Thursday, January 5, 2017

लोकराज्य जानेवारी 2017 चा अंक प्रसिद्ध
नांदेड , दि. 5 : लोकराज्य मासिकाचा जानेवारी 2017 चा पर्यटन विशेषांक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. 'व्हिजिट महाराष्ट्र 2017' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेला हा अंक स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या अंकाची किंमत 10 रुपये आहे.
महाराष्ट्रातील विविध किल्ले, जलदुर्ग, वस्तुसंग्रहालये, लेण्या, प्रार्थनास्थळे, महाराष्ट्रातील वने इत्यादी बाबींची तसेच जिल्हानिहाय पर्यटन स्थळे, तिथे कसे पोहचावे याची माहिती हे या अंकाचे वैशिष्ट्ये आहे.
निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर बदललेल्या महाराष्ट्राचे चित्रणदेखील या अंकात आहे. निश्चलनीकरणानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहारांकडे वळावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत केले जाणारे प्रयत्न, शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना यांची माहिती या अंकात आहे. कॅशलेस इंडिया समजून घेण्यासाठी आणि पर्यटनाच्या वाटेवरील मार्गदर्शक म्हणून हा अंक निश्चितरीत्या उपयुक्त ठरणार आहे.
०००००


शासकीय अध्यापक महाविद्यालयात
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यास प्रारंभ
नांदेड, दि. 5 :-  शासकीय अध्यापक महाविद्यालयात 1 ते 15 जानेवारी 2017 हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा म्हणून साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ सोमवार 2 जानेवारी रोजी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे या होत्या. प्रास्ताविक प्रा. एस. एस. सोळंके यांनी केले. नैतिक मल्य रुजवणूक उपक्रमांतर्गत सुविचार वाचन व संकलन हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात महाविद्यालयामधील प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी शिक्षण क्षेत्रातीलच लोकांनी नव्हे तर इतर क्षेत्रातील लोकांनीही मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शासनाने सर्व विभागांना तसे सुचित केले आहे. महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीही उत्साहात साजरी करण्यात आली. यात परभणी आकाशवाणी केंद्रावरून तेजस्वीनी या कार्यक्रमांतर्गत प्राचार्या डॉ. रोडगे यांची थेट घेण्यात आलेली मुलाखत प्रसारित करण्यात आली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्या डॉ. रोडगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेवून वाटचाल करावी असे सूचित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बेलोकर यांनी केले. निता मोरे यांनी  त्रसंचालन केले. आभार सुषमा शिरसे यांनी आभार मानले.

-------
पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणासाठी
मंगळवारी सोडत काढण्यात येणार 
नांदेड, दि. 5 :- जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत मंगळवार 10 जानेवारी रोही काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाने कळविले आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील अधिसुचनेनूसार 16 जन 2016 अन्‍वये जिल्‍हयातील पंचायत समित्‍याकरीता लागू असलेल्‍या आरक्षणाच्‍या  समाप्‍ती नंतर लगेच पुढील अडीच वर्षाच्‍या कालावधीकरीता आरक्षित संवर्गासाठी पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (विमुक्‍त जाती, भटक्‍या जमातीसह) आणि महिला (अशा जाती, जमाती आणि प्रवर्ग यामधील महिलांसह) सर्व साधारणप्रवर्ग  व या प्रवर्गातील महिलांसाठी पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत पध्‍दतीने काढण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवार 10 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 वा. बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बैठक आयो‍जित केली आहे. या बैठकीसाठी सर्व राष्‍ट्रीय व मान्‍यता प्राप्‍त राजकीय पक्षांचे पदाधिकारी तथा जिल्‍हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी आदींनीही उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000
जिल्हा नियोजन समितीची बैठक पुढे ढकलण्यात आली
नांदेड, दि. 5 :-  जिल्हा नियोजन समितीची शुक्रवार 6 जानेवारी 2016 रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती नांदेड यांनी कळविले आहे.
जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी 6 जानेवारी रोजी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. तथापि भारत निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. त्यामुळे ही नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

000000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...