Sunday, October 27, 2019


औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ
 मतदार यादीसाठी पात्र व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 28 :- मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31 (4) चे अनुरोधाने मतदार नोंदणी अधिकारी, 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी पात्र असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नमुना 18 अन्वये अर्ज मागविण्याबाबत 1 ऑक्टोंबर 2019 रोजी वर्तमानपत्रात मतदार नोंदणी नियम 1960 ला जोडलेला नमुना 18 मध्ये आणि सदर नोटीसच्या दुसऱ्या अनुसूचिमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्व पात्र व्यक्तींनी यापूर्वी अर्ज केले नसल्यास त्यांनी 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी नमुना 18 मध्ये अर्ज सादर करु शकतील. हा तपशील विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांचे अधिकृत संकेतस्थळावर https://aurangabad.gov.in/notification-panel/ वर उपलब्ध आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000


अल्पसंख्याक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे
ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 28 :- अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार सन 2019-20 साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 ऑक्टोंबर 2019 पर्यंत होती. परंतू आता 31 ऑक्टोंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज पर्यंत भरता येतील.
सन 2019-20 या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन 2019-20 यावर्षी रीनिवल व फ्रेश विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.) यांनी केले आहे.  
00000


मुग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी
ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 28 :-  केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम सन 2019-20 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्याकरीता शेतकरी नोंदणीची मुदत शासनाकडून गुरुवार 31 ऑक्टोंबर 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करावी व हमीभाव खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विक्री करुन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.
00000


शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव खरेदी,
शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा  
नांदेड, दि. 28 :- शेतकऱ्यांनी किमान हमीभाव दरापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री करता हमीभाव दराप्रमाणे शासकीय खरेदी केंद्रावर आपला शेतमाल विक्रीस आणावा. ज्या शेतकऱ्यांना सध्या शेतमाल विक्री करावयाचा नसून वाढीव बाजारभावाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. तसेच शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेण्यास विसरु नये, असे आवाहन प्रवीण फडणीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात नाफेड विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत मूग, उडीद सोयाबीन शेतमाल किमान हमीभाव दराप्रमाणे खरेदी करणेसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरु झालआहेत. यात अर्धापूर (नांदेड), मुखेड, हदगाव किनवट येथे नाफेडचे शासकीय खरेदी केंद्र सुरु असून नायगाव, भोकर धर्माबाद येथे विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांचे शासकीय खरेदी केंद्र सुरु आहेत. या शासकीय खरेदी केंद्रावर मूग उडीद यांची ऑनलाईन नोंदणी 31 ऑक्टोंबर 2019 पर्यंत होणार आहे. तर सोयाबीन पिकांची नोंदणी 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर शेतमाल विक्रीस आणताना शेतमाल वाळवून, काडीकचरा विरहीत चाळणी करुन आर्द्रता 12 टक्के पेक्षाकमी असलेला स्वच्छ शेतमाल आणावा.
 शेतमालाचा काढणी हंगाम सुरु झाल्याबरोबर शेतमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत असतो. परिणामी जास्त आवकमुळे बाजारभाव खाली येतात. शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक निकडीमुळे मिळेल त्या भावात शेतमाल विकण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतू शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर विक्री केल्यास वाढीव बाजारभावाचा फायदा शेतकऱ्यांस निश्चित होऊन शेतमालास योग्य भाव मिळू मिळतो. यादृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे, असेही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
00000


मतदार जनजागृतीसाठी माध्यम संस्थांना
निवडणूक आयोगाकडून पुरस्कार
नांदेड, दि. 26 : लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट) / सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील.
लोकशाही बळकटीकरणासाठी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात जनजागृती, सर्वसामान्यांमध्ये मतदान जागृती व मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना 25 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. मतदार जागृती मोहीम, मोठ्या प्रमाणातील विशेष प्रसिद्धी, जनतेवर पडलेला प्रभाव या निकषांवर पुरस्कारांची निवड करण्यात येईल. त्यासाठी माध्यम संस्थांनी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण यांनी केले आहे.
प्रसारमाध्यमांनी इंग्रजी आणि हिंदीमधून प्रवेशिका पाठवाव्यात. इतर कोणत्याही भाषेतून या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवता येईल. मात्र त्यासोबत इंग्रजीतून भाषांतर केलेली प्रत सोबत जोडावी लागेल. संपर्क - श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली  110001, ईमेल- media.election.eci@gmail.com, अथवा diwaneci@yahoo.co.in, दूरध्वनी क्र. 011-23052133.
00000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 26.01 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यात सोमवार 28 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 26.01 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 416.19 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1002.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 104.90 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सोमवार 28 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 44.25 (1101.71), मुदखेड- 14.33 (1255.34), अर्धापूर- 40.67 (894.33), भोकर- 36.25 (996.70), उमरी- 32.67 (985.10), कंधार- 16.33 (1052.67), लोहा- 31.67 (1043.40), किनवट- 11.14 (979.68), माहूर- 34.25 (989.34), हदगाव- 20.43 (765.08), हिमायतनगर- 34.33 (904.72), देगलूर- 11.00 (873.51), बिलोली- 32.20 (1036.40), धर्माबाद- 33.67 (1070.67), नायगाव- 16.00 (1043.80), मुखेड- 7.00 (1045.98). आज अखेर पावसाची सरासरी 1002.40 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 16038.43) मिलीमीटर आहे.
00000

  वृत्त क्र.   386 मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य ; 12 पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून करा मतदान ; मतदार यादीत नाव असणे आवश्यक   नांदेड,...