Saturday, March 2, 2024

 वृत्त क्र. 196 

बेनामी वाहनांचा आरटीओ मार्फत लिलाव

उत्सुकांसाठी नोटीस फलकावर यादी

 

नांदेड दि. 2 :- मोटार वाहन कर जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसुली योग्य असलेल्या रकमेच्या मागणी प्रित्यर्थ येणे असलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा वाहनधारकांना तीन नोटीस देण्यात आलेल्या आहेत. परंतु त्यांना सदर पत्र अपूर्ण पत्तावा इतर कारणाने पत्र पोच झाले नसल्याने या प्रकरणात न्यायालयाची परवानगी घेवून दावा न केलेल्या प्रकरणामध्ये समाविष्ट करण्याच्या मंजूरीस्तव व न्यायालयाची परवानगी घेवून या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नोटीस बोर्डवर अशा बेनामी वाहनांची यादी लावण्यात आली आहे संबंधितानी यांची नोंद घ्यावीअसे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले आहे.

00000

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...