Thursday, July 23, 2020


वृत्त क्र. 677   
नांदेड जिल्ह्यात 56 बाधितांची भर  
कोरोनातून आज 36 व्यक्ती बरे तर पाच व्यक्तींचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 23 :-  जिल्ह्यात आज 23  जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 56 व्यक्तींचे अहवाल बाधित आले. आज 36 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 218 अहवालापैकी 149 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 130 एवढी झाली असून यातील 610 एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे. 458 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात 5 महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे.
बुधवार 22 जुलै रोजी मुखेड कोविड रुग्णालयातील 85 वर्षाचा एका पुरुषाचा, बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील 60 वर्षाचा एका पुरुषाचा, गुरुवार 23 जुलै रोजी मुखेड तालुक्यातील वाल्मीक नगर येथील 56 वर्षाच्या पुरुषाचा, देगलूर तालुक्यातील सुगाव येथील 55 वर्षीय एका पुरुषाचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर नांदेड तालुक्यातील जवाहरनगर येथील 75 वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. असे 5 बाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 53 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 36 बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 1, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 3, देगलूर कोविड रुग्णालयातील 1, माहूर कोविड रुग्णालयातील 1, नायगाव कोविड रुग्णालयातील 7, बिलोली कोविड रुग्णालयातील 6, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 15, खाजगी रुग्णालयातील एका बाधितांचा  यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण 610 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.  
आरटीपीसीआर तपसणी प्रक्रियेद्वारे नवीन बाधितांमध्ये आयटीआय नांदेड येथील 51 वर्षाचा 1 पुरुष, लेबर कॉलनी नांदेड 43 वर्षाचा 1 पुरुष, आंबेडकर नगर येथील 4 वर्षाचा 1 पुरुष व 24 व 45 वर्षाच्या 2 महिला, हडको येथील 47 व 55 वर्षाचे 2 पुरुष, गोकुळनगर येथील 30 व 59 वर्षाचे 2 पुरुष, चिराख गल्ली नांदेड येथील 75 वर्षाचा 1 पुरुष, लिंबगाव नांदेड येथील 40 व 70 वर्षाचे दोन पुरुष, खोजा कॉलनी नांदेड येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, वसंतनगर नांदेड येथील 40 वर्षाची 1 महिला, शाहिदपुरा नांदेड येथील 57 वर्षाचा 1 पुरुष व 18 वर्षाची 1 महिला, सोमेश कॉलनी नांदेड येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, चैतन्यनगर येथील 25 वर्षाची 1 महिला, छत्रपती चौक येथील 43 वर्षाचा 1 पुरुष, पाठक गल्ली येथील 20,20,21, 57 वर्षाचे चार पुरुष, वजिराबाद येथील 62 वर्षाचा 1 पुरुष, जवाहरनगर येथील 75 वर्षाचा 1 पुरुष, बळीरामपूर येथील 54 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील वाल्मीकनगर येथील 56 वर्षाचा 1 पुरुष, हदगाव तालुक्यातील तामसा ओम गल्ली येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, हदगाव तालुक्यातील पेवा येथील 45 वर्षाची 1 महिला, हदगाव येथील 30 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील महादेव मंदिर येथील 45 वर्षाची 1 महिला, देगलूर तालुक्यातील सुगाव येथील 55 वर्षाची 1 महिला, देगलूर सत्यमनगर येथील 56 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील खाजाबाबानगर येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर येथील 47 वर्षाचा 1 पुरुष, लोहा तालुक्यातील मार्केट यरिया येथील 34 वर्षाचा 1 पुरुष व 65 वर्षाची 1 महिला, कंधार तालुक्यातील फुलवळ येथील 9 व 25 वर्षाचे 2 पुरुष आणि 15 व 40 वर्षाच्या 2 महिला, नायगाव तालुक्यातील बालाजीनगर येथील 52 वर्षाचा 1 पुरुष, उमरी तालुक्याती मोंढा मार्केट येथील 9,21,24,25,45,48,71 वर्षाचे 7 पुरुष व 23,42,42,45 वर्षाच्या 4 महिला, परभणी जिल्ह्यातील सेलू येथील 53 वर्षाचा 1 पुरुष, गंगाखेड येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील 55 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे.
जिल्ह्यात 458 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 89, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 167, जिल्हा रुग्णालय येथे 23, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 12, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 4, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 46, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 21, उमरी कोविड केअर सेंटर 9, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 3, लोहा कोविड केअर सेंटर येथे 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 3, हदगाव कोविड केअर सेंटर 2, भोकर कोविड केअर सेंटर येथे 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 10, खाजगी रुग्णालयात 47 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 900,
घेतलेले स्वॅब- 11 हजार 318,
निगेटिव्ह स्वॅब- 8 हजार 935,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 56
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 130,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 9,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,
मृत्यू संख्या- 53,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 610,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 458,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 492. 
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000

वृत्त क्र. 676


वृत्त क्र. 676   

कपाशीवरील बोंडअळी व सोयाबीनवरील
किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना
नांदेड (जिमाका) दि. 23 :- मराठवाड्यातील नांदेड व परभणी जिल्ह्यात जून महिन्याच्या लागवड केलेल्या बीटी कपाशीमध्ये पाते फुले लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापणासाठी सामूहिकपणे एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करुन किडींचा प्रादुर्भाव ओळखून उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावाचे निरीक्षण करण्यासाठी कपाशीच्या लागवडीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी पाच  साम कामगंध सापळे व गुलाबी बोंडअळीचे पतंग नष्ट करण्यासाठी कपाशीच्या शेतात हेक्टरी 40 सापळे लावावे. पाच टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी किंवा आझार्डीरेक्टींन 1 हजार 500 पीपीएम 50 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. बीटी कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीच्या अंडी अवस्थेत व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किडीची 1.5 लाख अंडी प्रति हेक्टर 50 70 दिवसानंतर दोन वेळा वापर करण्यात यावा. आर्थिक नुकसानीची पातळी : आठ पतंग प्रति सापळे सतत तीन दिवस किंवा एकरी दहा फुले किंवा एकरी दहा बोंडे याप्रमाणे आढळून आल्यास रासायनिक कीटकांनाशकाची फवारणी करावी. थायोडीकार्ब 75 टक्के पाण्यात विद्राव्य असणारी भुकटी 20 ग्राम किंवा क्विंनालफोस 25 ईसी 20 मिली प्रती 10 लीटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सुरु  झाला आहे. चक्रीभुंगा या किडीचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनांमध्ये 30 ते 40 पर्यंत घट संभवते. ही कीड खोडावर दोन समांतर खापा करुन अंडी घालते. यामधून अळ्या बाहेर निघाल्यानंतर खोडातील गर खातात. त्यामुळे त्यावरील भाग सुकतो. आर्थिक नुकसानीची पातळी : एक मीटर ओळीमध्ये तीन ते पाच प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास उपाययोजना करावी.
व्यवस्थापन : पेरणी झाल्यानंतर सोयाबीन पीकास नत्रयुक्त (युरिया) खताचा वापर करु नये. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पीकाची कायिक वाढ अधिक होऊन उत्पादनामध्ये घट येते.
किटकनाशक : प्रोफेनोफोस 50 टक्के 20 मिली किंवा इथिओन 50 ईसी 30 मिली किंवा थायाक्लोप्रीड 21.7 सीएस 6 मिली प्रती 10 लीटर पाणी (साध्या पंपाकरीता) याप्रमाणात फवारणी करावी.
सोयाबीन वरील फुले, शेंगा खाणारी अळीचे व्यवस्थापन  
सद्यस्थितीमध्ये सातत्याने ढगाळ हवामान असून अशा परिस्थितीमध्ये भविष्यात घाटेअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फुले लागण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास या अळ्या फुले खातात. सोयाबीन वाढलेल्या अवस्थेत या अळीचा फुलावर होणारा प्रादुर्भाव सहजरीत्या निदर्शनास येत नाही. याकरिता प्रादुर्भावाबाबत नियमित पाहणी करुन पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी. बिव्हेरिया बसीयाना 40 ग्राम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 3.5 ग्राम किंवा लामडा साय हलोथ्रीन 4.9 सीएस 6 मिली प्रती 10 लीटर पाणी (साध्या पंपाकरीता) याप्रमाणात फवारणी करावी. किडींचा प्रादुर्भाव ओळखून व्यवस्थापन उपाययोजना करावी असे कापूस विशेषज्ञ, कापूस संशोधन केंद्र यांनी कळविले आहे.
000000

कपाशीवरील बोंडअळी व सोयाबीनवरील
किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना
नांदेड (जिमाका) दि. 23 :- मराठवाड्यातील नांदेड व परभणी जिल्ह्यात जून महिन्याच्या लागवड केलेल्या बीटी कपाशीमध्ये पाते फुले लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापणासाठी सामूहिकपणे एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करुन किडींचा प्रादुर्भाव ओळखून उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावाचे निरीक्षण करण्यासाठी कपाशीच्या लागवडीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी पाच  साम कामगंध सापळे व गुलाबी बोंडअळीचे पतंग नष्ट करण्यासाठी कपाशीच्या शेतात हेक्टरी 40 सापळे लावावे. पाच टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी किंवा आझार्डीरेक्टींन 1 हजार 500 पीपीएम 50 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. बीटी कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीच्या अंडी अवस्थेत व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किडीची 1.5 लाख अंडी प्रति हेक्टर 50 70 दिवसानंतर दोन वेळा वापर करण्यात यावा. आर्थिक नुकसानीची पातळी : आठ पतंग प्रति सापळे सतत तीन दिवस किंवा एकरी दहा फुले किंवा एकरी दहा बोंडे याप्रमाणे आढळून आल्यास रासायनिक कीटकांनाशकाची फवारणी करावी. थायोडीकार्ब 75 टक्के पाण्यात विद्राव्य असणारी भुकटी 20 ग्राम किंवा क्विंनालफोस 25 ईसी 20 मिली प्रती 10 लीटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सुरु  झाला आहे. चक्रीभुंगा या किडीचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनांमध्ये 30 ते 40 पर्यंत घट संभवते. ही कीड खोडावर दोन समांतर खापा करुन अंडी घालते. यामधून अळ्या बाहेर निघाल्यानंतर खोडातील गर खातात. त्यामुळे त्यावरील भाग सुकतो. आर्थिक नुकसानीची पातळी : एक मीटर ओळीमध्ये तीन ते पाच प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास उपाययोजना करावी.
व्यवस्थापन : पेरणी झाल्यानंतर सोयाबीन पीकास नत्रयुक्त (युरिया) खताचा वापर करु नये. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पीकाची कायिक वाढ अधिक होऊन उत्पादनामध्ये घट येते.
किटकनाशक : प्रोफेनोफोस 50 टक्के 20 मिली किंवा इथिओन 50 ईसी 30 मिली किंवा थायाक्लोप्रीड 21.7 सीएस 6 मिली प्रती 10 लीटर पाणी (साध्या पंपाकरीता) याप्रमाणात फवारणी करावी.
सोयाबीन वरील फुले, शेंगा खाणारी अळीचे व्यवस्थापन  
सद्यस्थितीमध्ये सातत्याने ढगाळ हवामान असून अशा परिस्थितीमध्ये भविष्यात घाटेअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फुले लागण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास या अळ्या फुले खातात. सोयाबीन वाढलेल्या अवस्थेत या अळीचा फुलावर होणारा प्रादुर्भाव सहजरीत्या निदर्शनास येत नाही. याकरिता प्रादुर्भावाबाबत नियमित पाहणी करुन पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी. बिव्हेरिया बसीयाना 40 ग्राम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 3.5 ग्राम किंवा लामडा साय हलोथ्रीन 4.9 सीएस 6 मिली प्रती 10 लीटर पाणी (साध्या पंपाकरीता) याप्रमाणात फवारणी करावी. किडींचा प्रादुर्भाव ओळखून व्यवस्थापन उपाययोजना करावी असे कापूस विशेषज्ञ, कापूस संशोधन केंद्र यांनी कळविले आहे.
000000

वृत्त क्र. 675


24 जुलैपासून सोमवार ते शुक्रवारी पर्यंत
सकाळी 7 ते सायं. 5 पर्यंत दुकाने, खाजगी आस्थापनांना मुभा   
नांदेड (जिमाका) दि. 23 :- कोराना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलै पासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून (मिशन बिगीन अगेन) सकाळी 7 ते सायं. 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवार 24 जुलै 2020 पासून पुढील आदेशापर्यंत (Mission Begin Again) अन्‍वये  राज्य शासनाच्या सुचनेनुसार तसेच यापुर्वीच्या आदेशातील नमूद निर्देशानुसार नांदेड जिल्‍हयात प्रतिबंधीत क्षेत्र वगळून खालीलप्रमाणे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले आहेत.
संपूर्ण नांदेड जिल्‍हयात पुढील प्रमाणे बाबी प्रतिबंधित राहतील
सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्‍था व शिकवणी वर्ग इ. बंद राहतील. तथापि ऑनलाईन, आंतर शिक्षण यास मुभा राहील. हॉटेल / रेस्‍टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटीच्‍या सेवा हया गृहनिर्माण, आरोग्‍य, पोलीस, शासकिय अधिकारी, आरोग्‍य सेवा कर्मचारी, पर्यटकांसह अडकलेल्‍या व्‍यक्‍ती आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल. तसेच वरील सेवेसाठीच बसस्‍टॉप, रेल्‍वेस्‍टेशन येथे चालू असलेल्‍या कॅन्‍टीनचा सुध्‍दा वापर करता येईल. रेस्‍टॉरंटला खाद्यपदार्थाच्‍या होम डिलेव्‍हरीसाठी स्‍वयंपाकघर वापरण्‍यास मुभा असेल.
सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्‍यायामशाळा व जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्‍ली हॉल व इतर तत्‍सम ठिकाणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्ये, इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल. सर्व धार्मिक स्‍थळे, पुजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्‍यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्‍यादीवर बंदी राहील.
जिल्ह्यात सायंकाळी  5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू
संचारबंदी कालावधीत सायं 5 ते सकाळी 7 यावेळेत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्‍यावश्‍यक सेवेकरिता  नेमण्‍यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय कारणास्‍तव रुग्‍ण व त्‍यांच्‍यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. यावेळेत विनाकारण फिरतांना आढळल्‍यास अशा व्‍यक्‍तींच्‍या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.
आरोग्‍य सेतूचा वापर करावा
आरोग्य सेतुचा वापरामुळे कोव्हिड-19 आजाराच्‍या प्रादुर्भावात त्‍वरीत सूचना मिळते व त्‍याचा फायदा व्‍यक्‍तीस व समाजाला सुध्‍दा होतो. त्‍यामुळे ॲन्ड्राइड फोनचा वापर करणाऱ्या सर्व  नागरिकांनी मोबाईल मध्‍ये आरोग्‍य सेतू अॅप डाऊनलोड करावे. शासकिय कार्यालय व खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्‍या व इतरांच्‍या सुरक्षितेसाठी आरोग्‍य सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील. नांदेड जिल्‍हयातील सर्व नागरिकांनी आरोग्‍य सेतु अॅप डाऊनलोड करुन त्‍याचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.  
आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने धोकादायक वयोगट असणारे 65 वर्षाचे वरिल जेष्‍ठ नागरिक, अनेक व्‍याधी असणारे व्‍यक्‍ती, गरोदर माता, दहा वर्षाखालील मुले यांनी टाळेबंदी काळात अत्‍यावश्‍यक काम, आरोग्य कारणाचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही. त्‍यांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
नांदेड जिल्‍हा नॉनरेड झोनमध्‍ये असल्‍याने आदेशातील परिशिष्‍ट तीन मध्‍ये नमुद प्रमाणे आस्‍थापने व दुकाने प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील दुकाने व खाजगी आस्‍थापनांना केवळ सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्‍यास मुभा दिली आहे. परंतू सर्व शासकिय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने वैद्यकिय अत्‍यावश्‍यक सर्व सेवा तसेच पशुवैद्यकिय दवाखाने व औषधालये हे पुर्णवेळ चालू राहतील.
जिल्‍हयातील सर्व शासकीय कार्यालय, बँकेचे सर्व व्‍यवहार पुर्वी दिलेल्‍या निर्देश, अटी शर्तीनुसार  कार्यालयीन वेळेत चालू राहतील. क्रीडा कॉम्‍पलेक्‍स आणि स्‍टेडिअम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्‍यायामासाठी मोकळी राहील. तथापि या ठिकाणी प्रेक्षक आणि ग्रुप ॲक्टीव्हिटीजसाठी मुभा राहणार नाही. सर्व शारीरिक व्‍यायाम व त्‍यासंबंधीत इतर क्रिया सामाजिक अंतर राखुन करता येतील.
सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीस दुचाकी वाहन 1 व्‍यक्‍ती, तीन चाकी वाहन 1 अधिक 2 व्‍यक्‍ती, चार चाकी वाहनासाठी 1 अधिक 2 व्‍यक्‍तींना मुभा राहील. नांदेड जिल्‍हयांतर्गत बससेवा जास्‍तीतजास्‍त 50 टक्‍के क्षमतेनुसार सुरु करण्‍यास मुभा देण्‍यात येत आहे. परंतु सामाजिक अंतर व स्‍वच्‍छतेची उपाययोजना करणे आवश्‍यक राहील. सर्व दुकाने, बाजारापेठ सुरु ठेवण्‍यास मुभा देण्‍यात येत आहे. परंतु उक्‍त दुकाने, बाजारपेठच्‍या ठिकाणी गर्दी वाढल्‍यास किंवा सामाजिक अंतराचे व वेळोवेळी निर्गत आदेशाचे पालन करण्‍यात येत नसल्‍याचे दिसून आल्‍यास दंडात्‍मक व कायदेशिर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्‍यात येईल.
वरील बाबींपैकी प्रतिबंधीत क्षेत्रामध्‍ये केवळ जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा तसेच अत्‍यावश्‍यक वैद्यकीय सेवांना मुभा राहील. जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमीत केलेल्या 4 जून 2020 रोजीच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्‍था (विद्यापीठे,महाविद्यालये,शाळा) या ठिकाणचे कर्मचारी यांना फक्‍त अध्‍यापना व्‍यतिरिक्‍त इतर कामाकरिता कार्यालयात उपस्थित राहून उत्‍तर पत्रिकांचे मुल्‍यांकन आणि परिक्षांचे निकाल यासारखे व इतर कार्यालयीन कामे करण्‍यासाठी मुभा राहील.
जिल्‍हयातील मंगल कार्यालयाच्‍या ठिकाणी केवळ लग्‍नसंमारंभाच्‍या आयोजनाची मुभा 7 व 8 जून 2020 रोजी आदेशातील नियम व अटींच्‍या अधिन राहून राहील. तसेच 7 जुलै 2020 रोजीच्या आदेशान्वये  निवास व्‍यवस्‍था असलेले हॉटेल, अतिथीगृह व लॉज चालू ठेवण्‍यासाठी दिलेली मुभा उक्‍त आदेशात नमुद नियम व अटींच्‍या अधिन राहून लागु राहील.            
वरील दुकाने / आस्‍थापनाच्‍या ठिकाणी उपाययोजना बंधनकारक राहिल
कामाच्‍या ठिकाणी, दुकानात प्रवेशापुर्वी हॅन्‍डवॉश, सॅनिटायझरचा वापर करावा. एका वेळेस दुकानात पाच पेक्षा जास्‍त ग्राहकास प्रवेश राहणार नाही. दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्‍या चेह-यावर मास्‍क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अन्‍यथा 1 हजार रुपये एवढा दंड संबंधितांकडून आकारण्‍यात येईल. मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्‍तू, ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत र्निजंतूकीकरण करणे. ग्राहकांकडून खरेदीनंतर पैशांची देवाण-घेवाण आरबीआयच्‍या सुचनेनुसार ई-वॉलेटस व स्‍वाईप मशीनद्वारे करण्यास भर द्यावा. वरील  नेमून दिलेल्‍या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्‍यास तसेच उपाययोजनेचे भंग केल्‍यास 5 हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदारास आकारण्‍यात येईल.
सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्‍यास 1 हजार रुपये दंड आकारण्‍यात येईल. सार्वजनिक कामाची ठिकाणे व सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळावेत. लग्नसमारंभ निमित्ताने होणारे जमाव संबंधाने सामाजिक अंतराचे नियम पाळावे व अशा ठिकाणी 50 पेक्षा जास्त आमंत्रित असु नयेत. तसेच लग्‍न सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीतच पार पाडणे आवश्‍यक असेल. अंत्यविधीमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत व 50 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असु नये. दारु, पान, गुटखा, तंबाखू इत्याचे चे सार्वजनिक ठिकाणी सेवन निषिद्ध आहे अन्‍यथा कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल.
सर्व दुकाने ही दोन ग्राहकामध्ये सहा फूट अंतर या नियमांनुसार व एका वेळेस 5 पेक्षा जास्त लोक जमा  होणार नाहीत, अशा प्रकारे चालु राहतील. कामाचे ठिकाणी अवलंबवायच्या अतिरिक्त मार्गदर्शक सुचना थर्मल स्क्रीनींग, हॅंडवाश, सॅनिटायजर्स हे कामाचे ठिकाणी प्रवेश व निर्गमन मार्गावर तसेच सामान्य  ठिकाणी उपलब्ध करुन द्यावे. कामाचे संपूर्ण क्षेत्र वारंवार मानवी संपर्कात येणारी ठिकाणे उदा. दरवाज्याचे कडी-कोंडी इत्याचे चे निर्जंतुकीकरन वारंवार तसेच शिफ्ट दरम्यान करावे. सर्व प्रभारी अधिकारी व संबंधितांनी कामाचे ठिकाणी कामगारांमध्ये पुरेशा प्रमाणात अंतर ठेवून  सामाजिक अंतर राखले जावे. तसेच शिफ्ट दरम्यान अंतर ठेवावे व जेवणाच्या वेळा नियंत्रित कराव्यात.
रेड झोनव्‍यतिरिक्‍त भागात व  प्रतिबंधित क्षेत्रात परवानगी नसलेल्या बाबी हवाई, रेल्‍वे    मेट्रो  प्रवास, आंतरराज्‍य  मार्ग  वाहतूक, शैक्षणिक  संस्‍था, आदरातिथ्‍य, हॉटेल्‍स, शॉपिंग  मॉल्‍स, प्रार्थनास्‍थळे व मोठया प्रमाणावरील जमावाची ठिकाणे, 65 वर्षे वयावरील व 10 वर्षे  वयाखालील तसेच गरोदर स्त्रिया यांची बाहेर ये-जा, आंतर जिल्‍हा बससेवेला परवानगी राहणार नाही.
रेड झोनव्‍यतिरिक्‍त भागात परवानगी दारुची  दुकाने, वैद्यकिय  सुविधा पुरविणारे  दवाखाने, क्‍लीनिक (ओपीडी), टॅक्‍सी, कॅब, रिक्‍शा 1 अधिक 2  व्‍यक्‍ती, चार चाकी वाहने 1 अधिक 2  व्‍यक्‍ती, दुचाकी वाहने 1  व्‍यक्‍ती, जिल्‍हांतर्गत बससेवा, औद्योगिक आस्‍थापना (शहरी) व (ग्रामीण), शहरी भागातील सीटू बांधकाम, इतर खाजगी बांधकाम स्‍थळे, शहरी एकल विक्रेता दुकाने, ई-कॉमर्स अंतर्गत अत्‍यावश्‍यक वस्‍तू, ई-कॉमर्स अंतर्गत अत्‍यावश्‍यक नसलेल्‍या वस्‍तू, खाजगी कार्यालये, शासकीय कार्यालये (शंभर टक्के उपस्थिती), कृषिविषयक कार्य, बँक आणि वित्‍त, कुरियर व पोस्‍टल सेवा, केश कर्तनालय दुकाने, स्‍पा, सलून, प्रेक्षकांव्‍यतिरिक्‍त स्‍टेडियम, घरपोच सेवा देणारे रेस्‍टॉरंट, दुय्यम निबंधक, प्रादेशिक परिवहन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रेड झोनव्‍यतिरिक्‍त भागात सुरु राहण्यास परवानगी आहे तर प्रतिबंधीत क्षेत्रात याबाबींना परवानगी राहणार नाही.  
रेड झोनव्‍यतिरिक्‍त व प्रतिबंधित क्षेत्रात मालाचा पुरवठा, अत्‍यावश्‍यक सेवा पुरविणारी दुकाने, वैद्यकिय अति तात्‍काळ सेवांची हालचाल या सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आदेशात नमुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्‍यक कायदेशिर व दंडात्‍मक कारवाई करण्‍यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्‍यात आले आहे. महानगरपालिका हद्दीत, महानगरपालिका व पोलीस विभागांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत. नगरपालिका हद्दीत, नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत. गावपातळीवर, ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्‍त पथक गठीत करावे.
वरीलप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांचेकडे सादर करावीत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.
       या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व  आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल. तसेच यापुर्वी निर्गमित केलेल्‍या आदेशानुसार दंडात्‍मक कार्यवाही सुध्‍दा करण्‍यात येईल. 
              सर्व संबंधित यंत्रणांनी अत्‍यावश्‍यक साधने व सुविधांची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्या विरुध्‍द कठोर कारवाई करावी. तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हा आदेश दि. 19 जुलै 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केला आहे.
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...