Saturday, March 17, 2018


पीक कर्जमाफीसाठी वंचित शेतकऱ्यांना
31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 17:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतर्गत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज शनिवार 31 मार्च 2018 पर्यंत आपले सरकार या सेवा केंद्रावर किंवा https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्ड आधारे सादर करता येतील. तसेच दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत त्यांचे हिश्याची दीड लाखावरील रक्कम शनिवार 31 मार्च 2018 पूर्वी बॅंकेत जमा करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे
00000


महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
  नांदेड, दि. 17 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 19 मार्च 2018 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. त्यानुसार सोमवार 19 मार्च रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...