Friday, June 2, 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा    
नांदेड दि. 2 :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार 3 जून 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.   
शनिवार 3 जून 2017 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 10.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.50 वा. हेलिकॉप्टरने परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण. परळी वैजनाथ येथील कार्यक्रमांनंतर हेलिकॉप्टरने दुपारी 2.40 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 2.45 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
बबनराव लोणीकर यांचा दौरा
नांदेड दि. 2 :- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे शनिवार 3 जून 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 3 जून रोजी मुंबई येथून मुख्यमंत्री महोदयांसमवेत विमानाने सकाळी 10.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.50 वा. नांदेड येथून हेलिकॉप्टरने परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील. परळी येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील.

0000000
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड दि. 2 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 3 जून 2017 रोजी यवतमाळ येथून दुपारी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह किनवट येथे आगमन व राखीव. तसेच तहसिलदार किनवट यांचे समवेत सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विषयासंदर्भात चर्चा. सकाळी 11.45 वा. कलावती गार्डन माहूर रोड किनवट येथे आयोजित श्री मुरलीधर राठोड माजी सरपंच निगनूर ता. उमरखेड यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12 वा. शासकीय वाहनाने दिग्रस जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.  

00000
शासकीय ईबीसी वसतीगृहातील
प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु
नांदेड, दि. 2 :-  शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह भास्‍करनगर हिंगोली रोड नांदेड येथे सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात इयत्‍ता 8 वी, 11 वी, पदवी प्रथम वर्षे कला, वाणिज्‍य, विज्ञान शाखेच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी नूतन प्रवेश तसेच वर्ग 9 वी, 10 वी, 12 वी, पदवी द्वितीय आणि तृतीय व पदवत्‍तर द्वितीय वर्षे पुर्नप्रवेशासाठी विद्यार्थ्‍यांकडून प्रवेश अर्ज शनिवार 10 जून ते रविवार 25 जून 2017 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मागविण्‍यात येत आहेत. 
अर्जासोबत वार्षिक परीक्षेच गुणपत्रक सन 2016-17 या वर्षाचे वार्षिक उत्‍पन्‍नाचे तहसिलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्राच्‍या सत्‍यप्रती साक्षांकित करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्‍यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयीन वेळेत शनिवार 10 जून ते रविवार 25 जून 2017 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयात मिळतील. या कालावधीत संपूर्णपणे भरलेले अर्ज कागदपत्रांसह स्विकारले जाणार आहेत.   
प्रवेश अर्जाची किंमत 10 रुपये असून अर्ज विद्यार्थ्‍यांने समक्ष घेऊन जावेत. विद्यार्थ्‍यांची प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्‍यावर वसतीगृह नियमीत सुरु होईल. वसतीगृहात निवड झालेल्‍या विद्यार्थ्‍यांना 500 रुपये अनामत रक्‍कम भरावी लागेल. शासनाकडून वसतीगृहास निवासाची, भोजनाची विनामुल्‍य सोय करण्‍यात आली आहे. विद्यार्थ्‍यांना गुणवत्‍तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांना 20 टक्‍के जागा राखीव आहेत. या वसतीगृहात प्रवेश अर्ज स्विकारण्‍याची शेवटची तारीख रविवार 25 जून 2017 ही असून या तारखेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. चूक किंवा अपूर्ण माहितीचे अर्ज तसेच कागदपत्रांची पूर्तता न केलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची संबंधीत विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्‍यावी असे आवाहन गृहप्रमुख शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी केले आहे.
वसतीगृहातील प्रवेशासाठी एकूण 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याची विगतवारी पुढील प्रमाणे.
माध्यमिक विभाग ( 8, 9 , 10 वी )- 40 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 14, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या-26, खुला संवर्गासाठी-32, राखीव-8.
उच्च माध्यमिक विभाग ( 11 व 12 वी )- 40 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 4, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या-36, खुला संवर्गासाठी-32, राखीव-8.
वरिष्ठ महाविद्यालय विभाग ( पदवी / पदव्युत्तर )- 20 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 15, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या-5, खुला संवर्गासाठी-16, राखीव-4.

000000
पीओएस मशिनद्वारे जिल्हयात खत विक्रीस सुरुवात
नांदेड दि. 2 :-  अनुदानीत रासायनिक खताची विक्री विक्रेत्यांनी 1 जूनपासून पीओएस मशिनवरच करावी. अनुदानीत खतासाठी थेट हस्तांतरणाच्या प्रक्रियेला 1 जून पासून सुरुवात होत असल्याने पीओएस मशिनचा वापर सुरु करुन हा प्रकल्प यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.
गुरुवार 1 जून 2017 रोजी मे. कैलास फर्टीलायझर नवा मोंढा नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, कृषि पशुसंवर्धन समितीचे सभापती दत्तात्रय रेड्डी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर भातलवंडे, कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. घुले, मोहीम अधिकारी आनंत हांडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक नितीन देशपांडे तसेच अखिल भारतीय बियाणे, खते, औषधी विक्रेता असोशिएशन दिल्लीचे सचिव सुरेंद्रसिंग बिरीवाला यांचे उपस्थितीत ई-पॉश मशिनद्वारे रासायनिक खताची प्रत्यक्ष विक्री शेतकऱ्यांना करण्यात आली.
त्याचप्रमाणे नायगाव येथे आमदार वसंतरावजी चव्हाण, हिमायतनगर येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर, धर्माबाद येथे जिल्हा परिषदेचे कृषि पशुसंवर्धन समितीचे सभापती दत्तात्रय रेड्डी, बिलोली येथे जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. ठक्करवाड, भोकर येथे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रावणगावकर, भोकर मार्केट कमिटी सभापती जगदिश पाटील, अर्धापूर येथे जि.प.सदस्यसौ. संगिता अटकोरे, माजी उपसभापती सुनिल अटकोरे, बारड येथे प्रगतशिल शेतकरी शिवाजीराव देशमुख यांच्या उपस्थितीत तसेच इतर सर्व तालुक्यातही मान्यवराच्या उपस्थितीत पीओएस मशिनद्वारे रासायनिक खताची प्रत्यक्ष विक्री शेतकऱ्यांना करण्यात आली.
जिल्हयात मागील तीन महिन्यापासून विविध बैठका प्रशिक्षण घेऊन खत विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. तसेच पीओएस मशिनद्वारे रासायनिक खताची विक्री कशी करावी याबाबत खतकंपनी प्रतिनिधी यांचे सहकार्याने पीओएस मशिन वापराबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले होते.  
यावेळी जिल्हा कृषिनिविष्ठा संघटनेचे अध्यक्ष मधुकर मामडे, शिवशंकर पुरमवार, इफको खत कंपनी प्रतिनिधी श्री. घाडगे, खत विक्रेते, शेतकरी आदी उपस्थित होते. बैठक यशस्वी करण्यासाठी मोहीम अधिकारी आनंत हांडे, कृषि अधिकारी डी. के. जाधव, व्ही. आर. सरदेशपांडे यांनी परिश्रम घेतले  

00000
पोलीस मुख्यालयात
तंबाखू विरोधी जनजागृती दिन संपन्न
नांदेड दि. 2 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम  जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्यामार्फत 31 मे यजागतिक तंबाखू नकार दिन व सप्ताहाच्या अनुषंगाने आज पोलीस मुख्यालय नांदेड येथे तंबाखू विरोधी जनजागृती दिन व साप्ताह साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 90 व्यक्तीची  बीपी, शुगर व मौखिक आरोग्य आदीची तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी यांनी  उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येक व्यक्तीने या तंबाखू नकार दिनाच्या माध्यमातून तंबाखू मुक्त जीवन जगण्याचा संकल्प करावा, असे सांगितले. त्याचबरोबर दंतशल्यचिकित्सक डॉ. रोशनी चव्हाण व दंतशल्यचिकित्सक डॉ. घोडजकर यांनी पीपीटीच्या माध्यमातून मौखिक आरोग्याबद्दल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास डॉ. प्रदीप बोरसे, समुपदेशक प्रकाश आहेर, सुवर्णकार सदाशीव व सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड हे उपस्थित होते.

0000000
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 2 :-  केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु हे शनिवार 3 जून 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा तपशील पुढील प्रमाणे.
शनिवार 3 जून 2017 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 10.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.50 वा. हेलिकॉप्टरने परळी जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...