Tuesday, November 21, 2017

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांचा दौरा
नांदेड, दि. 21 :- महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा पुढीलप्रमाणे राहील.
बुधवार, 22 नोव्हेंबर, 2017 रोजी औरंगाबाद येथुन मोटारीने शासकीय विश्रामगृह शासकीय विश्रामगृह  नांदेड येथे रात्री 8.30   वा. आगमन, राखीव व मुक्काम.
गुरुवार 23 नोव्हेंबर सकाळी 10.15 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथून श्री गुंडागुरुधाम देगलूरकडे प्रयाण. दुपारी 12 वा. श्री गुंडागुरुधाम देगलूर आगमन व सदगुरु श्री गुंडामहाराज देगळुरकर द्विशताब्दी पुण्यस्मरण महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता मोटारीने देगलूर येथून अंतापूर ता. देगलूरकडे प्रयाण. दुपारी 3 वा. अंतापुर येथे आगमन व अंतापूर ग्रामपंचायत नवीन इमारत लोकार्पण सोहळा व आर ओ प्लॅटच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सायं 5 वा. मोटारीने अंतापूर येथून शासकीय विश्रामगृह  नरसी ता. नायगावकडे प्रयाण. सायं. 5.50 वाजता शासकीय विश्रामगृह नरसी येथे आगमन व राखीव. सायं. 6.15 वा. मोटारीने नरसी येथून कासराळी ता. बिलोलीकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. कासराळी येथे आगमन व माजी आमदार गंगारामजी पोशट्टी ठक्करवाड यांच्या नातवाच्या विवाह समारंभास उपस्थिती. सोईनुसार मोटारीने कासराळी येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. रात्री 11.15 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथून नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11.35 वा. अंजठा एक्सप्रेसने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

00000
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा  
नांदेड, दि. 21 :- राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सा. उ. वगळून)  मंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवार 22 नोव्हेंबर 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
बुधवार 22 नोव्हेंबर 2017 रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे आगमन व नांदेड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीस उपस्थित. सकाळी 11.30 वा. नांदेड येथून शासकीय वाहनाने बीडकडे प्रयाण करतील.

000000
 नांदेड ग्रंथोत्सवामाझ्याजवळ बसा खुदुखुदु हसा"
या विनोदी कार्यक्रमाचे आज आयोजन  
नांदेड, दि. 21 :-  नांदेड ग्रंथोत्सवानिमित्त नांदेडकरांच्या मनोरंजनासाठी हसण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कुसुम सभागृहात बुधवार 22 नोव्हेंबर रोजी सांय. 6.30 वा. माझ्याजवळ बसा खुदुखुदु हसा" हा ॲड. अनंत खेळकर, अकोला यांचा तुफान विनोदी कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात शेरोशायरी, इरसाल, काव्य भन्नाट किस्से याची मेजवाणी लाभणार असून कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव 2017 निमित्त आयोजित या भन्नाट हास्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी केले आहे.
000000
किनवट नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका
मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडाव्यात
- निवडणूक निरीक्षक राम गगराणी
            नांदेड दि. 21 :- किनवट नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडाव्यात यासाठी कायदा व सुव्यवस्था, संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक तथा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी यांनी दिल्या.
किनवट नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध उपाययोजनाची आखणी, राज्‍य निवडणूक आयोगाच्‍या विविध आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या जिल्‍हास्‍तरीय निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक निवडणूक निरीक्षक राम गगराणी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.  
किनवट नगरपरिषदेची बुधवार 13 डिसेंबर, 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे आदी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  
            या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनुराधा ढालकरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे , रासयो समन्वयक प्रा. एन. व्ही. कांबळे, माहूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डोईफोडे काकासाहेब, सहा. प्रा. परिवनहन अधिकारी विजय तिराणकर , जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अजय क. अटोर, बी. आर. जायभाये, जि.प्र.आ. पराग वानखेडे आदिंची यावेळी उपस्थिती होती.

0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...