Saturday, August 29, 2020

 

178 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

269 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- शनिवार 29  ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 178 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 269 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 90 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 179 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 353 अहवालापैकी  1 हजार 16 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 6 हजार 124 एवढी झाली असून यातील 4 हजार 240 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाण 72.21 एवढे झाले आहे. एकुण 1 हजार 627 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 179 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात महावीर सोसायटी नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुष, नांदेड खाजगी रुग्णालयात देगलूरनाका येथील 57 वर्षाचा पुरुषाचा तर शनिवार 29 ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे जुना लोहा येथील 75 वर्षाच्या एक महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथील 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 2, हदगाव कोविड केअर सेंटर 4, नायगाव कोविड केअर सेंटर 5, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 115, मुदखेड कोविड केअर सेंटर 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर 11, खाजगी रुग्णालयातील 7 असे एकूण 178 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.    

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 42, अर्धापूर तालुक्यात 2, हदगाव 2, लोहा 3, कंधार 1, उमरी 1, नायगाव 4, परभणी 2, पुणे 1, नांदेड ग्रामीण 6, बिलोली 3, देगलूर 6, किनवट 2, मुखेड 4, धर्माबाद 8, हिंगोली 2, यवतमाळ 1  असे एकुण 90 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 53, भोकर तालुक्यात 1, बिलोली येथे 15, देगलूर येथे 10, किनवट येथे 3, कंधार येथे 9, उमरी येथे 14, नायगाव येथे 7, हिंगोली 1,  निजामाबाद 1, नांदेड ग्रामीण येथे 1, मुदखेड येथे 4, हदगाव येथे 1, लोहा येथे 15, माहूर येथे 1, मुखेड येथे 21, धर्माबाद येथे 17, परभणी येथे 3, यवतमाळ 1 असे एकुण 179 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 1 हजार 627 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 200, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 439, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 59, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 40, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 72, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 150,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 43, लोहा कोविड केअर सेंटर येथे 39, हदगाव कोविड केअर सेंटर 46, भोकर कोविड केअर सेंटर 12,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 30,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 62, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 18, मुदखेड कोविड केअर सेटर 19,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 9, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 21, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 59, उमरी कोविड केअर सेंटर 36, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, बारड कोविड केअर सेंटर 6, खाजगी रुग्णालयात 253 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 10, निजामाबाद 1, मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 629,

घेतलेले स्वॅब- 44 हजार 454,

निगेटिव्ह स्वॅब- 36 हजार 500,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 269,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 6 हजार 124,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-09,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 02,

एकूण मृत्यू संख्या- 214,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 4 हजार 240,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 627,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 274, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 179. 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

आज सुट्टी दिलेल्यांपैकी 28 गंभीर बाधितांवर झाले यशस्वी औषधोपचार 

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून या आठवड्यात एकुण 78 गंभीर रुग्णांवर यशस्वी औषधोपचार करण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता येथील वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वत:ला सिद्ध करुन रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यावर भर दिल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांनी सांगितले. आज 28 गंभीर कोरोना बाधितांमध्ये 70 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. यातील 9 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर राहून मृत्यूशी झुंज देऊन बरे झाले आहेत. डॉ. धोडिंबा भुरके, डॉ. शितल राठोड यांच्या पथकातील डॉ. संज्योत गिरी, डॉ. मनिषा, डॉ. सरफराज तसेच निवासी डॉक्टरांनी संबंधित स्टाफ नर्ससह कर्मचाऱ्यांनी पूर्ण समर्पण भावाने सेवा दिल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांनी सांगितले. 

00000

 

सुदृढ आरोग्यासाठी दररोज एक तास खेळ आवश्यक

-         जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 29 :- चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली ही शरिराला मिळणाऱ्या व्यायामात दडलेली असते.  हे लक्षात घेता चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास स्वत:च्या आरोग्यासाठी देऊन जमतील तसे खेळ खेळणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. कोविड-19 च्या या वातावरणात प्रत्येकाला आपल्या घराच्या परिसरात असलेल्या जागेवरही आरोग्याच्यादृष्टिने व्यायाम करता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. 

मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादुगर) यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणन देशभरात साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल ,नांदेड येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शिवछत्रपती पुरस्कारार्थी रामलु पारे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी जनार्धन गुपीले, नांदेड सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष निखील लातुरकर, डॉ. पालिवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार आदि मान्यवर उपस्थित होते.   

नवी दिल्ली युवा व खेल मंत्रालयांनी फिट इंडिया फ्रीडम रन हा उपक्रम देशभरात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्यामार्फत राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्हयात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने नांदेड जिल्हयात फिट इंडिया फ्रीडम रन हा उपक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नांदेड जिल्हा सायकलिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करुन फिट इंडिया फ्रीडम रन या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते फिट इंडिया फ्रीडम रन फलेक्सचे रिबीन कापन शुभारंभ करण्यात आला. या सायकल रॅलीमध्ये स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरमनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या बरोबर शासकीय अधिकारी, कर्मचारी व सायकलपटू यांनी सहभाग घेतला. 

या रॅलीचा शुभारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथून जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल-आयटीएम कॉलेज-आयटीआय-श्रीनगर-वर्कशॉपकॉर्नर-भाग्यनगररोड-आनंदनगर-वसंतराव नाईक चौक (नागार्जुना)-अण्णाभाऊ साठे चौक-व्हीआयपी रोड-आयटीएम मार्गे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम सामाजिक अंतराचे पालन करुन यशस्वी करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा अधिकारी किशोर पाठक यांनी केले तर आभार गुरुदिपसिंघ संधु यानी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, रमेश चवरे, सायकलींग संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर सोनसळे व त्यांचे सहकारी आणि संजय चव्हाण आदिंनी सहकार्य केले.

00000

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

प्लाझमा थेरपी उपचाराचा शुभारंभ 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- कोविड-19 च्या संसर्गजन्य आजारातून सावरण्यासाठी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून प्लाझमा थेरपी अर्थात उपचार पद्धतीची सुरुवात झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांनी दिली. 

नांदेड जिल्ह्यातील कोविड-19 बाधित, मध्यम अशा स्वरुपाच्या रुग्णांवर प्लाझमा थेरपीने उपचार व्हावेत यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले होते. यासाठी लागणारी आवश्यक ती यंत्रसामुग्री याची आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाली असून अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धोडिंबा भुरके, डॉ. शीतल राठोड, डॉ. समीर, डॉ. संज्योत गिरी यांच्या उपस्थितीत दोन रुग्णांना प्लाझमा (रक्त) देण्यात आला. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.  

00000




                                      आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी

भक्ती-भावाने संकलन केंद्राकडे मुर्ती सुपुर्द करा

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- कोविड-19 च्या आव्हानात्मक काळातही नांदेड जिल्ह्यातील जनतेने अतिशय जबाबदार वर्तन करुन सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत अत्यंत मोलाची समजदारी दाखविली आहे. जनतेच्या या सहकार्यामुळेच कोविड-19 सारख्या संसर्गजन्य आजाराला आपण गणेशोत्सव काळात नियंत्रीत ठेवू शकलो. आजवर दाखवलेली समजदारी व समंजस भुमिका जिल्ह्यातील जनता गणपती विसर्जनाच्या दिवशीही दाखवेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. 

येत्या एक सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाबाबत त्यांनी आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. गोदावरी ही लोकांच्या श्रद्धेची नदी असून या नदीचे पावित्र्य राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे. हे पावित्र्य अधिक समृद्ध व्हावे, गोदावरी नदीच्या पर्यावरण दृष्टिने गणेश विसर्जनाची मूर्ती इतर नैसर्गिक ठिकाणी विसर्जीत करता याव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने इतर जागा शोधून ठेवल्या आहेत. अनेक खाणींमध्ये स्वच्छ पाणी उपलब्ध असून त्याठिकाणी या मुर्तींचे विसर्जन करुन कमीत-कमी प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहोचावी याची नियोजन केले आहे. या सर्व ठिकाणी लोकांनी गर्दी करुन जाण्यापेक्षा आपण शहरात विविध ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र स्थापन करीत आहोत. या केंद्रांवर सर्व नागरिकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपली मुर्ती सुपूर्द करुन नांदेड जिल्ह्यातील पर्यावरण रक्षणाच्या संकल्पनेला हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापित केले जात आहे. या केंद्रांवर विविध सेवाभावी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींना सहभागी करुन घेतले जाणार आहे.  

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...