Saturday, December 26, 2020

 18 कोरोना बाधितांची भर तर

29 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 26 :- शनिवार 26 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 18 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 10 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 8 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 29 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 643 अहवालापैकी 621 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 257 एवढी झाली असून यातील 20 हजार 201 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 287 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 570 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 12, हदगाव कोविड रुग्णालय 4, देगलूर कोविड रुग्णालय 7, खाजगी रुग्णालय 4 असे एकूण 29 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.03 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 4, लोहा तालुक्यात 1, अर्धापूर 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 1, नायगाव 1, किनवट 1 असे एकुण 10 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 3, भोकर 1, पंजाब 1, देगलूर 1, हिंगोली 2 असे एकुण 8 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 287 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 23, मुखेड कोविड रुग्णालय 15, देगलूर कोविड रुग्णालय 16, हदगाव कोविड रुग्णालय 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 103, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 51, औरंगाबाद येथे संदर्भीत 1, हैद्राबाद येथे 1, खाजगी रुग्णालय 18 आहेत.   

शनिवार 26 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 159, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 57 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 76 हजार 543

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 51 हजार 296

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 257

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 201

एकुण मृत्यू संख्या-570

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.03 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-365

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-287

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.          

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...