Wednesday, December 2, 2020

 

30 कोरोना बाधितांची भर तर

38 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी तर एकाचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- बुधवार 2 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 30 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 15 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 38 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 1 हजार 297 अहवालापैकी 1 हजार 249 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 441 एवढी झाली असून यातील 19 हजार 342 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 355 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 550 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी कंधार तालुक्यातील मंगलसांगवी येथील 73 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, भोकर तालुक्यांतर्गत 2, हदगाव कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, मुखेड कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 6 असे एकूण 38 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.62 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 10, कंधार तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1 , हिंगोली 1 असे एकुण 15 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 11, अहमदनगर 1, मुखेड 1, नागपूर 2  असे एकुण 15 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 355 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 37, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 29, मुखेड कोविड रुग्णालय 17, किनवट कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 76, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 132, खाजगी रुग्णालय 30 आहेत.

 

बुधवार 2  डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 183, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 78 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 53 हजार 307

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 28 हजार 850

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 441

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 342

एकूण मृत्यू संख्या- 550

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.62 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-496

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-355

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.

 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

000000

 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 9 डिसेंबरला

नांदेड (जिमाका) दि. 2:-  नांदेड जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवार 9 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 1 वा. व्हिडीओ कॉन्फरन्स गुगल मीट (Video Conference Google Meet) या ॲपद्वारे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.

00000

 

दहावी व बारावी परीक्षेसाठी  

ऑनलाईन नोंदणी अर्जास मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 2:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आालेली आहे. त्यानुसार 2021 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा व माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नियमित शुल्काने भरण्याबाबत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी पुढे नमूद केलेल्या सुचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे. 

इयत्ता दहावी व बारावी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या मुदतीवाढीबाबतच्या तारखा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी तारखा रविवार 29 नोव्हेंबर ते बुधवार 30 डिसेंबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरणे. सोमवार 30 नोव्हेंबर ते गुरुवार 31 डिसेंबर 2020 या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करणे. मंगळवार 5 जानेवारी 2021 रोजी संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे याप्रमाणे तपशील आहे.

 

खाजगी विद्यार्थ्यांनी इ. दहावी व बारावी साठी नांवनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहे. त्यामूळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही, यांची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा . अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी इंग्रजी माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यावाचून अर्ज भरण्यास सुरवात करावी.

अर्ज भरण्यासाठी इयत्ता 10 वीसाठी http://form17.mh-ssc.ac.in व इयत्ता 12 वीसाठी http://form17.mh-hsc.ac.in संकेतस्थळ असे आहे.

 

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला मूळप्रत, नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर, मोबाईद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपुर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट , शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्काची पावती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहित मुदतीत जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क, इयत्ता बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क राहिल. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज करावयाचे आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यमनिहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक / तोंडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यायाना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. इयत्ता दहावी , इयत्ता बारावी- 2021 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा.माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

 

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या/ प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करुन

घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क

केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

0000

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा

योजनेसाठी शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विजेचा शॉक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात  वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना अंपगत्व येते . घरातील करत्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबास उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास  त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार नोंद नसलेले  शेतकऱ्यांच्या कुटूंबातील कोणतेही एक सदस्य यामध्ये आई , वडील, शेतकऱ्यांचे पती / पत्नी, मुलगा व अविवाहीत यापैकी कोणतेही एक व्यक्ती  असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकुन दोन जनाकरीता  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली  आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

विम्यापासुन मिळणारे आर्थीक लाभ

अपघाती मृत्यु रु. 2 लाख, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे रु. 2 लाख, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे रु. 2 लाख, अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे रु. 1 लाख असे विम्यापासून आर्थिक लाभ मिळणार.

विमा संरक्षणासाठी समाविष्ठ असलेले अपघात

रस्ता, रेल्वे अपघात, उंचावरून पडून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू , नक्षवाद्यांकडुन होणाऱ्या हत्या , अपघाती विषबाधा,  जनावरांच्या हल्ल्यांमुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यु , विजेचा धक्का, विज पडून  मृत्यू  सर्पदंश, विंचु दंश खुन, दंगल इत्यादीमुळे होणाऱ्या अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याव्दारे आर्थिक लाभ मिळु  शकतो.

दावा करण्यास लागणारे कागदपत्रे

तालुका  कृषि अधिकारी यांचे दिनांकासहीत पत्र (मुळ प्रत), संपुर्ण दावा अर्ज वारसदाराच्या मोबाईल नंबरसहीत सहित भरलेला, वारसदाराचे नॅशनलाईज बॅक खाते पुस्तक (झेरॉक्स) (जनधनचे नको), घोषणापत्र अ व ब (अर्जदाराच्या  फोटो सहित) वयाचा दाखला (मतदान कार्ड/पॅन कार्ड/ वाहन परवाना/ जन्माचा दाखला/ पासपोर्ट / शाळेचा दाखला ) साक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत जोडावी. सातबारा 6 , 6 ड फेरफार मुळ प्रत मृत्यू प्रमाणपत्र (मुळ प्रत) (एफआयआर) प्रथम माहिती अहवाल, अकस्मात मृत्युची खबर घटनास्थळ पंचनामा इन्क्वेष्ट पंचनामा (मरणोत्तर पंचनामा) पोस्टमॉर्टम रिपोर्ट (शवविच्छेदन अहवाल )वाहन चालविण्याचा वैध परवाना व्हिसेरा रिपोर्ट अपंगत्वाचा दाखला व फोटो, दोषरोप पत्र ,औषध उपचाराचे कागदपत्रे, अपघात नोंदणी 45 दिवासाचे आत करावे .

 

वहितीदार नोंद नसलेल्या व्यक्तीस दावा करण्यास लागणारी कागदपत्रे

ज्या शेतकऱ्याच्या वहिती  खातेधारक म्हणून नोंद आहे.  त्याचा वारस म्हणुन प्रस्ताव सादर करतो आहे. त्या शेतकऱ्याच्या सातबारा उतारा, 6  (जुना फेरकार), अपघाता संबंधी सर्व लागणारी कागदपत्रे जशीच्या तशी शिधापत्रिका (राशनकार्ड) वहितीधारक खातेदार शेतकऱ्याशी नाते स्पष्ट करणारी कागदपत्रे (पुरावा).

योजनेचा लाभ घेण्यासाठी

संबंधित जिल्हा, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क करा. विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. ली. विभागीय कार्यालय: ऑफिस नं. 2020 दुसरा मजला, विनर्स कोर्ट झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे-411040 संर्पक- 020 26832667/ 41212222  Website : www. universalsompo.com.

विमा सल्लागार

जयका इंश्युरन्स ब्रोकरेज प्रा.लि. रजि.ऑफिस : 2 रा मजला, जयका बिल्डींग कमर्शियल रोड, सिव्हिल लाईन्स, नागपुर-440001  या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...