Sunday, January 13, 2019

मुख्यमंत्र्यांचा लोकसंवाद’ कार्यक्रम
सोमवारी सकाळी 11 ऐवजी आता सकाळी 11.40 वाजता होणार

            मुंबईदि. 13 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभत्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी                2 जानेवारीला लोकसंवाद’ साधून जाणून घेतली. या लोकसंवादाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यानंतर सोमवार दि. 14 जानेवारीला मुख्यमंत्री आणि लाभार्थी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकसंवाद’ होणार आहे. हा कर्यक्रम सकाळी 11 ऐवजी सकाळी 11.40 वाजता होणार आहे.  कार्यक्रमाचा लाईव्ह संवाद मोबाईलसंगणकटॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे.
            हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या www.twitter.com/Dev_Fadnavis  या ट्विटर हॅण्डलवर तसेच www.facebook.com/devendra.fadnavis या फेसबुक पेजवर आणि  www.youtube.com/DevendraFadnavis या युट्यूब चॅनलसह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे ट्विटर www.twitter.com/MahaDGIPR व www.facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेजसह www.youtube.com/maharashtradgipr या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. त्याशिवाय http://elearning.parthinfotech.in/ या लिंकवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मागेल त्याला शेततळेसिंचन विहिरीफळबागाकांदा चाळसूक्ष्म सिंचनकृषी यांत्रिकीकरणस्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाप्रधानमंत्री पीक विमा योजनाअन्न प्रक्रियाशेडनेटपॉली हाऊसछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांबाबत सातत्याने आढावा घेतला आहे.
००००

  वृत्त क्र.   386 मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य ; 12 पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून करा मतदान ; मतदार यादीत नाव असणे आवश्यक   नांदेड,...