Tuesday, January 5, 2021

 

दर्पण दिनानिमित्त भवताल, माध्यमे आणि आपणविषयावर एमजीएम मध्ये परिसंवाद

नांदेड (जिमाका) दि. 5 :- दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारीता व माध्यमशास्त्र महाविद्यालय व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता एमजीएम महाविद्यालय नांदेड येथे भवताल, माध्यमे आणि आपणया विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या परिसंवादास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकुर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, नांदेड जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची उपस्थिती असणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी, संपादक शंतनु डोईफोडे, संपादक मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन, पत्रकार पन्नालाल शर्मा, सौ.राजश्री मिरजकर, भारत होकर्णे, कुवरचंद मंडले हे परिसंवादात मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारीता व माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी केले आहे.

000

 

59 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

41 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 5 :- मंगळवार 5 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 59 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 34 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 25 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 41 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 990 अहवालापैकी 920 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 657 एवढी झाली असून यातील 20 हजार 535 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 346 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. मंगळवार 5 जानेवारी 2021 रोजी होळी नांदेड येथील 71 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 576 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा  रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 29, खाजगी रुग्णालय 8, देगलूर कोविड रुग्णालय 1, कंधार तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 41 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.81 टक्के आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 23, हदगाव तालुक्यात 1, मुखेड 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 3, कंधार 1, यवतमाळ 1 असे एकुण 34 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 16, माहूर तालुक्यात 1, मुखेड 1, मुदखेड 1, भोकर 2, हिंगोली 4 असे एकुण 25 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 346 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 21, मुखेड कोविड रुग्णालय 22, महसूल कोविड केअर सेंटर 6, देगलूर कोविड रुग्णालय 22, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 144, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 54, हैद्राबाद येथे संदर्भीत 3, खाजगी रुग्णालय 42 आहेत.   

मंगळवार 5 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 176, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 61 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 86 हजार 28

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 60 हजार 275

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 657

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 535

एकुण मृत्यू संख्या-576

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.81 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-06

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-03

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-346

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-08.          

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...