Friday, May 12, 2017

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर
यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम
नांदेड, दि. 12 :-   राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 13 मे 2017 रोजी रेणापूर येथून शासकीय मोटारीने रात्री 8.30 वा. शासकीय विश्रामगृह मुखेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार 14 मे 2017 रोजी सकाळी 8.30 वा. मुखेड येथे राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्त्याची बैठक. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह मुखेड येथून शासकीय मोटारीने बिलोली मार्गे धर्माबादकडे प्रयाण. सकाळी 11 वा. धर्माबाद येथे आगमन व गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी लि. नांदेडचे शाखा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. धर्माबाद येथून शासकीय मोटारीने विश्रामगृह धर्माबादकडे प्रयाण, आगमन व राखीव. दुपारी 3.10 वा. धर्माबाद येथून शासकीय मोटारीने धर्माबाद रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. धर्माबाद रेल्वे स्टेशन येथे आगमन व राखीव. दुपारी 3.45 वा. रेल्वे स्टेशन धर्माबाद येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

000000
केंद्रीय कृषी व संसदीय कार्य राज्यमंत्री
एस. एस. अहुवालिया यांचा दौरा
नांदेड, दि. 12 :-केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण व संसदीय कार्य राज्यमंत्री एस. एस. अहुवालिया हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 13 मे 2017 रोजी हैद्राबाद येथून विमानाने दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन.  दुपारी 1.30 तख्त सचखंड श्री हुजूर साहि गुरुद्वाराकडे प्रयाण. दुपारी 2.20 तख्त सचखंड श्री हुजूर साहि गुरुद्वारा येथे आगमन. सायं. 6 वा. मुख्य जत्थेदारजी बाबा कुलवंतसिंगजी यांच्या कार्यक्रमास उपस्थिती व तख्त सचखंड श्री हुजूर साहि गुरुद्वारा येथील अंगद निवास येथे मुक्काम.
रविवार 14 मे 2017 रोजी सकाळी स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व सकाळी 11.30 वा. तख्त सचखंड श्री हुजूर साहि गुरुद्वारा येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.30 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.

00000
वंचितापर्यंत शासनाच्या सेवा पोहचविण्यासाठी
शासन कटीबद्ध - अंकुश पिनाटे
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात वंचितांचा शोध घेवून त्यांच्यापर्यंत शासनाच्या सेवा पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले. नांदेड तहसिल कार्यालयाच्यावतीने आयोजित शोध शुद्धीकरण प्रतिसाद मोहिमअंतर्गत निवडणूक ओळखपत्राचे नुकतेच वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अनुलोम संस्थेचा सहाय्याने शांतीनगर येथील कचरा गोळा करणाऱ्या वंचितांचा शोध घेऊन त्यांच्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी शिबीर नुकतेच त्यांच्या भागात जावून घेण्यात आले. यावेळी 102 वंचितांची व काही मुकबधीर दिव्यांगांची नाव नोंदणी करण्यात आली. त्यांना निवडणूक ओळखपत्र उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे व मतदार नोंदणी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
मतदार नोंदणी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा पार्श्वभुमी स्पष्ट केली. या कार्यक्रमामुळे शासन आमच्या पाठिशी असल्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया सुनील हातवळणे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार गजानन नांदगावकर, शांतीनगर येथील नवीन मतदार व कर्मचारी उपस्थित होते.

0000000
दहावी, बारावी परीक्षा निकालाच्या
दिनांकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  
नांदेड, दि. 12 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाच्या चुकीच्या व अनधिकृत तारखा व्हॉटस्ॲप व इतर सोशल मिडियावर परस्पर व अनधिकृतरित्या प्रसारीत करण्यात येत असलेल्या निकाल दिनांकाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन लातूर शिक्षण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या निकालाबाबत कोणत्याही तारखा मंडळाने जाहीर केल्या नाहीत. या परीक्षेच्या निकालाचे काम पूर्ण झाल्यानंतर रितसर प्रसार माध्यमांद्वारे निवेदन देऊन मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर केली जाईल. व्हॉटस्ॲप व इतर सोशल मिडियावर परस्पर व अनधिकृतरित्या प्रसारीत करण्यात येत असलेल्या निकालाच्या दिनांकाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
000000


दहावीच्या विद्यार्थ्यांचा
कलचाचणी अहवाल जाहीर
नांदेड, दि. 12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2017 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची कलचाचणी 9 फेब्रुवारी ते 3 एप्रिल 2017 या कालावधीत घेण्यात आली होती. या कलचाचणीचा कल अहवाल http://mahacareermitra.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांचा बैठक क्रमांक नोंदवून कल अहवाल ऑनलाईन पहावा. हा कल अहवाल इयत्ता दहावीच्या गुणपत्रकाबरोबर छापील स्वरुपात देण्यात येणार आहे, अशी माहिती लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी दिली.

00000
मोटार सायकलसाठी नवी मालिका सुरु
नांदेड, दि. 12 :- मोटार सायकलसाठी एमएच 26 बीएफ ही नवीन मालिका मंगळवार 9 मे 2017 पासून सुरु करण्यात आली आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...