Tuesday, July 30, 2019


प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी
होण्यासाठी आज 31 जुलैची मुदतवाढ
लातूर, दि. 30 :- शासनाने खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 29 जुलै, 2019 अशी होती. तथापि, दिनांक  29 जुलै, 2019 चे शासन निर्णयानुसार खरीप हंगाम 2019 करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदत वाढवून ती दिनांक 29 जुलै, 2019 अशी करण्यात आली होती.
तथापि, शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 29 जुलै, 2019 पासून दिनांक 31 जुलै, 2019 पर्यंत मुदतवाढ   देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.  
         योजनेत सहभागी होण्यासाठी  बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) यांचे मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजिकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर पीक विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सह संचालक लातूर विभाग लातूर यांनी  केले आहे.
                                                ****


लेंडी प्रकल्पाचे कामे जुन 2021 पर्यंत
पुर्ण करण्याचे नियोजन - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 30 :- लेंडी प्रकल्पांतर्गत पुनर्वसन करावयाच्या 12 गावठाणाबाबत गावठाणनिहाय चर्चा करुन जुन 2021 पर्यंत प्रकल्पाचे काम पुर्ण करण्याचे नियोजन असून प्रकल्पाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.  
येथील जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात तेलंगणा राज्याचे सल्लागार अशोक टंकसाला व जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या समवेत लेंडी प्रकल्प सुरु करण्याबाबत आज बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.  
तेलंगाणा राज्याचे सल्लागार अशोक टंकसाला यांनी प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर दोन महिन्यांनी पुनश्च आढावा बैठक आयोजित करावी सांगितले. बैठकीस उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स.को.सब्बीनवार, देगलूर लेंडी प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता रा.मा.देशमुख, उपकार्यकारी अभियंता शे.मा.पाटील,उपविभागीय अभियंता सु.अ. क्षीरसागर, तेलंगणाचे कार्यकारी अभियंता ई. आत्माराम, उपविभागीय अभियंता श्री. बलराम व श्री. भुजेंदर आदि संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
00000


नांदेड जिल्ह्यात 269 मि.मी. पाऊस
मराठवाड्यात मोठ्या पावसाची प्रतिक्षा
औरंगाबाद,दि. 30 (विमाका) :- मराठवाडा विभागात आजपर्यंत 201.21 मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीनुसार 25.8 टक्के पाऊस झाला आहे. विभागात सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला आहे. आजपर्यंत या जिल्ह्यात 269.12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विभागात सर्वत्र ढगाळ वातावरण असले तरी पाऊस अत्यल्प प्रमाणात पडत आहे.
जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. नांदेड 269.12 मि.मी, औरंगाबाद- 235.74 मि.मी, हिंगोली -235.25 मि.मी, जालना - 212.95 मि.मी, परभणी -181.87 मि.मी, लातूर 177.69 मि.मी, उस्मानाबाद 165.99 मि.मी. आणि बीड 131.11 मि.मी.
तालुकानिहाय आज सकाळपर्यंत मागील चोवीस तासात पडलेला पाऊस आणि कंसात आजपर्यंत एकुण नोंदल्या गेलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 1.60 (201.60), फुलंब्री 1.00 (277.75), पैठण 0.80 (154.94), सिल्लोड 4.88 (320.81), सोयगाव 5.67 (334.00), वैजापूर 2.10 (206.00), गंगापूर 2.11 (188.00), कन्नड 3.88 (246.88), खुलताबाद 3.67 (191.67). जिल्ह्यात एकूण 235.74 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 0.88 (175.44), बदनापूर 1.40 (214.80), भोकरदन 4.25 (310.13), जाफ्राबाद 3.60 (242.00), परतूर 2.40 (192.68), मंठा 2.75 (202.25), अंबड 0.00 (189.14), घनसावंगी 4.71 (177.14), जिल्ह्यात एकूण 212.95 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 2.51 (159.92), पालम 4.67 (148.17), पूर्णा 3.20 (205.60), गंगाखेड 5.75 (171.50), सोनपेठ 4.00 (189.00), सेलू 2.00 (158.80), पाथरी 2.33 (176.67), जिंतूर 1.17 (193.50), मानवत 3.67 (233.67), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 181.87 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 14.71 (228.29), कळमनुरी 22.50 (281.25), सेनगाव 6.00 (224.50), वसमत 6.43 (142.71), औंढा नागनाथ 7.25 (299.50). जिल्ह्यात एकूण 235.25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 9.13 (235.88), मुदखेड 22.33 (317.33), अर्धापूर 9.00 (230.32), भोकर 29.00 (280.75), उमरी 23.67 (284.46), कंधार 12.50 (232.83), लोहा 10.50 (207.53), किनवट 79.00 (357.19), माहूर 60.50 (368.94), हदगाव 21.86 (244.42), हिमायत नगर 34.33 (286.99), देगलूर 21.17 (174.33), बिलोली 25.00 (327.00), धर्माबाद 29.33 (248.00), नायगाव 22.40 (284.00), मुखेड 19.71 (226.00), जिल्ह्यात एकूण 269.12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 2.91 (120.55), पाटोदा 6.25 (153.25), आष्टी 7.29 (139.43), गेवराई 1.90 (104.90), शिरुर कासार 0.00 (94.33), वडवणी 2.50 (113.00), अंबाजोगाई 10.20 (125.20), माजलगाव 2.33 (183.07), केज 7.14 (134.71), धारुर 2.67 (116.00), परळी 5.80 (157.82), जिल्ह्यात एकूण 131.11 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 11.25 (127.13), औसा 15.00 (105.57), रेणापूर 11.00 (157.25), उदगीर 15.43 (195.71), अहमदपूर 9.17 (237.33), चाकुर 17.80 (155.40), जळकोट 16.00 (239.50), निलंगा 12.88 (170.13), देवणी 15.67 (202.17), शिरुर अनंतपाळ 16.33 (186.67), जिल्ह्यात एकूण 177.69 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 11.75 (156.25), तुळजापूर 8.71 (199.29), उमरगा 10.80 (197.20), लोहारा 11.00 (201.00), कळंब 6.33 (139.00), भूम 8.40 (178.50), वाशी 8.33 (156.67), परंडा 9.20 (100.00), जिल्ह्यात एकूण 165.99 मि.मी. पाऊस झाला आहे.
******


अल्पसंख्याक शिष्यवृत्ती विभागाची कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 30 :- अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार सन 2019-20 साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीयोजनचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
सन 2019-2020 या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नांदेड तालुका अंतर्गत दक्षिण व उत्तर भागातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांची दोन सत्रात तहसील सभागृह पंचायत समिती नांदेड येथे आज कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेस शिक्षणाधिकारी (मनपा) दिलीपकुमार बनसोडे, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, शिक्षण विस्तार अधिकारी रोहिदास बस्वदे, बालाजी शिंदे, शेख निझामम यांनी शैक्षणिक बाबीचा आढावा घेतला.
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अर्ज भरणे संदर्भात शेख रुस्तुमम जिल्हा समन्वयक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सांगितली. या कार्यशाळेस तालुक्यातील जवळपास 500 मुख्याध्यापक उपस्थित होते. बैठक यशस्वितेसाठी मारोती ढगे, मिनल देशमुख यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन संजय भालके यांनी केले.
00000


निवृत्तीवेतनधारकांना आवाहन
नांदेड दि. 30 :- राज्य शासनाच्या आदेशानुसार निवृत्ती वेतनधारकांच्या जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 कालावधीच्या सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्ती वेतनाच्या पहिला हप्ता जुन 2019 च्या वेतनासोबत काही निवृत्ती वेतनधारकांना देण्यात आला आहे.
उर्वरित निवृत्ती वेतनधारकांना जुलै 2019 च्या निवृत्ती वेतनासमवेत हा हप्ता दयावचा uहोता. तथापि संगणक प्रणालीतील त्रुटीमुळे हा हप्ता जुलै 2019 सोबत देणे शक्य नसल्याचे                       संचालक लेखा व कोषागारे संचालनालय मुंबई यांनी कोषागार कार्यालयास कळविले आहे. पुढील सूचना प्राप्त होताच याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 
00000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 26.84 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यात सोमवार 30 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 26.84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 429.43 पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 269.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 28.11 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 30 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 9.13 (235.91), मुदखेड- 22.33 (317.34), अर्धापूर- 9.00 (230.31), भोकर- 29.00 (280.45), उमरी- 23.67 (284.44), कंधार- 12.50 (236.33), लोहा- 10.50 (209.70), किनवट- 79.00 (365.53), माहूर- 60.50 (359.34), हदगाव- 21.86 (247.00), हिमायतनगर- 34.33 (280.02), देगलूर- 21.17 (174.32), बिलोली- 25.00 (327.00), धर्माबाद- 29.33 (247.99), नायगाव- 22.40 (284.00), मुखेड- 19.71 (225.98). आज अखेर पावसाची सरासरी 269.10 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 4305.66) मिलीमीटर आहे.
00000

सुधारणा/अभिप्राय/मत/सूचना कळविण्याचे आवाहन महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात कालानुरुप सुधारणा करण्याचा निर्णय



नांदेड, दि. 30 : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले चार नियम यामध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचा निर्णय ग्रंथालय संचालनालयामार्फत घेण्यात आला असल्याचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी कळविले आहे.
            या नियमामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री  अनुदाने यासाठी मान्यता) नियम, 1970, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय संघ (सहायक अनुदानासाठी मान्यता देणे) नियम, 1971, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपध्दती) नियम, 1973, महाराष्ट्र ग्रंथालयांना (संशोधन व साहित्यिक परिसंस्थांची ग्रंथालये)सहायक अनुदानाकरिता मान्यता देण्याचे नियम, 1974 याचा समावेश आहे.
ग्रंथालय चळवळीशी संबंधित लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक, मुद्रक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवक, वाचक व सभासद, शैक्षणिक ग्रंथपाल, ग्रंथालय व्यावसायिक, संस्था, लोकप्रतिनिधी, महिला, महाविद्यालय/ विद्यापीठीय ग्रंथालय व माहितीशास्त्राचे प्राध्यापक, संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, प्रस्तावित अधिनियम व नियमांमध्ये सुधारणा/बदल सुचवावेत. बदल/ सुधारणा सांगताना त्याचे बाबनिहाय सकारण समर्थन करणे आवश्यक आहे. सुधारणा/अभिप्राय/मत/सूचना याबाबत पत्रव्यवहार समक्ष/टपाल/ईमेलदवारे ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांनी 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावा.याबाबतचा संपूर्ण तपशील ग्रंथालय संचालनालयाच्या WWW.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
००००


जप्‍त रेती साठ्याचा आज लिलाव



नांदेड दि. 30 :- विनापरवानगी अनाधिकृत रेती साठा नांदेड तालुक्‍यात केल्‍याचे निदर्शनास आले असून हा रेती साठा जप्‍त करुन त्‍याची ईटीएस मोजणी करण्‍यात आली आहे. या रेती साठयाच्या लिलावाची पहिली व दुसरी फेरी नांदेड उपविभागीय अधिकारी यांच्‍या अधिपत्‍याखाली 31 जुलै 2019  रोजी सकाळी 11 वा. नांदेड तहसिल कार्यालय येथे घेण्‍यात येणार आहे.   
नांदेड तालुक्यातील हा रेती साठा पुढील ठिकाणी उपलब्ध असून पहिल्या फेरीतील रेती साठ्याचे ठिकाण व गाव (कंसात ईटीएस मोजणी अंती जप्त रेती साठा) मौ. नागापूर (966 ब्रास), मौ. वांगी (125 ब्रास), मौ. सिद्धनाथ (326 ब्रास), दुसरी फेरी मौ. भनगी (1261 ब्रास), मौ.  गंगाबेट (730 ब्रास), मौ. नाळेश्‍वर (191 ब्रास) एकूण (3599 ब्रास). या ठिकाणी रेती साठा गट नंबर निहाय असून स्‍थळाचे ठिकाण असलेला साठा तपासुनच बोलीत भाग घ्‍यावा. अटी शर्तीबाबत अधिक माहिती नांदेड तहसिल कार्यालयाचे गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहवयास मिळेल, असे तहसिलदार नांदेड यांनी कळविले आहे.
00000

 शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार 22 ते 26 एप्रिल या कालावधीत बंद छत्रपती संभाजीनगर, दि. 18 (विमाका): शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार, छत्रपत...