Monday, July 9, 2018


लोकन्यायालयाचे शनिवारी जिल्ह्यात आयोजन
शेतकरी, पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणे  
मिटवून मावेजा मिळवावा  
नांदेड, दि. 9 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये शनिवार 14 जुलै 2018 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात करण्यात आले आहे. संबंधित शेतकरी / पक्षकार यांनी प्रकरण जेथे प्रलंबित आहे त्याठिकाणी उपस्थित राहून प्रकरण तडजोडीने मिटवून मंजूर मावेजा मिळवावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे.
या राष्ट्रीय लोक न्यायालयात भूसंपादन प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली असुन न्यायालयात बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे ज्यात शासनाकडून निधी मंजुर झालेला आहे अशी प्रकरणे संबंधितांनी उपस्थित राहिल्यास निकाली निघून मावेजा वेळेत प्राप्त होईल. उप कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 5, 68 यांचेकडून न्यायालयात प्रलंबित प्रकरणे ज्यात शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे अशी प्रकरणांची यादी प्राप्त झाली आहे.
संबंधित शेतकरी / पक्षकार यांना शनिवार 14 जुलै 2018 रोजी आपले प्रकरण जेथे जिल्हा / तालुक्याच्या ठिकाणी प्रलंबित आहे त्याठिकाणी स्वतः वेळेत उपस्थित रहावे आणि आपले प्रकरण तडजोडीने मिटवून मंजूर झालेला मावेजा मिळवावा, असेही आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे.
00000


दहावी परीक्षेची हॉलतिकीट,
स्कुल लिस्ट शाळांना ऑनलाईन उपलब्ध
नांदेड, दि. 9 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेची हॉलतिकीट व स्कुल लिस्ट ऑनलाईन पद्धतीने शाळांना त्यांच्या लॉगीन मधून उपलब्ध आहे, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी कळविले आहे.    
000000



माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझा 2018छायाचित्र स्पर्धेसाठी आवाहन
छायाचित्रांचे भरणार राज्यभर प्रदर्शन
नांदेड, दि. 9 :- महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझा 2018 छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा आज जाहीर केली आहे.
या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 25 हजार रूपये, 20 हजार रूपये, 15 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत.
          महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्,माझीकन्या भाग्यश्री, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी maharashtramaza2018@gmail.com या ईमेलवर दि. 31 जुलै 2018 पर्यंत छायाचित्र पाठवावीत. ही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ही छायाचित्र 18X30 इंचएचडी (हायरिझॉल्युशन) असावीत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून सादर होणाऱ्या छायाचित्रांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हक्क राहतील.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यातयेणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000





कुंटूर पोलीस स्टेशन हद्दीत
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
नांदेड, दि. 9 :- कुंटूर पोलीस स्टेशन हद्दीत नायगाव तालुक्यातील कहाळा बु. शिवारात काशिनाथ माने यांचे शेतालगत एमआयडीसी कृष्णूरसाठी जाणाऱ्या जलवाहिनीच्या गळक्या वॉल खाली पुरुष (अंदाजे वय 30 वर्ष ) चिखल मातीत तोंड व नाक दबुन पालथ्या अवस्थेत मरण पावला आहे. त्याचा रंग सावळा असून चेहरा गोल आहे. उंची- 159 सेमी. शरीरबांधा- सडपातळ, नाक- दबके / भसके, कान- बारीक, ओठ- पातळ, कपाळ- अरुंद, दाठी - नाही, केस- काळे बारीक, पोषाख- नेसनिस, काळसर रंगाचा फुल शर्ट त्याखाली काळा रंगाचा जिन्स पॅन्ट, डीएमआर कंपनीची चॉकलेटी अंडरवियर दिसत आहे. डाव्या छातीवर मराठीत आई असे गोंदण केले आहे. पायात खाकी रंगाची सॅडल आहे. या वर्णनाचा मयतबाबत माहिती मिळून आल्यास पोलीस स्टेशन कुंटूर येथे दूरध्वनी 02465- 2585533 वर संपर्क साधावा, असे आवाहन कुंटूर पोलीस स्टेशनचे सहा. पो. उप. निरीक्षक एम. एस. भोळे यांनी केले आहे.  
00000


जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 9 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 10 जुलै 2018 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने केले आहे.
0000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 16.29 मि.मी.पाऊस
नांदेड, दि. 9 :- जिल्ह्यात सोमवार 9 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 16.29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 260.61 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 328.18 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 34.81 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 9 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 19.50 (394.79), मुदखेड- 7.33 (500.01), अर्धापूर- 18.33 (349.34), भोकर- 20.00 (481.25), उमरी- 9.00 (350.31), कंधार- 5.50 (328.66), लोहा- 17.17 (338.98), किनवट- 20.71 (266.13), माहूर-13.50 (340.00), हदगाव- 44.86 (455.44), हिमायतनगर- 46.67 (429.02), देगलूर- 2.33 (131.00), बिलोली- 11.80 (208.60), धर्माबाद- 11.00 (242.65), नायगाव- 9.20 (255.60), मुखेड- 3.71 (179.12). आज अखेर पावसाची सरासरी 328.18 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 5250.90) मिलीमीटर आहे.
00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...