Monday, October 9, 2017

मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी
नांदेड दि. 9 :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी बुधवार 11 ऑक्टोंबर 2017 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
ही सुट्टी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील. जसे राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॅपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी आदींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधीत महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधीत आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने या आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे शासन परिपत्रक दि. 3 ऑक्टोंबर 2017 मध्ये नमुद केले आहे.
000000

   

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...