Wednesday, January 23, 2019

  विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करीअर निवडावे
- संजय कोलगणे
नांदेड दि. 23 :-  प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करीअर निवडावे व स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्यास यश हमखास मिळते पण यासाठी स्वत:ला झोकुन देऊन परीक्षेची तयारी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे यांनी केले. ते जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजीत दोन दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
या शिबीराला राज्यकर सहाय्य्क आयुक्त समधान महाजन व  जिल्हा ग्रंथालय अ‍धिकारी आशिष ढोक यांची उपस्थिती होती. श्री महाजन यांनी इतिहास या विषयावर अभ्यासपुर्ण असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व व्याखात्यांचा परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी करुन दिला. सुत्रसंचालन व आभार मुक्तिराम शेळके यांनी मानले. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी बाळू पावडे, आरती कोकुलवार, संजय कर्वे, कोडिंबा गाडेवाड यांनी सहाय्य केले.
000000

मंडप, पेंडाल तपासणी समितीची पुर्नरचना  
नांदेड दि. 23 :- मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्राकरीता उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे अध्यक्षतेखाली मंडप, पेंडाल तपासणी सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी नांदेड यांची पूर्वीचे पोलीस उपअधिक्षक गृह यांची बदली झाल्याने त्यांचे जागी नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश करुन समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश काढले आहेत.
या समितीचे अध्यक्ष नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी असून सदस्य नांदेड महानगरपालिकेचे उपायुक्त विलास भोसीकर व नांदेड पोलीस उपअधिक्षक (गृह) एस. एम. देशमुख हे आहेत. या आदेशात म्हटले आहे की, सर्व सनियंत्रण समिती सदस्य शासन परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. मंडप तपासणी समितीने सार्वजनिक सण, उत्सव, समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या पथकांच्या क्षेत्राबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सादर करतील. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जानेवारी महिन्याच्या 21 तारखेपर्यत मंडप तपासणी पथक, पथके गठीत करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले जातील. गठीत करण्यात आलेल्या मंडप तपासणी पथकाची माहिती विवरणपत्र क्रमांक एक नुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनीय भागावर प्रदर्शित करावी. समितीने गठित मंडप तपासणी पथकास आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मंडप, पेंडाल यांना सार्वजनिक सण, उत्सव, समारंभापुर्वी सात दिवस अगोदर नियमित भेट देण्यासंदर्भात आदेशित करावे. समितीने मंडप तपासणी पथकाकडून तपासणीबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल विहित कालमर्यादेत (सण, उत्सव, समारंभ सुरु होण्यापूर्वी तीन दिवस अगोदर) प्राप्त करुन घेऊन एकत्रितपणे माहिती प्रपत्र क्र. 2 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. मंडप तपासणी पथकामार्फत सादर करण्यात आलेल्या अहवालावर सक्षम प्राधिकाऱ्याने केलेल्या कार्यवाहीचा त्रै-मासिक अहवाल विवरणपत्र क्र. 2 मध्ये शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास नियमितपणे सादर करण्याची जबाबदारी मंडप तपासणी समितीची राहिल. ही कार्यवाही करताना मा. उच्च न्यायालयांचे निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व कुठल्याही परिस्थितीत मा. उच्च न्यायालयाचे आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000


भारतीय डाक विभागात
विमा व्यवसायासाठी एजंटची भरती
नांदेड, दि. 23 :- नांदेड डाक विभागात डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा व्यवसायासाठी एजंट भरतीसाठी अर्ज अधिक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड येथे शनिवार 9 फेब्रुवारी 2018 पर्यंत मागविण्यात येत आहेत. सुशिक्षित बेकार, माजी विमा सल्लागार, माजी विमा एजंट, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते अर्ज करु शकतात, असे आवाहन नांदेड विभागाचे अधिक्षक डाकघर शिवशंकर लिंगायत यांनी केले आहे. 
डाक जीवन विमासाठी  20 एजंट तर ग्रामीण डाक जीवन विमा 30 एजंटसाठी लायसन्स तत्वावर आणि कमिशन धर्तीवर नियुक्त करण्यात येणार आहे. मुलाखतीच्यावेळी वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे. पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त लोकवस्तीच्या ठिकाणी नियुक्तीसाठी बारावी उत्तीर्ण तर इतर ठिकाणी दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. जीवन विमा उत्पादने विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इत्यादी बाबी अपेक्षित आहेत.
000000


इंग्रजी माध्यमातील शाळांच्या प्रवेशासाठी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन
नांदेड, दि. 23 :- जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत सन 2019-20 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देणेसाठी इच्छूक पालकाकडून गुरुवार 30 जानेवारी 2019 पर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प कार्यालय किनवट येथून प्राप्त करुन कागदपत्राच्या अटी व शर्ती पुर्ण करुन परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन अभिनव गोयल (भा.प्र.से) प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांकासह मूळ प्रमाणपत्र सादर करावे. अन्यथा दारिद्रयरेषेसाठी अर्जाचा विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत असावे. त्यासाठी तहसिलदाराचे यांचे सन 2018-19 चे उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पूर्ण असावे. ( जन्म 1 जून 2012 ते 1 जून 2013 या कालावधीत झालेला असावा. ) पालकाचे संमतीपत्र, दोन पासपोर्ट फोटो व जन्म तारखेचा दाखला जोडावा. अंगणवाडी, ग्रामसेवक यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह असावा. विद्यार्थ्यांचे वैद्यकीय अधिकारी, / तालुका व जिल्हा चिकत्सक यांचे  यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोटीता, निराधार, परितक्त्या व दारिद्रयरेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. घटस्फोटीता कार्यालयीन निवाड्याची प्रत सोबत जोडावी. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. त्याबाबत लेखी लिहुन दयावे. वर्ग दुसरी प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे तसेच इयत्ता पहिली व दुसरी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करावयाचा कालावधी 7 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 पर्यंत राहिल. अर्जात खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येत नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र देण्यात यावे. वरील अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असेही आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
000000


विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड, दि. 23 :- महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
गुरुवार 24 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वा. नांदेड येथून शासकीय मोटारीने वसमतनगरकडे प्रयाण करतील.  
0000


राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त
शुक्रवारी रॅलीचे आयोजन  
नांदेड दि. 23 :- नऊ वा राष्‍ट्रीय मतदार दिवस शुक्रवार 25 जानेवारी 2019 रोजी साजरा करण्‍यात येणार असून सकाळी 7 वा. मोटार सायकल / मोपेड रॅलीचे आयोजन करण्‍यात आले आहे. या रॅलीस मान्‍यवरांचे हस्‍ते हिरवी झेंडी दाखवून महात्‍मा फुले पुतळा आयटीआय येथुन सुरुवात करण्‍यात येणार आहे.  
            या रॅलीचा मार्ग महात्‍मा फुले पुतळा–आय टी आय –गणेशनगर वाय पॉईंट – मोरचौक -छत्रपती चौक राज कॉर्नर - वर्कशॉप कॉर्नर –आनंदनगर- हिंगोली गेट -शहीद भगतसिंग मार्ग -बाफना -जुना मोंढा टॉवर–शिवाजीनगर- महात्मा फुले पुतळा ते डॉ. शंकरराव चव्‍हाण पेक्षागृह असा राहील. या रॅलीचा समारोप व राष्‍ट्रीय मतदार दिनाचे मुख्‍य कार्यक्रमाचे आयोजन डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्‍यात आले आहे. या राष्‍ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात जास्‍तीत जास्‍त नगरिकांनी / नव मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हा‍ निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000



प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी ध्वजवंदनाचा
मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर
नांदेड, दि. 23 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार 26 जानेवारी 2019 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000


पुनर्वसनाच्या नागरी सुविधा विस्थापित
गावठाणाची कामे त्वरीत पूर्ण करावीत  
                     - उपाध्यक्ष माधव भांडारी

नांदेड, दि. 23:- पुनर्वसनाच्या नागरी सुविधा विस्थापित गावठाणाची कामे त्वरीत पूर्ण करावीत.  पुनर्वसनाच्या कामासाठी उपलब्ध असलेल्या निधीचा शासनस्तरावर जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानुसार मंत्रालय स्तरावर संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे कार्यवाही करण्याचे, निर्देश महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निजी कक्षात महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मुक्रमाबादचा स्वेच्छा पुनर्वसनासंबंधी अडचणीचे निराकरण करण्याबाबत मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष श्री. भांडारी यांनी केले.  
या बैठकीस आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार रोठाड, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, लेंडी प्रकल्पचे कार्यकारी अभियंता रा. मा. देशमुख, संतुक हंबर्डे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आदि संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.    
लेंडी प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये, प्रशासकीय मान्यता, राज्यनिहाय खर्चाचा वाटा, पाणी वापर व सिंचनक्षमता, प्रकल्पाची सद्यस्थिती, भूसंपादन, प्रकल्प पुनर्वसन सद्यस्थिती स्वच्छा पुनर्वसनाची आवश्यकता, मुक्रमाबाद व ईटग्याळ, गावठाणांतर्गत संपादीत करावयाचा घरांचा तपशिल, स्वेच्छा पुनर्वसन अनुदान देण्यासंबंधिची प्रस्तावित कार्यपध्दती, मुक्रमाबाद येथील मावेजा वाटप कार्यपध्दती, गावनिहाय वाढीव कुटूंबसंख्या निश्चितीची कार्यपध्दती, प्रमुख अडचणी व उपाय, कामाचे नियोजन व आवश्यक निधी आदि विविध विषयांची माहिती सादरीकरणाद्वारे कार्यकारी अभियंता रा. मा. देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुर्नर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली. 
0000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...