करावीत. पाणी अर्जासोबत वहिवाटीचा सातबारा उतारा जोडावा. पाणी नाश टाळण्यासाठी लाभाधारकांनी शेतचाऱ्या दुरुस्त करुन घ्याव्यात पाटमोट संबंध नसावा. शंकररावजी चव्हाण प्रकल्पावर उपसा सिंचनास मंजुरी असणाऱ्या संस्था/वैयक्तीक बागाईतदार यांनी त्यांचे नमुना नं. 7 चे पाणी अर्ज सादर करावेत. थकबाकीदार बागायतदार यांना त्यांचेकडील थकबाकीची संपुर्ण रक्कम भरल्यानंतरच त्यांना मंजुरी दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत थकबाकीदाराना पाणी दिले जाणार नाही. धरणातील पाण्याचा साठा, कालव्याची व फाटयाची वहन क्षमता, वहन कालावधी यांचा विचार करुन मागणी क्षेत्रास मंजुरी देताना क्षेत्रात कपात केली जाईल. उडाफ्याचे क्षेत्रास मंजुरी दिली जाणार नाही. पाणी मागणी अर्ज न देता पिके केल्यास या पिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची राहणार नाही. पाणी न मिळाल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास संबंधित लाभधारक जबाबदार राहतील. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरेल त्या नियोजनाप्रमाणे पाणी पुरवठा केला जाईल. त्यानंतर पाणी न मिळाल्याने पिकांचे कोणत्याही प्रकाराने नुकसान झाल्यास, त्यास  जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही. वरीलप्रमाणे करण्यात येणारा पाणीपुरवठयास शासकीय आदेश लागू राहतील असे पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

0000

आदिवासी मुला-मुलीना वसतीगृहात प्रवेशासासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

आदिवासी मुला-मुलीना वसतीगृहात

प्रवेशासासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 17 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यक्षेत्रातील आदिवासी मुलां-मुलीचे शासकीय वसतीगृह हिमायतनगर येथे शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर 30 नोव्हेंबर 2021 पर्यत अर्ज करावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी  किनवट यांनी केले आहे.

वसतीगृहात विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची मोफत सोय केली जाते. त्याप्रमाणे इतर सुविधा दिल्या जातात. तरी विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन  शासकीय वसतीगृह हिमायतनगर चे गृहपाल यांनी केले आहे.

000

 

नांदेड जिल्ह्यात 4  व्यक्ती कोरोना बाधित

तर 3 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 721अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 449 एवढी झाली असून यातील 87 हजार 773 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, कंधार 2 असे एकुण 4  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 23 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13, खाजगी रुग्णालयात 3 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 65 हजार 962

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 62 हजार 111

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 449

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 773

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-8

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...