Friday, March 22, 2019

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
निवडणूक निरिक्षक (खर्च) म्हणून
विरेंद्र सिंघ यांची नियुक्ती
तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22 :- निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची घोषणा केली आहे. त्यानुसार 16 नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी विरेंदर सिंघ यांची निवडणूक निरिक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक निरीक्षक यांचे वास्तव्य मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे असून कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462-250140 तर भ्रमणध्वनी  क्रमांक 9022069690 असा आहे. 16-नांदेड लोकसभा परिक्षेत्रातील नागरिकांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूककरीता आपल्या काही तक्रारी असतील तर निवडणूक निरीक्षक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 16, नांदेड लोकसभा मतदारसंघ यांनी केले आहे.
00000

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
सोमवारी स्थानिक सुट्टीच्या दिवशी
 नामनिर्देशन पत्र स्विकारली जाणार  
नांदेड, दि. 22 :-  कंधार ऊर्स निमित्त सोमवार 25 मार्च 2019 रोजी नांदेड जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली असली तरी यादिवशी सार्वत्रिक निवडणूक लोकसभा-2019 चे नामनिर्देशन पत्र विहित वेळेत स्विकारली जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.  
सोमवार 25 मार्च 2019 रोजी कंधार ऊर्स निमित्त नांदेड जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतू भारत निवडणूक आयोगाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांचे निजी कक्षात सोमवार 25 मार्च 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

  विशेष लेख :   महिला आणि मतदान ;  संघर्षातून मिळालेला मताधिकार हक्काने वापरा !   जगामध्ये लोकशाहीच्या व मतदानाच्या इतिहासात आपण डोक...