Monday, February 13, 2017

जालना येथे सैन्य भरतीचे आयोजन   
नांदेड, दि. 13  :- सैन्य भरती कार्यालय औरंगाबाद  यांच्याकडून जालना येथे 27 एप्रिल 2017 ते 7  मे 2017 या कालावधीत सैन्य भरती रॅलीचे  आयोजन करण्यात आले आहे.   ही  सैन्य भरती  नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, धूळे, नंदूरबार, औरंगाबाद, बुलढाणा जळगाव  या  9 जिल्हयांसाठी  आहे
नांदेड जिल्हयातील इच्छूक उमेदवारांनी पात्रतेसंबधी www.joinindianarmy.org  या संकेतस्थळावर माहिती घेवून भरतीसाठी तयारी करावी. महाराष्ट्र  माजी  सैनिक महामंडळ संचलित मेस्को करीअर ॲकडमी  सातारा  व बुलडाणा  येथे 6 हजार 500 रुपये या अल्पदरात एक  महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते. यात भोजन, निवास व प्रशिक्षण शुल्क समाविष्ट आहे. युवकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहीतीसाठी   जिल्हा  सैनिक कल्याण   कार्यालय नांदेड  येथे  संपर्क करावा, असे  आवाहन सैनिक कल्याण अधिकारी  मेजर  व्ही. व्ही. पटवारी  यांनी  केले आहे.

000000
भारत सरकार शिष्यवृत्ती, शुल्क योजनेसाठी
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन   
नांदेड दि. 13 :- भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण आणि परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2016-17 मधील अनु.जाती, विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून शिष्यवृत्ती मंज करण्यात येते. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या WWW.mahaeschol.maharashra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज रु आवश्यक कागदपत्रे संबंधित महाविद्यालयास सादर करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत निर्वाह भत्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिक्षण फी इतर फीची रक्कम थेट महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.
             शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून काही महाविद्यालय सक्तीने शुल्क आकारत असल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत शासन निर्णय दि. 1 नोव्हेबर 2003 अन्वये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सक्तीने शुल्क वसुल करणाऱ्या महाविद्यालयाविरूध्द कठोर स्वरूपाची कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णयान्वये  चना दिल्या आहेत.
            या  योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क वसुली केली जाणार नाही याची महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज अद्याप महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत अशा विद्यार्थ्यांचे अर्ज विनाविलंब सहायक आयक्त समाज कल्याण कार्यालयास सादर रण्याबाबत महाविद्यालयानी योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
000000


पिपल्स कॉलेज, यशवंत महाविद्यालयात
आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर
नांदेड दि. 13 :- उज्ज्वल नांदेड मोहिमेअतंर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी मंगळवा 14 फेब्रुवारी 2017 रोजी पोलिस उपनिरीक्षक डी. बी. चोपडे पोलिस उपनिरीक्षक राणी भोंडवे यांचे पीएसआय या परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावर मार्गदर्शन शिबी आयोजित करण्यात आले आहे.
               पिपल्स कॉलेज येथे दुपारी 2.30 वा. तर यशवंत महाविद्यालयात  दुपारी 4.30 वा. या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, पिपल्स आणि यशवंत महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000
निवडणुकीतील गैरप्रकारांवरील कारवाईसाठी
यंत्रणांनी आणखी सतर्क रहावे - काकाणी
जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक संपन्न
नांदेड दि. 13 :- जिल्हा परीषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस राहीले आहेत. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी गैरप्रकार अवलंबिले जाणार नाहीत, यासाठी अधिक सतर्क राहावे, जेणेकरून मतदारांना निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदान करता येईल, असे निर्देश जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. समितीची आज जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते.
बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे कुलसचिव बी. बी. पाटील, राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) अनुराधा ढालकरी,  जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, अग्रणी बँकेचे प्र. व्यवस्थापक जयंत वरणकर यांच्यासह आयकर, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनी निवडणूक कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या विविध कार्यवाहीची माहिती दिली. निवडणुकीचा जाहीर प्रचार कालावधी मंगळवारी रात्री दहा वाजता संपणार आहे. मतदार याद्या जाहीर करणे, मतदान केंद्रांची निश्चिती, तेथील सुविधा, विविध पथकांसाठी वाहतूक तसेच अनुषंगीक व्यवस्था, वाहनांची उपलब्धता याबाबत माहिती देण्यात आली, तसेच चर्चा झाली.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, आगामी दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे यंत्रणांनी डोळ्यात तेल घालून सतर्क रहावे. वाहनांचा गैरवापर, तसेच अवैध दारू विक्री, दारुची अवैध वाहतूक यांना प्रतिबंध करण्यासाठी समन्वय राखावा. विशेषतः सीमावर्ती भागांवर लक्ष केंद्रीत करावे. त्यासाठी रात्रगस्त आणि स्थापन करण्यात आलेल्या पथकांमध्ये समन्वय ठेवावा. आर्थिक व्यवहारांबाबत आयकर, बँक, विक्रीकर विभाग यांनी नजर ठेवावी. जेणेकरून अन्य कुठल्या व्यवहारांच्याआडून निवडणुकीतील गैरप्रकारांसाठी अर्थ पुरवठा होणार नाही. पोलीस यंत्रणेनेही समाजकंटकांवरील कारवाईसाठी पुरेशी व्यवस्था करावी. निवडणूक शातंतेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आणखी सतर्क रहावे.
निवडणुकीसाठी विनापरवाना वाहन वापरल्यामुळे आठ प्रकरणात कारवाई केल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. तसेच अवैध दारू विक्रीबाबत संबंधित तहसील आणि उपविभागीय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

000000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...