Thursday, January 20, 2022

ठिबक, तुषार सिंचनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्हयात ऊस, केळी, हळद पिकास ठिबक सिंचनाचा व सोयाबीन, हरभरा पिकास तुषार सिंचनाचा वापर करून मोठया प्रमाणात क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत सुक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार सिंचन) या बाबीसाठी लाभ देण्यात येतो. यापुर्वी या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी यांस 55 टक्के व इतर शेतकरी यांना 45 टक्के खर्च मर्यादेच्या अनुदान देण्यात येत होते. सन 2021-22 मध्ये केंद्र शासनाने खर्चाच्या मापदंडामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे अनुदानाच्या रक्कमेतही वाढ झाली आहे. सन 2021-22 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना देय 55 टक्के अनुदानास पुरक अनुदान 25 टक्के व इतर शेतकऱ्यांना (5 हेक्टरच्या मर्यादेत) देय 45 टक्के अनुदानास पुरक अनुदान 30 टक्के देय आहे. याप्रमाणे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना 80 टक्के व इतर शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान मिळणार आहे. 

या योजनेअंतर्गत यापूर्वी व सध्या 1 हेक्टरसाठी मिळणारा लाभ पुढीलप्रमाणे आहे. ठिबक सिंचन (1 हेक्टर साठी) लॅटरल अंतर (मी.) 1.2X0.6, पुर्वीची खर्च मर्यादा 1 लाख 12 हजार 237 रुपये, यापुर्वी देय अनुदान 55 टक्के 61,730 रुपये तर 45 टक्के 50 हजार 507 रुपये आहे. सन 2021-22 मधील खर्च मर्यादा 1 लाख 27 हजार 501 रुपये. सन 2021-22 मधील देय अनुदानात 80 टक्के 1 लाख 2 हजार 1 रुपये तर 75 टक्के 95 हजार 626 रुपये आहे. तसेच लॅटरल अंतर (मी.) 1.5X1.5, पुर्वीची खर्च मर्यादा 85 हजार 603 रुपये, यापुर्वी देय अनुदान 55 टक्के 47 हजार 82 रुपये तर 45 टक्के 38 हजार 521 रुपये. सन 2021-22 मधील खर्च मर्यादा 97 हजार 245 रुपये व सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्के 77 हजार 796 रुपये आणि 75 टक्के मध्ये 72 हजार 934 रुपये आहे. लॅटरल अंतर (मी.) 5X5, पुर्वीची खर्च मर्यादा 34 हजार 664 रुपये, यापुर्वी देय अनुदान 55 टक्के 19 हजार 65 रुपये, 45 टक्केत 15 हजार 599 रुपये आहे.  सन 2021-22 मधील खर्च मर्यादा 39 हजार 378 रुपये. सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्केत 31 हजार 502 रुपये तर 75 टक्केत 29 हजार 533 रुपये आहे. याशिवाय पिकांच्या वेगवेगळया अंतरानुसार अनुदान देय आहे.


तुषार सिंचन क्षेत्र
 1 हेक्टर पर्यंत पुर्वीची खर्च मर्यादा (75 एमएम) 21 हजार 901 रुपये, यापुर्वी देय अनुदान 55 टक्केत 12 हजार 45 रुपये तर 45 टक्केत 9 हजार 855 रुपये. सन 2021-22 मधील खर्च मर्यादा (75 एमएम) 24 हजार 194 रुपये. सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्केत 19 हजार 355 रुपये तर 75 टक्केमध्ये 18 हजार 145 रुपये अनुदान देय राहील. तसेच तुषार सिंचन क्षेत्र 2 हेक्टर पर्यंत पुर्वीची खर्च मर्यादा 31 हजार 372 रुपये, यापुर्वी देय अनुदान 55 टक्के 17 हजार 254 रुपये, 45 टक्केत 14 हजार 117. सन 2021-22 मधील खर्च मर्यादा (75mm) 34 हजार 657 रुपये व सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्के 27 हजार 725 रुपये तर 75 टक्केमध्ये 25 हजार 992 रुपये अनुदान देय राहील, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

000000

 नांदेड जिल्ह्यात 720 व्यक्ती कोरोना बाधित 

तर 527 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या हजार 234 अहवालापैकी 720 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 614 तर अँटिजेन तपासणीद्वारे 106 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 96 हजार 133 एवढी झाली असून यातील 89 हजार 901 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला हजार 575 रुग्ण उपचार घेत असून यात बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्थाप्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्कसॅनिटायझरसुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे पिमप्रला हिंगोली येथील 8वर्षे वयाच्या महिलेचा 19 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 657 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 430नांदेड ग्रामीण 53भोकर 2देगलूर 26धर्माबाद 1कंधार 2, हदगाव 1लोहा 12मुदखेड 1, मुखेड 12, नायगाव 10हिमायतनगर 4, बिलोली 1, माहूर 1अर्धापूर 12, परभणी 13, हिंगोली 8, लातूर 4, उमरखेड 1, हैद्राबाद 5, जालना 1, जळगाव 1, आदिलाबाद 3, औरंगाबाद 2, केरळ 1, नाशिक 1, निजामाबाद 2, उस्मानाबाद 1, कर्नाटक 1, तेलंगणा 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18नांदेड ग्रामीण 2बिलोली 24धर्माबाद 28हदगाव 3, लोहा 1, माहूर 5, मुखेड 6, नायगाव 10, उमरी 9 असे एकूण 720 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 463नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 50खाजगी रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड  हॉस्पिटल नांदेड 2 असे एकुण 527 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 28जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 708नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण हजार 807हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 22, बिलोली कोविड रुग्णालय असे एकुण हजार 575 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 25 हजार828

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 15 हजार 154

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 96 हजार 133

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 89 हजार 901

एकुण मृत्यू संख्या-हजार 657

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.51 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-57

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-हजार 575

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावाअसेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा ही  रविवार 23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते सायं 5 यावेळेत नांदेड शहरातील 32 केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.

 

या परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 23 जानेवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 7  वाजेपर्यंत या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहीलअसे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...