Thursday, January 11, 2024

वृत्त क्र. 37

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात

प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती 

 

नांदेड (जिमाका), दि. 11 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2024-25 या सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील आयटीआय/अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्तीर्ण उमेदवारांना भरती करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्याव्यतीरीक्त इतर जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज  मागील तीन वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

यात मेकॅनिक मोटर व्हेईकल -78, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनर- 4, ॲटो इलेक्ट्रीशियन-13, शिट मेटल वर्क्स-18, पेंटर(जनरल) -2, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-  डिग्री/डिप्लोमा इन मेकॅनिकल/ॲटोमोबाईल इंजिनीअरींग - अशी एकुण 120 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. (अनुसूचीत जातीअनुसूचीत जमाती  दिव्यांगासाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत.)  त्यासाठी आयटीआय उत्तीर्ण किंवा शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणाऱ्या विहीत केलेल्या व्यवसायाचे व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व अॅटो इंजिनिअरींग टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण  उमेदवारांना  www.apprenticeshipindia.gov.in   डिग्री/डिप्लोमा इन मेकॅनिकल/ॲटोमोबाईल इंजिनीअरींग उत्तीर्ण उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहेनंतर एमएसआरटीसी विभागीय कार्यालय नांदेड या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करुन रा.महामंडळाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन सादर करणे वश्यक राहील. हे छापील अर्ज 11 ते 19 जानेवारी 2024 रोजी 3 वाजेपर्यंत शनिवार  सुटटीचा दिवस वगळुन विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा..नांदेड येथे मिळतील  लगेच स्वीकारले जातीलया अर्जाची किमत खुल्या प्रवगाकरीता 590 रुपये  मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे.

00000

 वृत्त क्र. 36

पोलीस पाटील पदभरती परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश


नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती परीक्षा-2024 रविवार 14 जानेवारी 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील 38 परीक्षा केंद्रावर एका सत्रात दुपारी 2 ते 4 या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळवले आहे. 


नांदेड जिल्ह्यातील विविध 38 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर  दुपारी 2 ते 4  या कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (2)अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील  100  मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000

वृत्त क्र. 35

 आयुष्यमान भारत मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा दौरा

नांदेड (जिमाका), दि. 11 :- आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे शनिवार 13 जानेवारी 2024 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शनिवार 13 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वाना मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा 2024 अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांचा आढावा आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे घेणार आहेत.

 

शनिवार  13 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. आयुष्यमान भारत/महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठकीस उपस्थिती. यानंतर सकाळी 11 वा. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.30 वा. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधांची आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 12 वा. पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधतील.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...