विशेष वृत्त
नांदेडमध्ये साकारणार ५२ एकरांवर 'हिंद-दी-चादर'चा भव्य ऐतिहासिक सोहळा !
८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहितीविशेष वृत्त
नांदेडमध्ये साकारणार ५२ एकरांवर 'हिंद-दी-चादर'चा भव्य ऐतिहासिक सोहळा !
८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहितीवृत्त क्रमांक 56
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना
मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा
नांदेड दि. 17 जानेवारी :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनाचा पुरवठा करणे ही योजना सुरू केली. नांदेड जिल्ह्यातील या योजनेसाठी तालुकानिहाय उदिष्ट देण्यात आहे.
योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक 8 मार्च 2017 अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आलेले आहे. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छुक पात्र बचतगटांनी सन 2025-26 साठी http://mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. त्याची सत्यप्रत 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 55
डाक विभागाकडून जीवन विमा योजनेअंतर्गत
विमा सल्लागारच्या भरतीसाठी मुलाखती
नांदेड दि. 17 जानेवारी :- नांदेड डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत "डायरेक्ट एजंट" (विमा सल्लागार) च्या भरतीकरिता मुलाखती घेण्यात येत आहेत. सदरील अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड येथे उपलब्ध आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून शुक्रवार 23 जानेवारी 2026 रोजी कार्यालयीन वेळत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड 431601 येथे थेट मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे व सोबत बियोडाटा मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन अधिक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे.
पात्रता व मापदंड
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी १८ वर्ष असावे. शैक्षणिक पात्रता: अर्जदार हा केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाची १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
श्रेणी : बेरोजगार/स्वयंबेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य ई. टपाल जीवन विमा प्रतिनिधी साठी थेट असे अर्ज करू शकतात.
उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. यात व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इ. बाबीवर चाचणी होईल. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये एवढी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी NSC/KVP च्या स्वरूपात असेल.
रुपये 5 हजार एवढी रक्कमेची NSC/KVP अधीक्षक डाकघर यांच्या नावाने प्लेज केल्यावर एजंट आयडी प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो IRDA ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवाना मध्ये रुपांतरीत केली जाईल. सदर परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स आणि कमिशन तत्वावर राहील असेही आवाहन अधिक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे.
00000
विशेष वृत्त क्रमांक 54
‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंद दी चादर कार्यक्रमाच्या प्रचारासाठी विविध शाळा सहभागी
वक्तृत्व स्पर्धेत कु. नियती भालेराव हिने पटकावला प्रथम क्रमांक
नांदेड, दि. १७ जानेवारी :- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रचार–प्रसिद्धीसाठी नांदेड जिल्ह्यातील शाळा आज चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उत्साही जयघोषाने दुमदुमून गेल्या. प्रभातफेऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी” या घोषणांनी शाळा व परिसर भारावून टाकत सर्वत्र देशभक्तीमय वातावरण निर्माण केले.
जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रभातफेऱ्यांच्या माध्यमातून हिंद-दी-चादर कार्यक्रमाची प्रभावी प्रचार–प्रसिद्धी करण्यात येत असून, या उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहाने सहभाग लाभत आहे. या माध्यमातून कार्यक्रमाबाबत व्यापक जनजागृती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज हुतात्मा जयंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हिमायतनगर (जि. नांदेड) येथे हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा सवना (ज.) येथेही वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील विद्यार्थिनी कु. नियती भालेराव हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच नांदेड तालुका, हिमायतनगर तालुका, देगलूर तालुका आदी ठिकाणी अनेक शाळांमध्ये प्रभातफेरी, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नांदेड येथे तालुकास्तरीय गायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व, गायन आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान व धर्मनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
०००
विशेष वृत्त क्रमांक 53
हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतली नांदेड जिल्हाधिकाऱ्यांची भेट
हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत दिली माहिती
नांदेड, दि. १७ जानेवारी :- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर नियोजन करण्यात आले असून, त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली.
यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती देत चर्चा केली. तसेच कार्यक्रमाच्या विविध बाबींवर समन्वय व व्यवस्थापनाबाबत विचारविनिमय करण्यात आला. हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनीही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती दिली. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी “अविरत महसूल” या पुस्तिकेची प्रत भेट देऊन राहुल गुप्ता यांचे स्वागत केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, कार्यकारी अधिकारी तथा हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमाचे शासकीय समन्वयक जगदीश सकवान, तहसीलदार आनंद देऊळगावकर आदी अधिकारी उपस्थित होते.
00000
विशेष वृत्त क्रमांक 52
हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
सामाजिक ऐक्य, सेवा व प्रेरणेचा ऐतिहासिक सोहळा
प्रत्येकाने जास्तीत जास्त योगदान देण्याचे आवाहन
नांदेड, दि. १७ जानेवारी :”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान,तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
मोदी मैदानावर कार्यक्रमस्थळी सुमारे ३५० स्टॉल उभारण्यात येणार असून प्रत्येक सामाजिक संघटनेने किमान ५ ते १० स्टॉल उभारून भाविकांना सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले. हे स्टॉल दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. प्रत्येक स्टॉलवर संबंधित संघटनेचे बॅनर लावण्यात येणार असून भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाद, अल्पोपहार, माहिती व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच २४ जानेवारी रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे स्वागत करून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याने सेवा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासाठी दोन दिवसांत ८ ते १० लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संघटनांनी सज्ज राहणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचा शाळा, महाविद्यालये व सामाजिक माध्यमांतून व्यापक प्रचार करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या बाहेर, पार्किंग स्थळी, स्टॉलसाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी वाहने व संबंधित व्यक्तींना प्रवेश पासेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य, सेवा आणि प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने जास्तीत जास्त सामाजिक संघटनांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा व “हिंद-दी-चादर” शहीदी समागम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या एकूण नियोजनाची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी उपस्थितांना दिली.
00000
विशेष वृत्त क्र. 137 ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...