Thursday, March 18, 2021

 राज्यसेवा पूर्व परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 18 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-2020 परीक्षा रविवार 21 मार्च 2021 रोजी नांदेड शहरातील 34 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे. 

नांदेड शहरातील विविध 34 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 9 हजार 816 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000000

 

नांदेड जिल्ह्यात आज 625 व्यक्ती कोरोना बाधित

तिघांचा मृत्यू 

जनतेने सुरक्षितता पाळण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 211 अहवालापैकी 625 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 361 तर अँटिजेन तपासणीद्वारे 264 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 29 हजार 145 एवढी झाली आहे. 

बुधवार 17 मार्च 2021 रोजी चौफाळा नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर लेबर कॉलनी नांदेड येथील 78 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर गुरुवार 18 मार्च रोजी शिवाजी चौक हदगाव येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा हदगाव कोविड रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 627 एवढी झाली आहे. 

आजच्या 2 हजार 211 अहवालापैकी 1 हजार 549 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 29 हजार 145 एवढी झाली असून यातील 24 हजार 565 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 728 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 51 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 14, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 147, कंधार तालुक्यांतर्गत 4, देगलूर कोविड रुग्णालय 1, उमरी तालुक्यांतर्गत 5, धर्माबाद तालुक्यांतर्गत 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 12, मुखेड कोविड रुग्णालय 12, माहूर तालुक्यांतर्गत 4, मुदखेड तालुक्यांतर्गत 3, हदगाव कोविड रुग्णालय 14, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 236 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 84.28 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 243, अर्धापूर तालुक्यात 3, हदगाव 8, लोहा 36, नायगाव 3, परभणी 2, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 9, धर्माबाद 29, कंधार 3, मुखेड 20, उमरी 2, हिंगोली 1 असे एकूण 361 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 125, अर्धापूर तालुक्यात 10, देगलूर 8, धर्माबाद 21, कंधार 4, लोहा 7, मुदखेड 1, नायगाव 1, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 10, भोकर 5, बिलोली 5, हदगाव 12, किनवट 19, माहूर 7, मुखेड 16, उमरी 10, परभणी 2 असे एकूण 264 बाधित आढळले.

 जिल्ह्यात 3 हजार 728 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 164, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 85, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 99, किनवट कोविड रुग्णालयात 32, मुखेड कोविड रुग्णालय 95, देगलूर कोविड रुग्णालय 12, हदगाव कोविड रुग्णालय 19, लोहा कोविड रुग्णालय 62, कंधार कोविड केअर सेंटर 4, महसूल कोविड केअर सेंटर 91, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 113, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 604, खाजगी रुग्णालय 348 आहेत. 

गुरुवार 18 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 59 हजार 04

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 25 हजार 20

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 29 हजार 145

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 24 हजार 565

एकुण मृत्यू संख्या-627

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 84.28 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-325

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 728

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-51.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...