Tuesday, July 16, 2019

दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम



नांदेड दि. 16 :- नांदेड तालुक्यातील 86 नांदेड उत्तर व 87 नांदेड दक्षिण मतदारसंघात मतदार यादीत मतदार यादी दुरुस्‍तीसाठी भारत निवडणूक आयोग यांनी खालील प्रमाणे कार्यक्रम जाहीर केला आहे. 
अ. क्र.
पुनरिक्षणाचे टप्‍पे
कालावधी
1
प्रारुप मतदारयादीची प्रसिध्‍दी करणे 
15.07.2019 (सोमवार)
2
दावे व हरकती (अर्ज) सादर करणे
15.07.2019 ते 30.07.2019
3
विशेष मोहिमेचे दिनांक (Special compaign )
दिनांक 20.07.2019 (शनिवार)
दिनांक 21/07/2019 (रविवार),
दिनांक 27/07/2019 (शनिवार) व
 दिनांक 28/07/2019 (रविवार)
4
पर्यवेक्षक/सहा. मतदार नोंदणी अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारी व्‍दारा तपासणी
दिनांक 05 ऑगस्‍ट 2019 (सोमवार) पर्यंत
5
दावे व हरकती निकाली काढणे
13/08/2019 (मंगळवार) पर्यंत
6
उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी/जिल्‍हा निवडणूक आधिाकरी /मतदार यादी निरिक्षक यांचेव्‍दारा मतदार यादीची विशेष तपासणी डाटाबेसचे अदयावतीकरण पुरवणी यादयाची छपाई इत्‍यादी
दिनांक 16/08/2019 (शु्क्रवार) पर्यंत
7
मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी
दिनांक 19/08/2019 (सोमवार)
मतदारांना सूचना प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात येत असून महानगर पालिका क्षेत्रातील विविध प्रभागात याद्यांचे वाचन करून प्रसिद्धी देण्यात येणार आहे. उक्‍त कालावधीत मतदारांनी फॉर्म नं. 6, 7, 8, व 8अ तहसिल कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मनपा नोडल अधिकारी यांचेकडे जमा करावेत असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे. मतदारांनी यादीची पाहाणी करून विहीत मुदतीत मतदार यादीतील दुरुस्‍तीची कार्यवाही करुन राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.
00000

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी बीज भांडवल योजना



नांदेड दि. 16 :- सुशिक्षीत बेरोजगारांसाठी बीज भांडवल योजना / जिल्हा उद्योग केंद्राची कर्ज योजनेचे सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी उद्दीष्ट जिल्हा उद्योग केंद्रास प्राप्त झाले असून पात्र लाभार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सुशिक्षीत बेरोजगारांसाठी बीज भांडवल योजनेसाठी पात्रता अर्जदार किमान 7 वी उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे. उमेदवार बेरोजगार असावा.उमेदवाराचे महाराष्ट्रात पंधरा वर्षे वास्तव्य असावे.अर्जदाराने सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. योजनेत पात्र उद्योग / व्यवसायाच्या प्रकल्प खर्चाची कमाल मर्यादा 25 लाख रुपये राहील त्यात  एकूण स्थीर भांडवली गुंतवणूक खेळत्या भांडवलाचे सीमातिक भांडवल अंतर्भूत राहील. बीज भांडवल 15% प्रमाणे जास्तीत जास्त रु. 3 लाख 75 हजार रु. पर्यंत.   दहा लाख रुपयापेक्षा कमी प्रकल्प खर्च असलेल्या प्रकरणांमध्ये अनुसुचित जाती / जमाती / इतर मागासवर्गीय / अपंग / भटक्या / विमुक्तजाती जमातीसाठी बीज भांडवल प्रकल्पाचे  20 टक्के राहील. कर्जफेड, कर्ज दिल्यानंतर व्यापार सेवा उद्योगासाठी 6 महिन्यांचा विलंब अवधीनंतर 6 महिन्यापासून 4  वर्षापर्यंत लघुउद्योगसाठी 2 वर्षाच्या विलंब अवधीनंतर 3 ते 7 वर्षात 5 हप्त्यात परतफेड करावी. बीज भांडवल कर्जासाठी व्याजाचा दर द. सा. द. शे. 6 टक्के असून नियमीत परतफेड करणा-या   लाभार्थीस 3%  सवलत देण्यात येईल   थकबाकीदारास 1 टक्के दंड व्याज आकारण्यात येईल. बीज भांडवल कर्जाचा गैरवापार करणा-यास 2 टक्के दंड व्याज लावून एक रकमी वसुली करण्यात येईल. बीज भांडवल कर्ज मंजुरीनंतर जिल्हा उद्योग केंद्राचे नावे दुसरा अधिभार नोंदवणे आवश्यक आहे.
जिल्हा उद्योग केंद्राची कर्ज योजना - शिक्षणाची वयाची अट नाही. या योजनेत उद्योग सेवा उद्योग यासाठी  कर्ज मिळू शकते. योजनेत यंत्रसामुग्रीमधील एकूण गुंतवणूक रु. 2 लाखाच्या आत असावी. ही योजना 1981 नुसार 1 लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावात / ग्रामीण भागात लागू आहे. योजनेखाली उद्योग सेवा तसेच अस्तित्वात असलेल्या लघुउद्योगाच्या वाढीसाठी अर्ज करता  येतो. अर्ज 75 टक्के कर्ज मिळण्यासाठी वित्तीय संस्थेकडे (राष्ट्रीय बँका, व्यापारी बँका व्यापारी  सहकारी बँका) पाठविण्यात येतो. एकूण प्रकल्प खर्चाच्या सर्वसाधारण घटकांना 20% प्रमाणे रु.40 हजारापर्यंत अनु.जाती/जमातीसाठी 30 टक्के प्रमाणे रु.60 हजार पर्यंत मार्जीन मनी 4% दराने मिळेल ते पाच वर्षात परतफेड करावयाचे आहे. या योजनेतर्गत राष्ट्रीयकृत बँका, सर्व ग्रामीण बँका यांच्यामार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. ही योजना शहरी ग्रामीण भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे, अशी माहिती महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी दिली आहे.
0000000

बचत गटांसाठीच्या 'प्रज्ज्वला' चे नांदेडमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम



नांदेड, दि. ­­­16 :- राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रज्वलायोजना राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम 18 जुलै व 19 जुलै 2019 रोजी नांदेड शहर, लोहा, मुखेड, नायगाव येथे होणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील हे प्रशिक्षण होणार आहे.
"राज्यामध्ये सुमारे 3 लाख बचतगट असून त्यांच्याशी सुमारे साठ लाख महिला जोडलेल्या आहेत. हे बचतगट आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असल्याने आयोगाने बचतगटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यातून प्रज्ज्वला योजना आकारास आली आहे. प्रज्वला योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यात एक जिल्हा, एक वस्तुअसे क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत. त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल.  तिसऱ्या टप्प्यात बचतगटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी बचत गट बाजारजिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन आहे’,’ अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी दिली. 
या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. 
नांदेड जिल्ह्यातील प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून कार्यक्रमांचा तपशील पुढील प्रमाणे.
अ.क्र.
दिनांक
वेळ
स्थळ
उपस्थिती
१८.०७.२०१९
स.१०.०० ते दु.०१.३०
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड, स्टेडियम परिसर, नांदेड शहर.
स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर
१८.०७.२०१९
दु.०२.३० ते सायं०५.३०
व्यंकटेश गार्डन, लोहा.
स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर
१९.०७.२०१९
स.१०.०० ते दु.०१.३०
चौधरी फंक्शण हॉल, मुखेड
स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर
१९.०७.२०१९
दु.०२.३० ते सायं०५.३०
अंबिका गार्डन, नायगाव
स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर
****

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...