Thursday, September 13, 2018


संतोष अजमेरा रिजनल आउटरीच ब्‍युरोच्‍या संचालकपदी रुजू
नांदेड, दि. 14 :- भारतीय माहिती सेवेतील वरीष्‍ठ अधिकारी श्री. संतोष अजमेरा यांनी पूणे येथील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या रीजनल आउटरीच ब्‍यूरोच्‍या संचालकपदाची सूत्रे नूकतीच हाती घेतली. यापूर्वी या पदावर अप्‍पर महासंचालक नितीन वाकनकर हे कार्यरत होते. त्‍यांची दिल्‍ली येथील पत्रसूचना कार्यालयात बदली झाली आहे.
या कार्यालयाच्‍या अंतर्गत महाराष्‍ट्र आणि गोवा हे कार्यक्षेत्र आहे आणि त्‍याअंतर्गत 11 फिल्‍ड आउटरीच ब्‍यूरो कार्यरत आहेत. या कार्यालयाव्‍दारे केंद्र सरकारच्‍या विविध विकासात्‍मक आणि कल्‍याणकारी योजना सामान्‍य जनतेपर्यंत पोहोचवण्‍यासाठी विशेष प्रचार अभियान राबविण्‍यात येते. यासाठी सभा, मेळावे, गटचर्चा, लघूचित्रपट याद्वारे जनतेमध्‍ये जनजागृती केली जाते. यासाठी शासनाच्‍या अंमलबजावणी करणा-या विविध कार्यालयांचे सहकार्य घेतले जाते. 
यापूर्वीच्‍या क्षेत्रीय प्रचार संचालनालय, जाहिरात दृकश्राव्‍य प्रचार संचालनालय व गीत आणि नाटक विभागांना एकत्र करून ब्‍यूरो ऑफ आउटरिच कम्‍यूनीकेशन नावाने वेगळा विभाग निर्माण करण्‍यात आला आहे.
श्री. संतोष अजमेरा हे भारतीय माहिती सेवेतील 2008 बॅचचे अधिकारी असून त्‍यांच्‍याकडे केंद्र सरकारने राष्‍ट्रीय चित्रपट संस्‍कृती संवर्धन मोहिमेच्‍या प्रकल्‍पासाठी विशेष अधिकार म्‍हणून जबाबदारी दिलेली आहे. त्‍यापूर्वी त्‍यांनी माहिती व प्रसारण मंत्रालाच्‍या विविध विभागात कार्य केले असून माहिती व प्रसारण मंत्रालयाच्‍या सोशल मिडीया सेलमध्‍ये उल्‍लेखनीय कार्य केले आहे.
श्री. अजमेरा हे एक उत्‍कृष्‍ट खेळाडू असून त्‍यांचे मॅग्राहील प्रकाशनाने इथीक्‍स, इंटीग्रीटी आणि अॅप्‍टीट्यूड हे पुस्‍तक प्रकाशीत केले आहे. ते मुळचे मराठवाडयातील औरंगाबाद येथील असून डिजीटल तंत्रज्ञानाच्‍या सहाय्याने शासनाच्‍या विविध योजनांची माहीती प्रसारीत करणार आहेत.
00000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...