Sunday, April 14, 2019


कामगार मतदारांसाठी
नियंत्रण कक्षाची स्थापना 

नांदेड, दि. 13 :- जिल्ह्यातील कामगार मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मतदानाच्या दिवशी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी भरपगारी सुट्टी अथवा अपवादात्मक परिस्थितीत दोन तासाची सवलत देण्याचे निर्देश असून नांदेड, देगलूर, कंधार येथे कामगार मतदारांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 
लोकसभा मतदारसंघातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या  शॉपिग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदी आस्थापनामध्ये कार्यरत मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावाण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश आहेत.
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय नांदेड येथे एस. के. भंडारवार (सुविधाकार) (मो.9823212434) यांची नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  दुकाने निरीक्षक यांचे कार्यालय देगलूर येथे ए. डी. कांबळे (सुविधाकार) (9423439165) तर दुकाने निरीक्षक यांचे कार्यालय कंधार येथे डी. बी. फुले (माथाडी निरीक्षक) (9767048031) यांना नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सर्व कारखाने व आस्थापनांनी मतदारांना मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत देणे आवश्यक आहे. सुट्टी न मिळाल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास मालक, आस्थापनाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्व कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी रजा दयावी व आपणही मतदानाचे कर्तव्य बजवावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांनी केले आहे.
मतदानाची शपथ
लोकशाही बळकटीसाठी मतदारांना अधिक साक्षर व जागृत करण्याच्या उद्देशाने स्वीप-3 हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून कामगार कार्यालयाच्यावतीने मतदारात जनजागृती करण्यात येत आहे. विविध आस्थापना व कारखान्यात कामगारांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात येत आहे.
एमआयडीसी धनेगाव, कृष्णूर, धर्माबाद येथील पायोनियर, सिट्रस, फ्लीमीगो, साईसिम्रनसह  अनेक कारखान्यातील अडीच ते 3 हजार कामगारांना मतदान प्रतिज्ञा देऊन जनजागृती करण्यात येत आहे. मतदरांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता सर्वांनी मतदान करावे, असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांनी केले आहे.
000000



लोकराज्य निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन
नांदेड, दि. 12 :- निवडणूक प्रक्रियेची ओळख करून देणाऱ्या तसेच मतदार व उमेदवारांसोबतच अभ्यासक, विश्लेषकांना मार्गदर्शक ठरणा-या लोकराज्यच्या निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी यांचे कक्षात करण्यात आले.  
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास, मीडिया कक्ष प्रमुख राजेंद्र चव्हाण, डॉ. दीपक शिंदे, श्री मिलिंद व्यवहारे, विधी अधिकारी  आनंद माळाकोळीकर, नायब तहसीलदार नितेश कुमार बोलेलु, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे आदी उपस्थित होते.
मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध गोष्टींची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. मतदार नोंदणी केलेली कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आयोगातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी 'स्वीप'मोहीम राबवली गेली. त्याद्वारे आखण्यात आलेल्या यशस्वी उपक्रमांची माहिती या अंकात देण्यात आली आहे.
याशिवाय महिला व तृतीयपंथीय मतदारांचा वाढता सहभाग,  मतदार जनजागृती, मतदान प्रक्रिया, निवडणूक अधिकारी-कर्मचा-यांचे प्रशिक्षण, पेड न्यूज, समाज माध्यमांबाबत निवडणूक काळात घ्यावयाची खबरदारी, निवडणुकांचे बदलते तंत्र, निवडणुकीतील परिवर्तन युग, निवडणूक खर्चावर नियंत्रण आदींबाबत लेखांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत.
नाविन्यूपर्ण उपक्रम
निवडणूक प्रक्रियेसंदर्भात नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगातर्फे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले. मतदार जनजागृती, व्हीव्हीपॅट यंत्र, सी-व्हिजिल ॲप हे त्याचाच एक भाग आहे. व्हीव्हीपॅट यंत्रामुळे मतदाराला आपण केलेल्या मतदानाची खात्री पटणार आहे. या यंत्राची रचना व कार्य याबाबत माहिती देण्यात आली आहे. निवडणूक काळात तिसरा डोळा म्हणून भूमिका बजाणाऱ्या सी-व्हिजिलॲपचा वापर कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सोबतच दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे कसे होईल याबाबातदेखील निवडणूक आयोगाने खबरदारी घेतली आहे. त्यासाठी पीडब्लूडी ॲप व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याबाबत आढावा या अंकात घेण्यात आला आहे.
मतदारांना ऑनलाईन ओळखपत्र, मतदार यादीतील बदल आदींबाबत अर्ज कसा करता येईल, रंगीत ओळखपत्र, मतदानासाठी कुठले ओळखपत्र ग्राह्य धरता येईल, आपले नाव मतदार यादीत कसे शोधायचे आदींबाबत माहिती देण्यात आली आहे.      
सुलभ संदर्भ
अभ्यासक, पत्रकारांना उपयुक्त ठरेल अशी 2009, 2017 च्या निवडणूक निकालाच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रे, एकूण मतदार नोंदणी, पुरुष व महिला मतदारांची संख्या, एकूण मतदार व एकूण झालेले मतदान, पहिल्या पाच उमेदवारांची नावे, त्यांचा पक्ष व त्यांना मिळालेल्या मतांची संख्या आदी माहितीचा यात समावेश करण्यात आला आहे.
आदर्श आचार संहिता
आदर्श आचार संहितेबाबात नेहमी विचारल्या जाणा-या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे या अंकात देण्यात आली आहेत. उमेदवार, कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांसाठी ही प्रश्नोत्तरे मार्गदर्शक ठरणारी आहेत. याची सविस्तर माहिती अंकात समाविष्ट करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेबांचे विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रौढ मताधिकाराचे कट्टर समर्थक होते. त्यांनी केलेल्या मागणीनुसार भारतीय संविधानाने एक व्यक्ती, एक मतदार आणि एक मूल्यहे तत्त्व स्वीकारून भारतीयांना प्रौढ मतदानाचा अधिकार मिळवून दिला. याबाबाच्या लेखाचाही अंकात समावेश करण्यात आला आहे. या अंकाची किंमत 10 रुपये असून अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.
0000


मी मतदान करणारच.... या सेल्फी पॉइंट चे उद्घाटन
नांदेड, दि. 12 :- मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी मी मतदान करणारच.... यासेल्फी पॉइंटचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व निवडणूक निरीक्षक हरदीप सिंग यांच्या  हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उद्घाटन करण्यात आले आहे. 
नांदेड  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. मतदानाविषयी जनजागृती व्हावी. स्वीपकक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्याकडून या सेल्फी पॉइंटचे  आयोजन करण्यात आले आहे. शहरात बसस्थानक व रेल्वे स्थानक याठिकाणी सुद्धा सेल्फी पॉइंट लावण्यात आले आहे. या ठिकाणी भेट देऊन सर्व नागरिकांनी सेल्फी काढण्याचा आनंद घ्यावा. सोशल मीडियावर प्रसारित करुन मतदार जनजागृती अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा  व जास्तीत जास्त  मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी, निवासी जिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, अनुराधा ढालकरी, गीता ठाकरे, संतोष कंदेवार, किरण अंबेकर, प्रशांत डिग्रसकर, दिलीप बनसोडे,  मिलिंद व्यवहारे तसेच कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सेल्फी पॉइंट हा उपक्रम  यशस्वी करण्यासाठी स्वीप कक्षाचे सदस्य प्रलोभ कुलकर्णी, शेख रुस्तूम, रवी ढगे,कविता जोशी, गणेश रायेवार, प्रसाद शिरपूरकर,  धिरेन आठवले,अभिजीत हिवरे  यांनी परिश्रम घेतले.
00000

  वृत्‍त क्र. 378   आज संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार   बुधवारी सायंकाळी 6 वाजेपासून शांतता कालावधीला सुरुवात होणार   जिल्ह्यामध...