Monday, January 29, 2024

 वृत्त क्र.  86 

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित

दिव्यांग विद्यार्थ्याच्या आज जिल्हास्तरीय क्रीडा तर उद्या सांस्कृतिक स्पर्धा

 

नांदेड (जिमाका)दि. 29 :- जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने मंगळवार 30 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. वजिराबाद येथील पोलीस परेड ग्राउंड येथे दिव्यांग विद्यार्थ्याच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा तर बुधवार 31 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता आयटीएम येथील कुसुमताई सभागृहात सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

 

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊतद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेपोलीस उपअधीक्षक कीर्तिकाजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजितकौर जजजि..चे उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावारसमाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार व समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे आदींची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवारप्रभारी वैसाका कुलदीप कलुरकर यांच्या मार्गदर्शनात विविध समित्यांचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

0000


 सोमवार,दि.29 जानेवारी 2024

वृत्त क्रमांक:- 45

31 जानेवारीपर्यंत सर्व्हेक्षण पूर्ण करावे - डॉ. गजाजन खराटे

मराठा व खुला प्रवर्ग सर्व्हेक्षणाचा विभागस्तरीय आढावा

छत्रपती संभाजी नगर,दि.29 (जिमाका) :- मराठा समाजाला  आरक्षण देण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहिती संकलीत करण्यासाठी सर्व्हेक्षण करीत आहे. हे सर्वेक्षण सर्व जिल्ह्याने 31 जानेवारीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य  मा. गजानन खराटे यांनी आज  विभागीय आढावा बैठकीत विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले.

        विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटूंबाचे  होत असलेल्या सर्व्हेक्षणाचा व जमीन अधिग्रहणाविषयीचा आढावा  घेण्यात आला. 

मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ.ओमप्रकाश जाधव, डॉ.प्रा गोविंद काळे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड,महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, उपायुक्त जगदिश मिनीयार,निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते ,दूरदृश्यप्रणालीद्वारे   जालना, बीड,परभणी, धाराशिव, लातूर,नांदेड, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसेच लातूर आणि नांदेड महापालिका आयुक्त  बैठकीत सहभागी होते.

                     प्रा.डॉ.काळे म्हणाले, मराठवाडा विभागात  आयोगाने नेमून दिलेले सर्वेक्षणाचे काम महसूल विभागाने चांगले केले आहे, याबाबत आयोगामार्फत मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा प्रशासनाचे  अभिनंदन.  कोणत्याही जिल्ह्यात  मराठा आणि खुल्या प्रवर्गातील  एक ही कुटुंब सर्वेक्षणतून  सुटू नये  सर्वांची नोंद घेण्याची खबरदारी  जिल्हाधिकारी आणि नोडल अधिकारी यांनी घ्यावी, अशी सूचना  देण्यात आली . सर्वेक्षण साठी नवीन 1.03  ऍपद्वारे करण्यात यावे. प्रत्येक वाडी ,वस्ती, तांडा, व्यवसाय ,रोजगारसाठी स्थलांतरीत झालेले तसेच शेतवस्तीवरील कुटुंबातील सर्वेक्षण करून नोंद घ्यावी,वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रगणकाच्या संख्येत वाढ करावी,31जानेवारीपर्यत विभागातील सर्व  जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री आर्दड यांनी दिले. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील मराठा आणि खुल्या प्रवर्गातील  कुटूंब सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय आढावा उपायुक्त जगदिश मिनीयार यांनी अयोगाच्या तिन्ही सदस्यासमोर सादर केला.


*****




वृत्त क्र. 85 दि. 28 जानेवारी, 2024

 महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता

विजय वडेट्टीवार यांचा नांदेड दौरा  

नांदेड (जिमाका) दि. 28 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

रविवार 28 जानेवारी 2024 रोजी चंद्रपूर येथून रात्री 12 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. सोमवार 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून शासकीय विश्रामगृह लातूर कडे प्रयाण करतील.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...