Friday, March 8, 2024

वृत्त क्र. 223

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य

प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. श्रीमती निलिमा सरप (लखाडे) यांचा दौरा

 

नांदेड दि. 8 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे व डॉ. श्रीमती निलिमा शंकरराव सरप (लखाडे) हे हे रविवार 10 व 13 मार्च 2024 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

रविवार 10 मार्च रोजी सायं. 8 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. सोमवार 11 मार्च 2024 रोजी उमरखेड, पुसद, दिग्रस, महागावकडे प्रयाण करतील. बुधवार 13 मार्च रोजी सायं. 5 वा. चंद्रपूर येथून नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.

000

वृत्त क्र. 222

 मतदानाच्या टक्केवारीचे सर्व विक्रम तोडणारी ही निवडणूक ठरावी : जिल्हाधिकारी

निवडणूक काळातील प्रचार करणाऱ्या स्वीप कक्षाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

नांदेड दि. ८ : मतदान करणेमताधिकार बजावणेनिवडणुकीच्या दिवशी सर्व काम बाजूला सारून मतदान केंद्रावर पोहोचणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्याची हक्काची लढाई आहेहे सामान्यातील सामान्य नागरिकाला समजून सांगणे निवडणूक काळामध्ये स्वीप कक्षाचे काम असून एक कल्पकतेने पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज स्वीप (सिस्टिमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन) उपक्रमासंदर्भात प्रचार प्रसार करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

 या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेमनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडेअतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकरनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरउपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, नोडल अधिकारी डॉ पंजाब खानसोळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक पाचंगे, आनंदी वैद्यप्रलोभ कुलकर्णीराजेश कुलकर्णी साईनाथ चिद्रावारलोककला तज्ञ डॉ.सान्वी जेठवाणी यांच्यासह हजारो फॉलोअर असणारे समाज माध्यमातील सक्रिय सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर उपस्थित होते.

 यावर्षी रांगा नाहीच प्रतीक्षालय असतील

यावर्षी उन्हामध्ये मतदानाला मतदारांना ताटकळत राहावे लागणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या संख्येतील मतदारांना सावली मिळेल व अन्य सुविधा मिळेल अशा पद्धतीचे प्रतीक्षालय उभारल्या जातीलयाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वेगवेगळ्या स्पर्धांची घोषणा लवकरच

यावेळी तरुण पिढीच्या आवडीनिवडींना लक्षात घेऊन समाज माध्यमांवर प्रचार प्रसार करणाऱ्या विविध स्पर्धांची घोषणा स्वीप कक्षाकडून करण्यात येणार आहे. यामध्ये आकर्षक रील तयार करणेसमाज माध्यमांवरील लक्षवेधी पोस्ट तयार करणेआकर्षक स्टेटस ठेवणे तसेच युवकांसाठी मोठ्या स्पर्धांची घोषणा जिल्हा प्रशासनामार्फत लवकरच केली जाणार आहे.

 प्रत्येक वस्तीमध्ये शंभर टक्के मतदान

या बैठकीत नागरिकांनी सुद्धा शंभर टक्के मतदानासाठी त्यांच्या काही भन्नाट आयडिया शेअर कराव्यात असे आवाहन करण्यात आले विशेषतः नव मतदार मतदान न करता आपले कर्तव्य बजावता या निवडणुकीत बाजूला राहू नयेयाकडे लक्ष वेधण्याच्या आवाहन त्यांनी केले.

पारंपारिक लोककला माध्यमांचाही वापर

या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पारंपारिक माध्यमांनीवृत्तपत्रे व समाजसेवी संघटनांनी या कार्यामध्ये प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. रेडिओदूरदर्शनवृत्तपत्रेलोककला यांच्यासोबतच अन्य पारंपारिक माध्यमांमार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शाळकरी मुलांचे पालकांना आवाहन

विविध स्पर्धांच्या माध्यमातूनपत्र लेखनाच्या माध्यमातून आणि शाळेतील उपक्रमांच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आपल्या पालकांना आवाहन करणाऱ्या अनेक उपक्रमाची आखणी ही या बैठकीत करण्यात आली. मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याच्या अहवाल आता मुले आपल्या पालकांना विविध उपक्रमातून करणार आहेत.

0000





वृत्त क्र. 221

 नांदेडमध्ये नवमतदार युवतींचा महिला दिनाला लोकशाही जागर

प्रमुख रस्त्यांवर रॅलीचे आयोजनमताधिकार बजावण्याचे आवाहन

 

नांदेडदि 8 : आपल्या एका मताने काय फरक पडते. पाठिंबा ,विरोध ,तटस्थताही माहिती पडते. मात्र त्यासाठी नव मतदारांनी लोकशाही व्यवस्था अधिक बळकट व समृद्ध करण्यासाठी लोकशाहीचा श्वास असणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे 18 वर्षावरील प्रत्येकाने आपला मताधिकार बजावावा ,असे आवाहन करत नांदेड शहराची पहाट आज नवमतदार युवतींनी दुमदुमून सोडली. महिला दिनाला शेकडो नवयुवतीची रॅली लक्षवेधी ठरली.

 

नव मतदार युवती व महिलांनी मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात मतदान करावेयासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या विशेष रॅलीचे व बालिका पंचायत विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. या कल्पक आयोजनाला पाठबळ देत जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेनांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी शहरात रॅलीमध्ये सहभागी होत नव मतदार युवतींचा उत्साह वाढविला. सकाळी दीड तास युवतींच्या उत्साहात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही रॅली शहराच्या प्रमुख रस्त्यावर लोकशाहीचा जागर करीत होती. मतदान का कशासाठी या संदर्भातील अनेक घोषवाक्यहातातील फलक यावेळी लक्ष वेधून घेत होते. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने नव मतदार युवती व महिलांसाठी मी मतदान का व कशासाठी करणार या विषयावर नांदेड शहरातून आज शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते.

 

सकाळी साडेसात वाजता नांदेड शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. प्रथम महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊतमुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवालजिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेनांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडेयांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून व रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावारमहिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम -कदमप्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगेमाध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगरसमाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवारडॉ. सान्वी जेठवाणीउप शिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर आदींची उपस्थिती होती.

 

वय 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुली आता पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील. सर्व तरुण मुलींनी स्वतःला प्रश्न विचारावा. मी मतदान काआणि कशासाठीकरणार. आपणच विवेकाने विचार करावा या हेतूने या रॅलीचे अयोजन करण्‍यात आले होते. या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणींनी Why will i vote ? तसेच विवेकाने विचार करायला लावणारे विविध फलक अनेकींच्या हातात होते. मी मतदान का व कशासाठी करणार याविषयीचे मनोगतही नव मतदार युवतीने यावेळी व्यक्त केले. अनेक नव मतदार युवती भारतीय परंपरेतील वेशात रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. रॅलीचा समारोप शहरातील आयटीआय परिसरातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नांदेड फ्लॉगर्स व भोकर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या युवक-युवतींनी मतदान जनजागृती संदर्भात पथनाट्य सादर केले.

 

समारोपाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबोधित केले. नांदेड जिल्हा परिषदेने विविध नव-नवे अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. त्यामधील बालिका पंचायत हा अभिनव उपक्रम आहे. ज्यामध्ये गावाच्या निर्णय प्रक्रियेत मुलींचा सहभागत्यांच्या मतांचा विचार घेतला जात आहे. यामधूनच मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईलअसे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत त्यांनी व्यक्त केले. भारताचा विकास लोकशाही व्यवस्थेतून होणार आहे. त्यासाठी 100 टक्के मतदान हाच एकमेव मार्ग आहे. तो आपला मताधिकार आहेच. मात्र राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे. यातून जनाधार कळत असतो. जनाधार व्यक्त करण्याच्या या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी केले. तसेच उपस्थितांना त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शपथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी व मिलिंद व्यवहारे यांनी तर आभार डॉ. विलास ढवळे यांनी मानले. या रॅलीत नांदेड शहरातील विविध महाविद्यालयातील युवतीमहिलाअधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

चौकट - 

नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने गावा-गावातून शैक्षणिकसामाजिकआर्थिक व राजकीय उन्नतीसाठी बालिका पंचायत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत देगलूर तालुक्यातील येरगीहदगाव तालुक्यातील सावरगाव माळ व अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील बालिका पंचायतच्या युवतींचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व बुके देऊन गौरव करण्यात आला.

00000








 वृत्त क्र. 220 

शासकीय तंत्रनिकेतन येथे 12 मार्च रोजी तांत्रिक प्रदर्शन

 

नांदेड दि. 8 : शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील विविध शाखांच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट्सचे तांत्रिक प्रदर्शन (एक्झिबिशन) दिनांक 12 मार्च 2024 रोजी दुपारी ते यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. दहावीबारावी (विज्ञान) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी विविध शाखेंची माहिती (विद्युतमाहिती तंत्रज्ञानयंत्रस्थापत्यवैद्यकीय अनुविद्युतउत्पादन) व्हावी तसेच संस्थेतील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या तांत्रिक प्रोजेक्ट्स पाहून विद्यार्थ्यांच्या प्रगती संदर्भात जाणून घेण्याची ही उत्तम संधी आहे.

 

या प्रदर्शनासाठी कोणतेही शुल्क नसून प्रदर्शनास दहावी, बारावी (विज्ञान) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती अवगत करावीअसे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉनागेश जानराव यांनी केले आहे.

0000

वृत्त क्र. 219 

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारा

नांदेड जिल्ह्यातील 5 सेवाभावी संस्था व 12 व्यक्तींना पुरस्कार

 

नांदेड दि. 8 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य  करणारे समाजसेवक / व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यात सन 2019-20, 2020-21, 2021-22  2022-23 मध्ये एकुण 5 सेवाभावी संस्थांना व 12 व्यक्तींना विविध वर्षामध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागास जाती कल्याण, शारिरीक, मानसिकदृष्टया अपंग, कुष्ठरोगी इत्यादीसाठी तसेच समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा गौरव करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने प्रतिवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येतो.

 

तसेच मातंग समाजातील कलात्मक, समाकल्याण साहित्य, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे नामवंत कलावंत,साहित्यीक व समाजसेवक तसेच समाज कल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य,अंधश्रध्दा निर्मुलन व जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा गौरव करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रतीवर्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार  महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येतो.  व  सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचे शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रतीवर्ष महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येतो.

 

नांदेड जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था याची माहिती पुढील प्रमाणे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण   

2019-20

अष्टविनायक ग्रामकल्याण सेवाभावी संस्थानागपूर  मु. नागपूर पो. पुणेगाव ता. जि. नांदेड

अध्यक्ष श्री. श्रीराम बाबाराव आढाव सचिव श्री. किशोर श्रीराम आढाव

2019-20

सावित्रीबाई महिला विकास मंडळ,

आंबानगर  

अध्यक्ष सौ. विमालताई पांडुरंग साळवे सचिव कु. आम्रपाली पांडुरंग साळवे

2020-21

व्यक्ती

श्री. उद्धव संभाजी ढाकणीकर

2021-22

व्यक्ती

श्री. कैलाश रामचंद्र गायकवाड

2021-22

व्यक्ती

श्री. नामदेव भिकजी पदमने

2021-22

अल-इम्रान प्रतिष्ठानगांधी नगर

अध्यक्ष श्री. मोहसीन पाशा मुजीब पाशा खान सचिव इम्रान खान मुजीब पाशा खान

2022-23

व्यक्ती

श्री. भगवान नामदेव ढगे

2022-23

व्यक्ती

श्री. गुरुनाथ रामचंद्र पेंढारकर

2022-23

व्यक्ती

श्री. देविदास भाऊराव फुलारी

2022-23

व्यक्ती

श्री. बंसी भिवाजी गायसमुद्रे

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार  

वर्ष

 व्यक्ती / संस्था

नाव

2019-20

व्यक्ती

श्री. वाघमारे गंगाधर शेट्टीबा

2019-20

अष्टविनायक ग्रामकल्याण सेवाभावी संस्था,नागपूर

अध्यक्ष श्री. श्रीराम बाबाराव आढाव सचिव श्री. किशोर श्रीराम आढाव

2020-21

व्यक्ती

श्री. मल्हारी पिराजी तोटरे

2020-21

व्यक्ती  

श्री. चांदु वाघजी बोईवारे

2022-23

व्यक्ती

श्री. राघोबा जयवंतराव वाघमारे

2022-23

व्यक्ती

श्री. सतिष लक्ष्मणराव कावडे


"शाहूफुलेआंबेडकर पारितोषिकसाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्ती/संस्था

वर्ष

 व्यक्ती/संस्था

नाव

2019-20

कै. सोपानराव तांदलापुरकर क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा

अध्यक्ष श्री. कैलाश रामचंद्र गायकवाड सचिव कु.महेश्वरी सोपानराव तांदलापुरकर

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...