Wednesday, May 17, 2023

 शेतकऱ्यांना पिकांचे किड व रोगाबाबत

गाव पातळीवर मार्गदर्शन करावे

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- "जिल्ह्यातील खरीप हंगामातील मुख्य पिकांचे लागवड तंत्रज्ञान, किड/रोग व्यवस्थापन व उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगाम पूर्व अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षणात ते बोलत होते.

 

कार्यशाळेत विविध मोहिमांची माहिती पुस्तिका, खरीप हंगाम पुर्व जणजागृती मोहीम-2023 कृषि मार्गदर्शिका आदीचे सर्व कृषी सहाय्यकांपर्यंत वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग  योजनामा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

 

सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणीसोयाबीनची बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीखत बचत मोहीमजैविक खतांचा वापरबीज प्रक्रिया आदी मोहिमेद्वारे शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी.चलवदे यांनी सांगितले. डॉ. अरव‍िंद पांडागळे यांनी कापुससोयाबीन व तुर लागवडीतील तंत्रज्ञानकिटकशास्त्रज्ञ डॉ. बसवराज भेदे यांनी खरीप हंगामातील प्रमुख किडींचे व्यवस्थापन व रोग शास्त्रज्ञ डॉ. पवन  ढोके यांनी प्रमुख रोगांचे व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

 

यावेळी कृषि उपसंचालकउपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी व इतर कर्मचारी दींची उपस्थित होती.

000000







 गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत

अशासकीय संस्थाना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  शासनाच्यावतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थानी पुढील नमुद केलेल्या कार्यालयाशी संपर्क करुन मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित जलसाठ्यांची माहिती घ्यावी व संबंधित ग्रामपंचायतीचे ठराव सोबत सदस्य सचिवजिल्हास्तरीय समितीगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारीमृद व जलसंधारण विभागपाटबंधारे वसाहतचैतन्यनगरनांदेड-05 (दु.क्र. 02462-260813 व ई-मेल eessiwcnanded@gmail.com) येथे प्रस्ताव सादर करावेतअसे आवाहन सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तथा जिल्हा जलसंधारण अधिकारीमृद व जलसंधारण विभाग नांदेड यांनी केले आहे.

 

राज्यात 6 मे 2017 पासून 31 मार्च 2020 अखेर पर्यंत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. शासन निर्णय 20 एप्रिल 2023 अन्वये सदर योजना पुन्हा सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थाना यंत्रसामुग्री आणि इंधन या दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावित आहे. अल्प व अत्यल्पभुधारकविधवा, दिव्यांग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी अनुदान देणे प्रस्तावित आहे. अशासकिय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि इंधनासाठी 31 रुपये प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी 35 रुपये 65 पैसे प्रति घनमीटर प्रमाणे 15 हजार रुपयांच्या मर्यादा व 2.5 एकर (37 हजार 500 रुपयांपर्यंत) अनुदान दिले जाणार आहे.

 

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मृद व जलसंधारण विभाग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसेच शासन निर्णय क्र.: गामुध 2023/प्र.क्र.22/जल-13 दि. 04.05.2023 अन्वये संस्था निवडीचे निकष आणि दिलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणे बंधनकारक आहे व त्यानंतरच अशासकीय संस्थांना पात्र ठरविण्यात येईल.

 

तालुकास्तरावर संपर्कासाठी तालुकास्तरीय अध्यक्ष यांचे मुख्यालयसमाविष्ट तालुकेसंपर्काचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. नांदेड मुख्यालयात नांदेडहदगावहिमायतनगर तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारी नांदेड यांचा मो. क्र. 8007262021 व ई-मेल sdwconed@gmail.com याप्रमाणे आहे. मुखेड मुख्यालयात मुखेड तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारीमुखेड  यांचा मो. क्र. 9423347886 व ई-मेल sdwcomukhed@gmail.com याप्रमाणे आहे. नायगाव मुख्यालयातर्गत नायगावधर्माबादउमरी या तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारीनायगाव यांचा मो. क्र. 9421084530 व ई-मेल sdwconaigaon@gmail.com सा आहे. भोकर मुख्यालयातर्गत भोकरमुदखेडअर्धापुर या तालुक्यांचा समावेश असून संपर्कासाठी उपविभागीय जलसंधारण अधिकारीमृद व जलसंधारण उप विभाग भोकर यांचा मो. क्र.7350276165 व ई-मेल  sdwcobhokar@gmail.com याप्रमाणे आहे. कंधार तालुकास्तरीय मुख्यालयातर्गत कंधारलोहा तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारी कंधार यांचा मो.क्र. 9049888753 व ई-मेल sugm@rediffmail.com याप्रमाणे आहे. किनवट तालुकास्तरीय मुख्यालयातर्गत किनवटमाहुर तालुक्याचा समावेश असून उप विभागीय जलसंधारण अधिकारीकिनवट यांचा मो. क्र. 7276167441 व ई-मेल sdossiwc.kinwat@gmail.com याप्रमाणे आहे. देगलूर मुख्यालयातर्गत देगलूरबिलोली तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारीदेगलुर यांचा मो. क्र. 9421321402 ई-मेल dwco.swcsddeglurg@gmail.com याप्रमाणे आहे.

00000

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शनिवार 20 मे रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मे  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

मान्सून कालावधीत दामिनी ॲपचा वापर करा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 मान्सून कालावधीत दामिनी ॲपचा वापर करा

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवीत हानी होते. ही जीवीतहानी होवू नये यासाठी नागरिकांनी व विशेषत: शेतकऱ्यांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी ॲप अवश्य वापरावेअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने हे दामिनी ॲप तयार केले असून हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, अधिकारी-कर्मचारीक्षेत्रिय अधिकारी / मंडळ अधिकारीअव्वल कारकूनमहसूल सहाय्यक, गाव स्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा ईन्ट्री ऑपरेटर यांना दामिनी ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करावे. या ॲपचे जीपीएस लोकोशनचे काम करीत असून वीज पडण्याचा 15 मिनीटापूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपमध्ये आपले सभोवतालच्या वीज पडत असल्यास ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे. तसेच त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. गावातील सर्व नागरिक, शेतकरी यांनी दामिनी ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. दामिनी ॲपमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्लटनुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देवून, होणारी जीवीत व वित्तहानी  टाळावीअसेही आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या एनएसएफडीसी च्या योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या एनएसएफडीसी च्या

योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 17 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एन.एस.एफ.डी.सी यांच्या योजनांचे भौतीक उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात 16 जून 2023 पर्यंत अर्ज कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.30 ते सायं 6.15 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर तळमजला, कामठा रोड, नांदेड येथे स्विकारले जातील. 

मुदती कर्ज योजना 30, महिला समृध्दी 40 योजना, लघुऋण वित्त योजना 18 व शैक्षणिक कर्ज योजना 10 उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या सर्व योजना एन.एस.एफ.डी.सी नवी दिल्ली यांच्या मार्फत राबविल्या जातात. चांभार समाजा अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत पुढील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावीत. त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. 

 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा चालू वर्षाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे/ मतदान कार्ड / पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक जीएसटीचे कोटेशन, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बील, टॅक्स पावती, मुदती कर्ज योजनेसाठी प्रकल्प अहवाल,  व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचा सिबील क्रेडिट स्कोअर 500 च्यावर असावा रिपोर्ट, अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसांक्षाकित करुन घोषणापत्र देण्यात यावे. 

 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी केले आहे.

00000

 

ग्रामपंचायत पोटनिवडणूक-2023 मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 ग्रामपंचायत पोटनिवडणूक-2023

मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्‍ह्यातील (निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे  ग्रामपंचायतीतील सदस्‍य/थेट सरपंचाच्‍या रिक्‍त झालेल्‍या पदांकरीता)  ग्रामपंचायत पोटनिवडणूक-2023 करिता मतदानाच्‍या दिवशी मतदान केंद्र परिसरात गुरूवार 18 मे 2023 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून मतदान संपेपर्यन्‍त व मतमोजणीच्‍या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात शुक्रवार 19 मे 2023 रोजी मतमोजणी सुरु झाल्‍यापासून मतमोजणी संपेपर्यन्‍त प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी लागू केले आहेत.

 

महाराष्ट्र राज्‍य निवडणूक आयोगाने निवडणूक निर्दिष्‍ट कार्यक्रमानूसार नांदेड जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतीच्या एकुण 47 जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून ही निवडणूक प्रक्रिया चालू आहे. या निवडणुकीचे मतदान गुरूवार 18 मे 2023 रोजी तर मतदानाची मतमोजणी  शुक्रवार 19 मे 2023 रोजी निश्चित केलेल्‍या स्‍थळी होणार आहे.

 

नांदेड जिल्‍ह्यात निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्‍य/थेट सरपंचाच्‍या रिक्‍त झालेल्‍या पदांकरीता ग्रामपंचायत पोटनिवडणूक-2023 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय्य वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्टीकोणातून कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहण्‍यासाठी  जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये गुरूवार 18 मे 2023 रोजी ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे त्‍या ठिकाणापासून तसेच शुक्रवार 19 मे 2023 रोजी ज्‍या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा मतमोजणी केद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त  व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंध केले आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...